दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं
ऊन पावसाचे क्षण सारे
भरभरून जगावं
खुलावं चिखलातून
कधी बागेत बहरावं
सुख दु:खांच्या भ्रमरांना
कधी ओंजळीत धरावं
कधी प्रियकराच्या हातातून
प्रेयसीच्या हाती जावं
अश्या सोनेरी क्षणांचा
कधी साक्षीदार व्हावं
वधूवरांच्या सोबतीने
कधी शुभ-मंगल करावं
मनोरथ पूर्णं करण्या
चरणी ईश्वराच्याही जावं
सुखात कुणाच्या उधळावं
तर दु:खातहि सामील व्हावं
शोभून हार तुऱ्यातून
कधी सरणावरही जळावं.
दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं.......
0 comments:
Post a Comment