Wednesday, October 22, 2008

तूका कोंकण साद घालता



कोकणातून शहरात आलेल्या प्रत्येक चाकरमन्याची कर्मभूमि जरी मुंबई असली
तरी कोकण ही त्याची जन्मभूमि जननी आहे.
त्या जननीची निदान आठवण तरी काढणे हे प्रत्येक चाकरमन्याचे कर्तव्य आहे.

अरे शहरी धन्या चाकरमन्या
तूका कोंकण साद घालता
वरसातून एकदातरी भेटिक बोलयता
अरे सायबा भेटाक बलयता

शहरात गेलंय चाकरी केलयं
कसो रे कनो वाकयलंय
पैश्यामागे लागान कसो घराक इसारलंय
अरे पोरा घरार पाणी सोडलंय

मातयेत लोळान मोठो झालंय
कसो मातीक इसारलंय
आनी मातीच्याच छातीवर बंगले उभारलंय
अरे लेका जमीन खावनं बसलंय

हुतुतू खेळलंय खोखो खेळलंय
कसा मैदान गाजयलंय
फळकुट हातात घेऊन खेळाची वाट लायलंय
अरे गड्या खेळार ओस मारलंय

हापूस चोकून मिटके मारलंय
आंब्यार ताव मारलंय
तोरा चावान पोरां तुझी त्वांड आमट करतत
अरे बाबा तोंडार म्हावं मारलंय

शिकान-शिकान पदव्या घेतलंय
मोठो बॅरीस्टर झालंय
कोंन्व्हेंटमध्ये पोरां शिकवून मराठी बिगड़लंय
अरे पुता मराठीची वाट लायलंय

लयं बरा केलंय रेल्वे हेलंय
थोडो परवास सुखावलो
भैयाक वसरी दिलंय तूझो भावबंद दुखावलो
अरे भावा भावाशीक दुखयलंय

अरे इस्टेट् कमयं पैसो कमयं
कर झिला घराची आठवं
-अनामिक

0 comments: