Thursday, June 18, 2020

Depression_is_Treatable ३

#SeekHelp
#Depression_is_Treatable 

कुणावरही कधीही पाळी येऊ शकते.
तर्कवितर्क लावू नये फार...मृत्यू दु:खदच.मनाचं गणित
 इतकं सोपं नाही...कुणीही यातून सुटलं नाही आजतागायत...
स्वत:ला संपवण्याइतपत टोकाला जातो माणूस...
ती एक साचत गेलेली अन क्षणार्धात अचानक 
डोकं वर काढणारी नैराश्याची अवस्था आहे....
त्याला मदत हवीच.मानसोपचार डॉक्टरांची,समुपदेशनाची,कॉंसेलींगची,
मित्राची,आपल्या जीवाभावाच्या माणसांची,प्रेमाची...!
मदत घ्यायला लाज कसली? आपल्याला त्रास होतोय 
हे कळणं अन न लपवता कुणाला सांगता येणं
 तसं डेरींगबाज असण्याची पावती...
अन दु:ख वाईट नाहीच..ती एक अवस्था आहे....
मरेपर्यंत अधुनमधून येणारच.

मनाप्रमाणं होत नाहीच बरेचदा...
सारं ऐशोआराम,सुखसोयी,असुनही
 माणूस विवंचनेत असू शकतो....
मनाला, मेंदुतल्या रसायनांना वैभव,नाव,आध्यात्म,
बडेजाव काही काही कळत नाही...
बस्स त्याला फार नकारात्मक तीव्रतेचं,
अपेक्षांच ओझं नकोसं असतं....
त्याला नैसर्गिक सहजता अन निरोगीपण हवं असतं...
ते तो शोधतो आयुष्यभर.अन कित्येकदा बेभान होऊन
 त्या सुखाच्या मृगजळी शोधात हरवून जातो....
सुख दुर नव्हतचं...ते जवळपासंच होतं.असतं...
आपल्या मायेच्या प्रेमाच्या माणसांजवळच....
दुसरा कुठलाही पर्याय नसतो.बाकी सारं दुय्यम.
माणसं महत्वाची,माणुसकी प्रेम वात्सल्य महत्वाचं, 
छंद,अन जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा....
मग काट्यांचीही मखमल होते....

सुखाची,समाधानाची कारणं शेवटी आपल्याच मेंदुत,
मनात असतात.हे समजलं की माणुस ख-या अर्थानं 
समग्र शहाणा समजदार होतो.स्पिरीच्युयालीटी
 अध्यात्म याहून वेगळं नसतं...
मनाला शांत करण्यासाठी, दिखाव्याचं झगमगाटाचं 
वादळ मेंदुत घुसता कामा नये...!🌿
आपण अतिहळवे होतो. भावनिक होतो एखाद्या वळणावर.
तेव्हा सायंटीफीक प्रोफेशनल मदत लागते. औषधं लागतात. Antidepressants लागतात.
प्रॉपर कौंसेलिंग लागते. थेरपीज लागतात.
 इतर आजारासारखंच यालाही फार जपावं लागतं.
"सुसाईड" या आजाराने कुणी जातो.
 कुणी सुसाईड करत नसतो.
"he died by suicide not committed suicide"

आपल्याला कुणालाही शुन्य मिनटात दोषी ठरवण्याची,
 जज करण्याची  खूप विचित्र सवय असते.
त्याने सुसाईड केलं. मग खरंच खूप वाईट आहे हे जग. इथे भावनांची कुणाला कदर नाही. भावनाहीन झालाय माणूस वगैरे,.नैराश्यातून झालेला भावनिक उद्रेक इंपल्स थांबवता येऊ शकतो. टायमिंग वेळ फार महत्वाची असते. वेळ निघून गेला की हाती काही उरत नाही.

आवडता अभिनेता. त्याने पडद्यावर एम एस धोनी साकारल्यावर धोनी अजूनच आवडाया लागला होता. 
चांगला कलाकार गेला. 
चांगली माणसं अशी अवेळी निघून गेली की एकंदरीतच अवतीभवती एक रितेपण जाणवतं. आपणही बेचैन होतो.

                  - डॉ. श्यामल सराडकर. (सायकियाट्रिस्ट)

0 comments: