प्रपोज करण्याची नवीन पद्धत.मिकू : तुझं नाव गूगल आहे का?चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....
*****************
वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पावआणि अंडी घेऊन यायचो...मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!
*****************
गण्या बस स्टॉपवर उभा होता.एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?"..'गण्या- ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!
*****************
गावकरी :- १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉल्क टाईम मिळेल?
दुकानदार :- सात रुपये.
गावकरी :- ठीक आहे मग, ३ रुपयांची कोथिंबीर द्या.
*****************
मास्तर : चिंटू...अरे तुझे बाबा काय करतात?
चिंटू : मास्तर...माझे बाबा एस. बी. आय चे मालक आहेत.
मास्तर : वा मुला... एस. बी. आय बँकचे मालक !
चिंटू : नाही मास्तर... एस. बी. आय म्हणजे सावित्री भोजनालय आणि इडली सेंटर!!!
*****************
कावळा सरळ का उडतो ?
कारण तो विचार करतो,
उगाचच "का वळा?"
*****************
विद्यार्थी :आज मी होमेवोर्क करायचे विसरून गेलो .शिक्षक :राजू तू सांग हिमालयाचा टोक किती उंच आहे.राजू:मला माहिती नाही सर.शिक्षक :(रागाने) बाकावर उभे रहा.राजू:बाकावर उभे राहिल्या मुले हिमालायाचे टोक थोड़ी दिसणार आहे
*****************
बाबा आपल्या तिन्ही मुलांना समोर बोलावून विचारतात,
'सांगा बरं, आज दिवसभरात सगळ्यात आज्ञाधारकपणे कोण वागलं आणि आईचं सगळं कोणी ऐकलं?'
तिन्ही मुलं एकासुरात ओरडतात, 'तुम्ही, बाबा!'
*****************
'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!' तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?'
*****************
चारोळ्या
जडावलेल्या पापण्यामिटायला तयार होत्या,
तेव्हाच हिच्या घोरण्याच्या सिमा पार होत होत्या.
*****************
विनोदी चारोळ्या
बायकोने लाटणे फ़ेकलेतरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाहीकि नव-याला ईजा होत नाही.
*****************
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत
जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
..रोहन-
श्रीमतीराम!शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे
श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?रोहन-
पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
*****************
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी - कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?
गोपाळराव - तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
*****************
व्याकरणाच्या तासाला शिक्षिकेनं मोरूला विचारलं, " काय रे, `मी सुंदर आहे' या वाक्याचा `काळ' कोणता?"
तिच्या चेहेऱ्याकडे पाहून मोरूनं उत्तर दिलं, "भुतकाळ."
*****************
एका छायाचित्रकाराला रस्त्यावर खूप गर्दी जमलेली दिसली.
त्या ठिकाणी अपघात झाला होता.
छायाचित्रकाराला अपघाताचे छायाचित्र घ्याचचे होते,पण त्याला गर्दीतून आत शिरता येईना.
मग त्याने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरवात केली,
''मला आत जावू द्या! ज्यांचा अपघात झाला आहे, त्यांचा मी नातेवाईक आहे !"
लोकांनी त्याला आत जाऊ दिले. त्याने पाहिले तर, एका गाढवाला अपघात झाला होता.
*****************