Sunday, February 27, 2011

मराठी हास्यकट्टा 28

कारणे दाखवा ... बायका लग्न का करतात..?

* एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी
* गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन
* जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन
* पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी
* आई-बापावर दया म्हणुन
* मैत्रिणीनं केलं, मग मी का नको ?
* नव्या नव्या डिझाईन्सची मंगळसुत्रं घालायला मिळावी म्हणुन...

*******************
दोन गुरूजी गप्पा मारत असतात.
पहिला-अरे मला टाटा आणि बिर्ला या दोघांची पुर्ण मालमत्ता मिळाली तर,
मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवेल.
दुसरा-कशाला फ़ुशारक्या मारतोयस....ते कसे शक्य आहे ?
पहिला-का नाही ?....सकाळ संध्याकाळ दोन शिकवण्या सुध्दा घेईन ना....!!

*******************

स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
.......
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
...तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

*******************
पुणेरी विनोद:
पुणेरी : ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला....
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.


*******************
पुणेरी विनोद:
एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया...!"

*******************
बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू!
बंड्या : ओ बाबा
बंड्या : नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.
बबनराव : मग?
बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिलीबबनराव : अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय...?

*******************
शेअर रिक्षावाला : १०० रुपये झाले साहेब.
गंपू फक्त ५० रुपये देतो.
रिक्षावाला : ही काय दादागिरी आहे? अधेर्च पैसे?
गंपू : मग? तू पण बसून आलास ना? तुझे पैसे पण मीच भरू?
*******************
मालकिन: काय ग... 3 दिवसांपासून कामाला नाही आलीस, तेहि न सांगता?

मोल्करिन: ओ Madam...... facebook वर status update करून गेले होते की गावाला जाते म्हणून...
.................. साहेबांनी comment पण दिली की "Come soon... Miss U!!"
*******************
१९७५ मध्ये बॅटमॅन, स्पायडरमॅन आणि सुपरमॅन भारताच्या आकाशातून उडत जात होते. आणि अचानक ते मेले... का?
??

नाही, रजनीकांतचा इथे काही संबंध नाही.

शोलेमधल्या गब्बरने तीन गोळ्या हवेत उडवल्या होत्या ना!
*******************
एका पेट्रोल पंपावर सूचना लिहिलेली असते-
' येथे धूम्रपानास मनाई आहे.'
त्याखाली मजेशीर कारण असते-
' भले तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत नसेल,
पण आमचं इथलं पेट्रोल मात्र लाखमोलाचं आहे!'
*******************

मराठी दिन

 मराठी दिन!!!



आज सोनियाचा दिन, आज मराठीयाचा  दिन ॥
सर्वाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.

शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
- सुरेश भट

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.

सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.

श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।

या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो.

source:FOR MORE

Saturday, February 26, 2011

मराठी अभिमान गीत !!

 मराठी अभिमान गीत !!


 मराठी अभिमान गीत !!! 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
सुरेश भट!!

Friday, February 25, 2011

स्त्री भ्रूण हत्या विरोधी लेख !!

स्त्री भ्रूण हत्या विरोधी लेख !!

आई, असं का ग केलंस?

( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. )

उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी.
आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )

आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!

कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....

नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
................आई एकदाच...........फक्त एकदाच.........

Thursday, February 24, 2011

Wednesday, February 23, 2011

महाराष्ट्रामधील मराठी : अमेरिकेमधील मराठी

महाराष्ट्रामधील मराठी : अमेरिकेमधील मराठी
सौजन्य :मराठी माती

अमेरिका मध्ये नोकरी धंद्यासाठी राहत असलेली मराठी लोक मराठी भाषा , मराठी संस्कृती या विषयी जास्त अभिमानी असतात.
अमेरिकेमध्ये राहत असलेली मराठी मुले मुली आपली भाषा , आपली संस्कृती काळजीपूर्वक जपत असतात.

याच्या अगदी उलट चित्र महाराष्ट्र मधील शहरामध्ये दिसते.
महाराष्ट्र मधील ज्या मुला मुलीनी आयुष्यात अमेरिका सोडा कधी साधे विमानतळाचे तोंड देखील पहिले नाही ते स्वताला modern समजतात.
आपली भाषा , आपली संस्कृती, मराठी सिनेमा , मराठी गाणी याविषयीचा त्यांना कमीपणा वाटतो. अशा मुला मुलींसाठी अमेरिका मध्ये नोकरी धंद्यासाठी राहत असलेली मराठी लोकांचे मराठी प्रेम दाखवणारे फोटो पाठवत आहे..











-- 











अमेरिकेची असंस्कृत संस्कृती महाराष्ट्रात वाढवुन स्वत:च्या महाराष्ट्राबद्दल आणि मराठी बद्दल न्युनगंड बाळगणार्‍या महाराष्ट्रियांनो आता तरी लाज वाटुद्या थोडिशी...

Tuesday, February 8, 2011

मराठी हास्यकट्टा 29

भौतिकशास्त्र खरं तर खूप सोप्पं असतं.. जर...
जर...

न्यूटनच्या डोक्यावर सफरचंदाऐवजी सफरचंदाचं अख्खं झाड पडलं असतं...
******************
वेगवेगळ्या व्यवसायातल्या बायका नव-याशी भांडताना काय बोलतात?
पायलट- गेलास उडत
शिक्षिका- मला शिकवू नका
चित्रकार- थोबाड रंगवीन
धोबीण- चांगलीच धुलाई करीन
... अभिनेत्री- कशाला उगाच नाटकं करता?
वाणी- उगाच पुड्या सोडू नका
डेंटिस्ट- दात तोडून हातात देईन.

*********************
काही विनोद

चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
...

*********************
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर


*********************
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की

*********************

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात


*********************
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर


*********************
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल

*********************
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची !

*********************
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.

*********************
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी ..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..


*********************
पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.

*********************
एक खाष्ट सासू आपल्या दोन जावयांची परीक्षा घेण्यासाठी शक्कल लढवते. पहिल्या जावयाला घेऊन नदीकाठी फिरायला जाते आणि पाय घसरून नदीत पडल्याचे नाटक करत.

*********************
जावई चटकन पाण्यात सूर मारून तिला वाचवतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात एक नवीकोरी गाडी उभी असत...े. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासूबाईंकडून सप्रेम भेट!' नंतर दुसऱ्या जावयाला घेऊन नदीकाठी जाते, पुन्हा पाय घसरून पडल्याचे नाटक करते. जावई ढिम्म हलत नाही... बिच्चारी सासू वाहून जाते. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जावयाच्या दारात नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासरेबुवांकडून सप्रेम भेट!'

*********************
गंपू : अरे, डिझेलचे दर किती वाढलेत ना..
झंपू : वाढू देत. मला काय फरक पडतो? मी आधीपण शंभर रुपयांचं भरायचो आणि आता पण शंभर रुपयांचं भरतो.

*********************
गणपुले गुरुजी : बंड्या...तुला माहितीय का? मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो तेव्हा मला कायम गणितात शंभरापैकी शंभर मार्क्स मिळायचे.
बंड्या : गुरुजी, कदाचित तुमचे शिक्षक चांगलं शिकवत असतील.

*********************
गंपू गणिताच्या पेपरला वर्गात डान्स करत असतो.
झंपू : काय रे, नाचतोयस का?
गंपू : बाईंनी सांगितलंय, प्रत्येक स्टेपला मार्क असतात!!

काही विनोद

चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल

--------------

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची ! कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे. रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी ..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे.. पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
---------------

एक खाष्ट सासू आपल्या दोन जावयांची परीक्षा घेण्यासाठी शक्कल लढवते. पहिल्या जावयाला घेऊन नदीकाठी फिरायला जाते आणि पाय घसरून नदीत पडल्याचे नाटक करत.

जावई चटकन पाण्यात सूर मारून तिला वाचवतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात एक नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासूबाईंकडून सप्रेम भेट!' नंतर दुसऱ्या जावयाला घेऊन नदीकाठी जाते, पुन्हा पाय घसरून पडल्याचे नाटक करते. जावई ढिम्म हलत नाही... बिच्चारी सासू वाहून जाते. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जावयाच्या दारात नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासरेबुवांकडून सप्रेम भेट!'

Saturday, February 5, 2011

आयुष्य जास्त सुंदर वाटत.....


आयुष्य जास्त सुंदर वाटत





आयुष्य जास्त सुंदर वाटत..

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य
जास्त सुंदर वाटत....


नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला
आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत...


भविष्याचे
चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून
पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....


कायमच मागण्या
करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर
वाटत.....


हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या
खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...


चारचौघात
एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य
जास्त सुंदर वाटत...


आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण
कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....


आकाशातले
तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य
तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर
वाटत..
-अनामिक 

Friday, February 4, 2011

मराठी

आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी...

१. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच "मी माझी झाशी देणार नाही" असे म्हटले आहे.

२. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.

३. हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात. कराचीत (पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.

४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.

५. मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे. संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.

६. महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.

७. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.

८. सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.

९. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते. तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे. मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.

Tuesday, February 1, 2011

ध्यास नवा स्वप्न नवे ........

ध्यास नवा स्वप्न नवे ........

ध्यास नवा स्वप्न नवे ........

मातीत या जन्मलो वाढलो
त्या आईला वैभवी नेऊया!

इतिहास तुजा गौरव शाली
तो घेउनी सवे
सामोरी जा त्या भविष्यास

जे उदया नवे
तुज पुढती या मार्ग वरती
आवाहन असे खरे
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे !

ध्यास नवा स्वप्न  नवे यत्न नवा पर्व नवे स्वर्गाहुन सुंदर महाराष्ट्र बनवु या!
जगी सर्वोत्तम स्थानावर्ती नेऊया !

आहोत ज्या भूमी ची लेकरे
त्या आई ला वैभवी नेऊया!

हे मर्द मराठ्या शब्द आता त्या शिवबा रायाची
लढण्याची अन मरणाची पण जिंकून घेण्याची!

उतुंग भरारी घेऊ आता नाव क्षितिजा कडे
चाल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे !!

ध्यास नवा !!
श्वास नवा!!

भाग्य हून भाग्य हे
ती लाभली आई अशी , भूमी अशी
केले संस्कार ते जोपासले,  ममतेतुनी हि संस्कृती

ह्या सिह पर्वता सारखा माते चा हा कणा!!
चुकवील ना कधी मन सोडील हा मराठी बाणा!!

मन हे विशाल त्या धीर सागरा सारखे भव्य ते!!
हि प्रेम गंगा सवे शौर्य च्या या इथे वाहते!!

जन्म नवा!
प्राण नवे!
जोश नवा!
व्यर्थ नवे!!

हि माय मराठी मातेचे नव गाथा !
मन गाईल आता चरणी ठेउनी माथा!!

मातीत या जन्मलो वाढलो  त्या आईला वैभवी नेऊया!
हे मर्द मराठ्या शपथ आता त्या शिवबा रायाची!
लढण्याची अन मरणाची पण जिंकून घेण्याची!!

उतुंग भरारी घेऊ आता नव क्षितिजा कडे!
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे जन्म नवा!!
श्वास नवा स्वप्न नवे!!!

-अजय अतुल