"आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?"
’दोन हजार शत्रू," लेखक महोदय म्हणाले!
*****************
एकदा धर्मेन्द्रच्या घरी रात्री एक चोर येतो.
धर्मेन्द्रला जाग येते आणि तो ओरडतो, "कमीने!"
यावर चोर काय म्हटला असेल??
..
चोर म्हणतो, "ठीक आहे, कमी नेतो!"
*****************
महाराज: कोण आहे रे तिकडे?
नोकर: मी महाराज.
महाराज: आयला, तु महाराज तर मी कोण?
*****************
राजू : आई गं, आमचे गुरुजी ज्ञानेश्ववर आहेत.
आई : असे का म्हणतोस राजु?
राजू : आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडुन कविता पाठ करुन घेतली.
*****************
एकदा शाळेत शिक्षक एका मुलाला विचारतात ‘सांग इंद्रधनुष्य कोणी मोडले?’
त्यावर मुलगा म्हणतो ‘खरचं सांगतो गुरुजी मी नाही हो मोडले‘.
तेवढयात वर्गात हेडमास्तर येतात.
शिक्षक त्यांना सांगतात सर या मुलाला इंद्रधनुष्य कोणी मोडले ते माहीत नाही.
त्यावर हेडमास्तर म्हणतात, ‘जावूद्या अहो जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल.
*****************
चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?
नन्या : गांधीजींचा जन्म झाला.
चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?
नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!
*****************
शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?
चिन्टु : हो
शिक्षक : कोणत्या ?
चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .
*****************
दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.
डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?
अण्णा : डॉ. देशपांडे.
डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा..........
*****************
जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?
कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.
*****************
एकदा ३ सरदार स्कुटर वरुन जात असतात..
हे बघुन पांडु त्यांना थांबायला हाथ दाखवतो..
तर सरदार त्याला म्हणतो..
.
.
... .
.
.
.
"३ पहिल्या पासुन आहेत.. आता तुला कुठे बसवु.. ?? "
*****************
चिंटू- रावण कोण होता?
पप्पा- जा शाळेत जावून महाभारत बघून ये.
*****************
पप्पा : इतिहासात नापास का?
चिंटू-सर्व प्रश्न मी जन्मलो नसतानाचे आले होते.
*****************
एक बाप आपल्या मुलाला म्हणाला, "गुंड्या! तो आकाशातून पक्ष्यांचा थवा उडत चाललाय तो पाहिलास ना? त्यातल्या त्या पांढऱ्या पक्ष्यावर मी बंदुकीतून गोळी झाडली."
यावर गुंड्या म्हणाला, "बाबा! तरीच तो पांढरा पक्षी सर्वांच्या पुढे निर्धास्तपणे व ऐटीत उडत चालला आहे."
*****************
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात.
मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
*****************
चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते........
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते........
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ......
ते असे.......
...
" प्रिय प्राण नाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला.
काल मुलगा झाला आजीला.
दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.
दवाखान्यात अद्मित केले बकरीला.
हजार रुपयात विकले आत्याला.
नमस्कार तुमची लाडकी गंगू......
*****************
0 comments:
Post a Comment