चारचौघी : या जगण्यावर…
डॉ. नीलम ताटके
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं आपल्याला मंगेश पाडगावकर यांनी सांगितलंय. जगणं कसं असावं याची जाणीव करून दिलीय. परंतु जगण्यावर प्रेम करायचं म्हणजे काय, एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं त्याचं अस्तित्व जाणवतं त्या सगळ्यावर आपण प्रेम करू शकतो. मग जगण्यावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? हे मला श्रीमती शांताबाई शेळके यांचं ‘धूळपाटी’ वाचल्यावर कळलं.
आपल्या आसपासचा निसर्ग, माणसं, घर या सगळ्याविषयी असलेली आस्था, तन्मयता. माणसांविषयी बारीक-सारीक निरीक्षणं, स्वत:ने केलेल्या प्रत्येक लिखाणावर, आयुष्यात आलेले अनुभव यांच्याकडे सकारात्मतेने पाहणे, भाषांतरं, परीक्षण, स्तंभलेखन अगदी परीक्षांची गाईड लिहिणे, या प्रत्येकातून आपण शिकलो असे त्या म्हणतात. पोटासाठी कराव्या लागलेल्या इंग्रजी सिनेमाविषयीचे लिखाण असो, व्याख्यानं देण्याची सवय नसताना, गरज म्हणून ते केलं तेही अगदी उत्कृष्टपणे. बेकारीचा काळ हा संकट नाही तर तो आत्मभान देणारा काळ असतो असं त्यांना जाणवतं.
आयुष्यात अनेक माणसं भेटली. त्यांनी आपल्याला मदत केली. आपल्या लेखनात त्यांचा वाटा श्रीमती शांताबाई मानतात. अनंत अंतरकर, आचार्य अत्रे यांचा आवर्जून उल्लेख करतात.
काही व्यक्ती ज्या त्यांच्या नात्यातल्या होत्या, आसपास वावरणार्या होत्या त्यांचा शांताबाईंच्या मनावर ठसा उमटला. त्यात त्यांचे आई, वडील, आजोबा, आबई यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आजोबांनी म्हणजे वडिलांच्या वडिलांनी स्वत:च्या मुलांना व मुलींना त्या काळात आवर्जून शिक्षण घ्यायला लावले. मुलींना नोकर्या लावून स्वावलंबी केले याचा त्यांना अभिमान आहे. त्यांच्या आईला असलेली वाचनाची अतिआवड शांताबाईमधे आली आणि तीच पुढे त्यांची करीयर झाली. या वाचनाने त्यांना घडवलं.
जीवन जसं समोर येईल तसं जगावं असा त्यांचा विश्वास असल्याने पुढे आयुष्यात अमुक तमुक करायचं हे ठरवणं त्यांना मान्य नव्हतं, फक्त प्राध्यापक व्हायचा निर्णय हा त्याला अपवाद होता. आयुष्य जसं आलं तसं त्यांनी ते स्वीकारलं.
या शांताबाईंच्या आठवणी तर आहेतच, पण याला सामाजिक संदर्भ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यात त्यांनी सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वीची समाजरचना, जाती संस्था, कुटुंबात शिक्षित व्यक्ती असल्यावर कुटुंबातील वातावरण कसे असते ते त्यांनी मांडले आहे.
नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेल्या आणि त्यांना मुंबईही आवडली. दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना वेगवेगळ्या भाषा बोलणारी, शिक्षणाची खरी गरज असलेली मुले, विद्यार्थी भेटले. या सगळ्या वातावरणात त्या समरसून गेल्या.
या समरसतेतूनच त्यांनी सुंदर कविता लिहिल्या, गीतं लिहिली, जी आजही आपल्याला खूप आनंद देऊन जातात, आपला मूडच बदलून टाकतात.
‘धूळपाटी’ हा एक रसरशीत जीवनानुभव आहे. ज्या गोष्टी अत्यंत खासगी आहेत किंवा वाचकांना त्या कळून किंवा नकळून काहीच फरक पडणार नव्हता त्या त्यांनी सांगायच्या टाळल्या आहेत. प्रत्येक अनुभवात रमणे व करायची असलेली प्रत्येक गोष्ट आत्मीयतेने करणे हेच कदाचित जगण्यावर प्रेम असावं.

http://www.saamana.com/utsav/charchaughi-ya-jagnyavar
0 comments:
Post a Comment