Showing posts with label पत्र. Show all posts
Showing posts with label पत्र. Show all posts

Friday, July 17, 2026

Friday, July 10, 2026

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र,

प्रिय सुधा...

त्या दिवशी थोडा पाऊस आला. सारी झोपली होती. पाऊस आला म्हणंजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे मला नेहमी वाटते. बाहेरच्या झाडावर टपटप आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात नाही? मी खिडकीतू बाहीर हात घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावर फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावंसाळा अजुन नाही सुरु झाला. होइल लवकरच. ढग दोन आले होते,रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळ्या आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणंजे विश्वंभराचे मुक भाव गीत आहे.! खिडकीतून मध्य रात्री माझ्या सारख्या कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?

जुन्या आठवणी गमतीच्या वाटतात.आज दादा नाहीत,वैनी नाहीत,परंतु या स्मृती आहेत. चैत्र वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हायच्याच नाही? 

जीवनात दुःखे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखावर,आनंदावर दृष्टी ठेवून आशेने माणसाने वागावे. फुले, फळे, पक्षी, आकाश, तारे, रवि, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखे-सोयरे या आनंदाच्या रात्री आपल्या सभोवती आहेत. सांयकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो! ढगांचे शत आकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले ढेरपोटे व्यापारी, तर दुस-या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वभंराचे भालदार चोपदार! अनंत रंगाची अनंत मिश्रणे! जणू विराट नाटक चालु असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येउ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो!

रवीद्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्युचे स्मरण करुन द्यावयाच्या. जणू रोज सांयकाळी आपण आपलेच नव्हे तर सा-या समाजाचे,जगाचे थोडक्यात रुपात्मक नाटक बघत असतो...

सुधा,मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवड्यास पत्र लिहीत आहे परंतू आता हे शेवटचे साप्ताहीक पत्र. आता मी तुला केंव्हा तरी अधून मधून लिहीन. परंतु आता बंधन नको....!

तुझाच
आण्णा {सानेगुरुजी}
10 जून 1950

Monday, June 17, 2024

Sunday, February 23, 2020

पत्र

प्रिय अबक ,
मला तुझे नाव माहित नाही . तुझे लिंग माहित नाही . तुझे वय माहित नाही . तुझे मासिक उत्पन्न माहित नाही . तुझे लाईफ स्टाईल माहित नाही . पण मला तू माहित आहेस ! मला तुझ्यातली नकारात्मकता माहित आहे . तुझी बदललेली मानसिकता माहित आहे . मला झाकलेला तू माहित आहेस . तुला मी माहित असायलाच हवा असे नाही . मी खुर्चीवर बसतो तेव्हा वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे असतो . खुर्चीवर नसताना अंकुर असतो . खरं सांगतो . . दोन्ही भूमिकांत मी आनंदी असतो . तसा तू मला दिसत नाहीस . सेल्फी मधे आनंद शोधणारी तू मला दमलेली दिसतेस . म्हणून तुझ्यासाठी थोडे शब्द . . 

आपण पैशाने खूप वाढलोय . आनंदाने किती वाढलोय हे कधी तू पाहिले आहेस ? बरं आपल्या आनंदी व्हायच्या संकल्पना या वर्षात किती बदलल्यात रे .. नवीन फोन ,शूज , गाडी , हॉटेल , फॉरेन ट्रिप , इन्व्हेस्टमेंट , नवीन डील , नवीन व्यवसाय याने आपल्याला आनंद मिळतो . सकाळी उपमा मस्त झाला होता म्हणून शेवटचं आनंदी तू कधी झाला होतास रे ? आठवतंय . . कट्ट्यासमोर आई असेल किंवा बायको . . स्वयंपाक सुरु असताना कुडमुडे पणा करत शेवटच्या गप्पा कधी मारल्या होत्यास ? आठवतंय . . नाही आठवत ! आपण आयुष्यात खूप पुढं आलोय . . जीवनात मात्र बकाल झालोय . तू महागड्या हॉटेल मधे जातेस , पब मधे थिरकतेस , दोन चार अल्कोहोल शॉट्स पचवतेस . . हे सगळं करून तू घरी काय नेतेस ? एकटेपणा . . तुझ्या एन्जॉयमेंट ला सोशल मीडिया वर २००-४०० लाईक्स नाही आले तर तुझा मूड जातो ! अजून लाईक्स यायला अजून धडपड , अजून मोठी जागा . . अजून चांगले फोटो . . ही धडपड  कधी संपणार गं ? या धडपडीचा भाग व्हायला का आपण मोठे झालो ?

तूला आठवतंय . . लहान असताना ,नंतर शाळेत जाताना रस्त्यावर सापडलेल्या फुलापासून ते कुत्र्याच्या पिलापर्यंत सगळं उचलून आपण घरी आणायचो . फुलपाखरं पकडायचो . हवेत भिरभिरणाऱ्या म्हातारीला पकडायला बेभान होऊन पळायचो . रुपयाला १६ या हिशेबाने मिळणाऱ्या मसाला , लिम्लेट च्या गोळ्या आनंदाने खायचो . आज हजारो रुपयांचे चॉकलेट फ्रिज मधे पडलेले असतात पण उत्साहाने खायची भावना होत नाही . का ? आपला उत्साह कोठे हरवलाय ? एका फोटोत एक कपडा आला की आपला त्यातला इंटरेस्ट संपतो . . दरवेळी नवीन कपडा आपल्याला लागतो . नात्यांचे पण असेच झाले आहे का ? अल्टर आणि रफ़ू करणारी पिढी भिकारी नव्हती रे . . त्यांच्या भावना प्रत्येक धाग्यात अडकल्या होत्या . आपले तागे आणि आपले धागे खूप क्षणभंगुर आहेत . शिलाई खूपच तकलादू . . आपले कपडेही लवकर खराब होतात आणि नातीही . . . आपण सतत नवीन शोधत असतो . . कपडाही नातेही . . 

नवीन काय नसतं अरे . . तुझ्या टेबल वरचा पेन स्टेन्ड तू उजवीकडून डावीकडे ठेवलास की टेबल नवीन होते . केसांची बट तू मोकळी सोडलीस की तू नवीन होतेस . चेहेऱ्यावरचे भाव बदलेलेस की तू नवीन होतोस . यात शून्य खर्च आहे . पण तू बदलत नाहीस . तू अडकला आहेस .एका सोन्याच्या पिंजऱ्यात . तुला वाटणाऱ्या सोन्याच्या पिंजऱ्यात . ज्यात प्रवेश सहज होतो . सुटका होत नाही . तू शेवटची आनंदी कधी होतीस ? याच्या आठवणी तुला फारतर कॉलेज पर्यन्त नेतील . . त्या नंतर आपण व्यवहारी झालो . आपण हसायला सुद्धा 'मॅनर्स' ने लागलो . खरं सांगू . . इथंच आपण संपलो . आपल्या प्रत्येकाकडे सांगायला भरपूर आहे पण ऐकायला कोणीच नाही . . का ? आपले कान आणि मन फार लवकर बोअर होते . . आपण सगळेच खूप मोठे ओझे ओढत आहोत . . सतत . . 

शाळेचे दप्तर कधीतरी रिकामे व्हायचे . . मनाचे दप्तर कधी रिकामे होणार ? उसवलेल्या नात्यांचे हिशोब तू मनात करत राहतेस . हुकलेल्या संधींची गणिते तू मनात सोडवत बसतोस . . त्याची उकल कधीच होत नाही . प्रश्न अजून गुंतागुंतीचे होतात . नात्यात करिअर येते . करिअर मधे नाते येते . तुला भरपूर पैसा मिळवायचा आहे . पैसा आपल्या मागील पिढ्यानी मिळवलाच नाही का ? अर्थात त्यांची स्वप्नं कधी आयफेल टॉवर खाली वाईन चे ग्लास पकडून किंवा किस करतानाचे फोटो काढण्याची नवती . सुट्टी म्हणजे नरसोबावाडी ,औदुंबर , पन्हाळा टोक म्हणजे महाबळेश्वर यातच संपली . ते या ठिकाणी जाऊन रिफ्रेश होत राहिले . तू अमेरिका पालथी घालून कधी जेट लेग तर कधी दमलो म्हणून झोपून राहिलास . . खरं सांग . . सुखाची बेरीज कोणी केली ?

मी पैसा मिळवूच नकोस म्हणत नाही . पैशा सोबत जरासे समाधान सुद्धा मिळव. थोडासा आनंद मिळव. थोडीशी शांतता मिळव .तुला एकटं राहायची भीती वाटते . . तुला संडासात पेपर लागतो , गाडीत एफ एम लागतो , बस मधे व्हाट्सअप लागतो . . का ? तुझ्यासमोर मोठा प्रश्न आहे . . मोकळं बसून करायचं काय ? खरं आहे . . आपण मोकळं बसून करणार काय ? आठवून आनंदी व्हावे असं आपल्याकडे आहे काय ? आपण बकाल आहोत . . . आपली ओळख फसवी आहे . आपल्या भावना आणि भावनांची गुंतवणूक तात्पुरती आहे . . यावर तू कधी विचार करणार आहेस ?? किंवा कधी विचार करुही नकोस . . त्याची काहीच गरज नाही .

तू जेव्हा माझ्या समोर खुर्चीत बसतोस /बसतेस तेव्हा तुझा एकटेपणा मला जाणवतो . तुझी तक्रार वेगळी असते .  पण वेदना खूप खोलवर कोठेतरी असते . तुझे महाग कपडे , बाहेर थांबलेली चार चाकी , इंपोर्टेड घड्याळ , ओपीडीत पसरलेला तुझ्या परफ्युम चा मंद वास , तुझा बेस्ट ब्लेझर , कडक सन ग्लासेस , कल्पनेच्या पलीकडची महागडी चेष्मा फ्रेम , खिशातून डोकावणारे सोन्याचे कोटिंग असलेले पेन इत्यादी इत्यादी च्या पलीकडचा तू मला दिसतोस . घुसमटलेली तू मला दिसतेस . . शुष्क . . कोरडी! हे बघून मला वाटतं . . तुझ्या हातावर खडीसाखरेचा एखादा मोठा खडा ठेवावा , एखादा चिरमुऱ्याचा लाडू द्यावा , गुळाचा खडा द्यावा , रावळगावचे एखादे चॉकलेट द्यावे पण . . . . या गोष्टी हातावर पडल्या की लहानपणी जसे आपण खुलायचो तसे आता आपण खुलणार नाही . हातावरच्या गुळाच्या आनंदापेक्षा चिकट तळहात कसा साफ करायचा . . रुमाल खराब होईल आणि इथे टिशू तर दिसत नाही या भयंकर समस्येत तू गुरफटणार म्हणून मी कधीच काही देत नाही . . . तू आनंदात रमण्यापेक्षा समस्येत गुरफाटायची सवय मनाला लावली आहेस . . . . यावर तू निरुत्तर आहेस . मी हतबल !! 
---
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे 
एम डी (आयुर्वेद )
सांगली -पुणे 
7276338585
https://www.facebook.com/ankur.deshpande4444

Sunday, January 6, 2019

Wednesday, August 10, 2016

लग्नाचा दिवस



प्रत्यक्षात  हा  अनुभव माझा असून फारच  सुखद  आहे प्रत्येक  मुलीला हा  अनुभव  येतो .इतर मुलींप्रमाणेच माझ्या लग्नाचा दिवस
माझ्या ही आयुष्यात एक  सोनेरी पहाट बनूनच आला .
  माझं लग्न  झालं आणि माहेरची माणसं सोडताना मनाला खूप  यातना झाल्या .अश्रू   गालांवरून ओघळत होते ,बोलायला शब्द उमटत नव्हते .
   सासरी  निघाले  खरी ,पण  आई , जिने आपल्याला उन्हाची झळ लागू दिली नाही ,सतत तिच्या पदराच्या सावलीत  ठेवलं ,शिक्षण  ,योग्य तिथे पाऊल उचलायला शिकवलं ,तीच आई आपल्याला परकी होते हे  आठवून मन दु:खी झाले .
    माहेरचे खेळीमेळीचं  वातावरण सोडून  सासरच्या वातावरणात यायचं म्हणजे प्रत्येक मुलीला कठीणच असतं .पण प्रत्येकाला  माहेर
सोडावंच  लागतं. सर्व बाजूला सारून कशी तरी जड अंत : करणाने मी  बस मध्ये बसले .अश्रूंना पुनः वाट मोकळी करून  दिली होती .
  बसमध्ये बसली तरी  मी रडतच होते .मनामध्ये असंख्य विचार घोळत होते . नव्या घरातील माणसं कशी असतील , ते  मला समजून  घेतील का , पण  हे  मात्र चक्क झोपले होते .बस वेगाने धावत होती .आज पासून मी नवीन आयुष्याला सुरवात करणार होते .गाडीमध्ये
भरपूर हसण्या - खिदळण्याचा आवाज कानावर पडत होता .पण माझं मन माहेरच्या माणसांत गुंतलेलं होतं.आज मी क्षणात त्यांना
परकी  झाले होते .  
   मनात वाटत होतं कि ,मी एवढी रडतेय ,पण यांना मात्र काहीच वाटतं नाही . किती शांतपणे झोपलेत हे ,अजिबात समजूतदार    दिसत नाहीत .त्यांचं  हे  वागणं  पाहून  मला जास्तच  रडायला यायला लागलं .
     थोड्या वेळाने गाडीतली सर्व मंडळी झोपी  गेली. कलकलाट थांबला .
    मी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं , ते चक्क उठून बसले होते.
    त्यांनी माझ्याकडे प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि  गुलाबी पत्र माझ्या हातात दिलं .मी अगदी भांबावून गेले. काय असेल या पत्रात ,काळीज धडधड करत होतं. मी  अलगदच पत्र उघडलं .बस मध्ये लाईट चालू असल्यामुळे  मी ते पत्र वाचू  लागले .


प्रिय भारती ,
   या  मधुर समयी मी तुला फक्त एवढंच सांगेन , तुझ्या मनाची अवस्था मी जाणतो . माहेरची माणसं सोडली आणि तू सासरच्या
गलक्यात आलीस , पण  घाबरू नकोस . मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे .
       आईच्या पदराखाली तुला आणलंय ना , पण  मी तुला माझ्या सदैव  हृदयात ठेवीन .  आपण दोघं आता नवीन आयुष्याला सुरवात करणार आहोत . अपार प्रेम मी तुझ्यावर करीन , तुझ्या चुकांवर पांघरूण घालीन . हा संसार दोघांचा असतो , तो दोघांनी मिळून करायचा असतो .मला तुझी साथ हवीय , तू साथ देशील  ना !
  तुझाच  संजय


मी  पत्र वाचलं , माझे अश्रू  पुसले .त्याच्याकडे  एकटक पाहत राहिले . मला हवा तसाच जोडीदार मिळाला होता . एका  पत्राने आमचा संसार फुलला होता . त्यांनी नजरेनेच मला जवळ येण्याचा इशारा केला . मी अगदी लाजून चूर  झाले  आणि  नकळत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून निर्धास्त झाले .
 भारती  पोटे , बुधवार पेठ  पुणे


गृहशोभिका मे २००७