Wednesday, August 24, 2016

माणूस

#वपु  #vapu

माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो त्याला म्हणून हवी असते एक सोबत. जिला मनातली सगळी स्पंदने समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते . आयुष्यातील मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं.पण नाही.एकमेकांच एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, हे आणखीन कोणाला तरी समजावं असं त्याला वाटतं . असं का ? ...ह्याला उत्तर नाही ~ व पु

Wednesday, August 10, 2016

लग्नाचा दिवस



प्रत्यक्षात  हा  अनुभव माझा असून फारच  सुखद  आहे प्रत्येक  मुलीला हा  अनुभव  येतो .इतर मुलींप्रमाणेच माझ्या लग्नाचा दिवस
माझ्या ही आयुष्यात एक  सोनेरी पहाट बनूनच आला .
  माझं लग्न  झालं आणि माहेरची माणसं सोडताना मनाला खूप  यातना झाल्या .अश्रू   गालांवरून ओघळत होते ,बोलायला शब्द उमटत नव्हते .
   सासरी  निघाले  खरी ,पण  आई , जिने आपल्याला उन्हाची झळ लागू दिली नाही ,सतत तिच्या पदराच्या सावलीत  ठेवलं ,शिक्षण  ,योग्य तिथे पाऊल उचलायला शिकवलं ,तीच आई आपल्याला परकी होते हे  आठवून मन दु:खी झाले .
    माहेरचे खेळीमेळीचं  वातावरण सोडून  सासरच्या वातावरणात यायचं म्हणजे प्रत्येक मुलीला कठीणच असतं .पण प्रत्येकाला  माहेर
सोडावंच  लागतं. सर्व बाजूला सारून कशी तरी जड अंत : करणाने मी  बस मध्ये बसले .अश्रूंना पुनः वाट मोकळी करून  दिली होती .
  बसमध्ये बसली तरी  मी रडतच होते .मनामध्ये असंख्य विचार घोळत होते . नव्या घरातील माणसं कशी असतील , ते  मला समजून  घेतील का , पण  हे  मात्र चक्क झोपले होते .बस वेगाने धावत होती .आज पासून मी नवीन आयुष्याला सुरवात करणार होते .गाडीमध्ये
भरपूर हसण्या - खिदळण्याचा आवाज कानावर पडत होता .पण माझं मन माहेरच्या माणसांत गुंतलेलं होतं.आज मी क्षणात त्यांना
परकी  झाले होते .  
   मनात वाटत होतं कि ,मी एवढी रडतेय ,पण यांना मात्र काहीच वाटतं नाही . किती शांतपणे झोपलेत हे ,अजिबात समजूतदार    दिसत नाहीत .त्यांचं  हे  वागणं  पाहून  मला जास्तच  रडायला यायला लागलं .
     थोड्या वेळाने गाडीतली सर्व मंडळी झोपी  गेली. कलकलाट थांबला .
    मी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं , ते चक्क उठून बसले होते.
    त्यांनी माझ्याकडे प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि  गुलाबी पत्र माझ्या हातात दिलं .मी अगदी भांबावून गेले. काय असेल या पत्रात ,काळीज धडधड करत होतं. मी  अलगदच पत्र उघडलं .बस मध्ये लाईट चालू असल्यामुळे  मी ते पत्र वाचू  लागले .


प्रिय भारती ,
   या  मधुर समयी मी तुला फक्त एवढंच सांगेन , तुझ्या मनाची अवस्था मी जाणतो . माहेरची माणसं सोडली आणि तू सासरच्या
गलक्यात आलीस , पण  घाबरू नकोस . मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे .
       आईच्या पदराखाली तुला आणलंय ना , पण  मी तुला माझ्या सदैव  हृदयात ठेवीन .  आपण दोघं आता नवीन आयुष्याला सुरवात करणार आहोत . अपार प्रेम मी तुझ्यावर करीन , तुझ्या चुकांवर पांघरूण घालीन . हा संसार दोघांचा असतो , तो दोघांनी मिळून करायचा असतो .मला तुझी साथ हवीय , तू साथ देशील  ना !
  तुझाच  संजय


मी  पत्र वाचलं , माझे अश्रू  पुसले .त्याच्याकडे  एकटक पाहत राहिले . मला हवा तसाच जोडीदार मिळाला होता . एका  पत्राने आमचा संसार फुलला होता . त्यांनी नजरेनेच मला जवळ येण्याचा इशारा केला . मी अगदी लाजून चूर  झाले  आणि  नकळत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून निर्धास्त झाले .
 भारती  पोटे , बुधवार पेठ  पुणे


गृहशोभिका मे २००७        

 

Sunday, August 7, 2016

मैत्र दिन



मी कोण सांग ना
तुझंच मन तुला देणारा...
ती सर पुन्हा मागते का
तो हळवा थेंब ओघळणारा...



मैत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !