♦️🛑♦️ कुंकू कसे लावावे ? ♦️🛑♦️
🛑लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे.
🛑उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत.
🛑कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ.
🛑अ: कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या (चेहर्याच्या) स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.
🛑आ: कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते.
🛑इ. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.
🛑कमळ हे साकारस्वरूप, कुंकू हे शक्तीस्वरूप, तुळस हे श्रीकृष्णतत्त्वस्वरूप, तर बेल हे शिवस्वरूप आहे.
🛑कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते.
🛑कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसर्या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होऊन वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.
🛑ब्रह्मतत्त्व.
साभार.....🙏
0 comments:
Post a Comment