Monday, October 31, 2011

कलाविष्कार ई दिवाळी अंक ऑक्टोबर २०११

Kalaavishkaar_ E-Diwali Magazine_ October - 2011




कलाविष्कार - ई दिवाळी अंक 
--------------- 
प्रथमश सुरेश शिरसाट 
संपादक आणि प्रकाशक 
Fb page @ https://www.facebook.com/kalavishkaar.ediwaliank
Fb Profile @ http://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988

Sunday, October 30, 2011

मराठी हास्यकट्टा 3

मुला कडचे : आम्हाला स्थळ पसंद आहे . मुली कडचे : पण , अजून आमची मुलगी शिकत आहे . मुला कडचे : मग आमचा मुलगा काय लहान आहे , पुस्तक फाडायला .... :)

******************

प्रवाहा बरोबर तर सगळेच जातात.
प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच जिवनात यशस्वी होतो…
हे मी ट्राफीक पोलिसला सांगितल,
तरी त्याने पावती फाडलिच. :)

******************

मास्तर:- बोल बंड्या बिरबल कोण होता माहित आहे का?
बंड्या:- नाही माहित सर ?
मास्तर:- गधड्या अभ्यास केला असता तर माहित पडल असत. …….
बंड्या:- सर तुम्हाला माहित आहे का? सचिन,रोहित आणि प्रथमेश कोण आहेत ते?
मास्तर:- मला नाही माहित ?
… … …
बंड्या:- कस माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवला असत तर माहित पडल असत

******************

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..
... ...
बायको :-विचार करा ..
द्रौपदीला ५ नवरे होते..
नवरा :- माफ कर ...
गम्मत केली ग :)

*************

दिग्विजय सिंग एकदा नेट सर्फ़िंग करत होते.
अचानक त्यांनी घाबरुन आपले ब्राऊझर बंद केले.
.
..
.
कारण जवळपास प्रत्येक वेबपेजवर RSS FEED असा option येत होता !!!!!

******************

मुलगा - आपली कालच मैत्री झाली आहे. आता तू माझ्याकडे 'त्या' नजरेने बघायला सुरुवात कर.
मुलगी - 'त्या' म्हणजे कोणत्या रे?.......
मुलगा - ते तुलाच माहित आहे. कारण काही काळानंतर मी जेंव्हा तुला प्रपोज करेन
तेंव्हा "आपण तर चांगले मित्र आहोत. मी तुझ्याकडे 'त्या' नजरेने कधी
बघितलेच नव्हते." असे उत्तर मला नकोय. BCOZ
˙٠•●♥♥" FRIENDSHIP IZ THE 1ST STEP OF LOVE "♥♥●•٠˙
मुलगी - पण मी तर तुला कालपासूनच त्या नजरेने पहातीये...♥

Saturday, October 29, 2011

तुमचं मन ही तुमची मौलिक संपत्ती आहे

तुमचं मन ही तुमची मौलिक संपत्ती आहे 
-डॉ. जोसेफ मर्फी
(मानसोपचार तज्ज्ञ) 


अंतर्मन कधीच झोपत नाही, ते विश्रांतीही घेत नाही. झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूर्वी त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार पूर्ण बरे होऊ शकतात...


तुमचं मन ही तुमची मौलिक संपत्ती आहे. ते नेहमीच तुमच्या सोबत असतं. मनं दोन असतात. एक बाह्यमन, दुसरं अंतर्मन. एक समंजसपणा दाखवितं, दुसरं असंमजसपणा. तुम्ही नेहमी बाह्यमनानं विचार करता. सातत्यानं केलेले विचार अंतर्मनात जाऊन खोलवर रूजतात. मग त्याप्रमाणं तुमच्या प्रवृत्तीत बदल होत जातो. तुमचं अंतर्मन, तुमच्या भावनांवर नियंत्रण करीत जातं. हे अंतर्मन सृजनशील असतं. तुम्ही चांगला विचार केला तर चांगले परिणाम तुम्हाला दिसू लागतात. वाईट विचार केल्यावर वाईटच सर्वत्र भासू लागते.

महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अंतर्मन जी एखादी कल्पना स्वीकारते, तीच अमलात आणते. अंतर्मनाचा हा नियम आहे. त्यास चांगलं आणि वाईट सर्वच सारखं असतं. त्यामुळे या नियमाचा नकारात्मक वापर केला तर तुमचं जीवन अपयश, नैराश्य, दु:ख यानंच भरून जाईल. तुम्हास चांगला, विधायक विचार करण्याची सवय असेल तर तुमचं आरोग्य चांगल राहील, यश हाती येईल, भरभराट होईल.

मात्र, प्रत्यक्षात बाह्यमन व अंतर्मन अशी दोन मन नाहीत. केवळ एकाच मनाची ती दोन रूपं आहेत. तुमचं बाह्यमन हे केवळ कारण जाणतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करून तिचा स्वीकार करते. तुम्ही पुस्तकाची निवड करता. घर पसंत करता, जीवन साथीदाराची निवड करता, हे सर्व कार्य बाह्यमनाच्या साह्यानं आपण करतो. सर्व निर्णय आपण बाह्यमनाच्या मदतीनं घेत असतो.

परंतु, हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, अन्नपचन, रक्ताभिसरण अशी शरीरातील अनेक महत्त्वाची कायेर् तुमच्या मजीर्वर अवलंबून नसतात. त्यासाठी तुमच्या मनानं निर्णय घ्यायची गरज नसते. ही सर्व कायेर् अंतर्मनाने होतात. तुमच्या अंतर्मनावर जे बिंबवलं जातं, किंवा तुमचं बाह्यमन ज्याच्यावर विश्वास ठेवतंं, त्या सर्वांचा स्वीकार अंतर्मन करतं. ते कसलंही वाद घालत नाही.

तुमचं अंतर्मन हे जमिनीचे मशागत केलेल्या वाफ्यासारखं असतं. त्याच्यात जे बियाणं पेरलं जातं, मग ते चांगलं असो की वाईट, त्याचा स्वीकार करतं. तुमचे विचार बियाणासारखेच असतात. नकारात्मक, विध्वंसक विचार तुमच्या अंतर्मनात नकारात्मक कार्य करीत असतात. ते बाह्यअनुभवांच्या जोडीनं लगेच किंवा योग्य वेळी प्रतिक्रियांच्या रूपानं बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ तुमच्या बाह्यमनानं, ठरवलं की, एखादी गोष्ट खरी आहे, प्रत्यक्षात ती खोटी असेल, तरीही तुमचं अंतर्मन ती गोष्ट खरीच असल्याचं समजेल आणि त्या दृष्टीनं कार्य करीत राहील.

मानसोपचारतज्ज्ञ आणि इतर अनेकांनी यासंबंधी प्रयोग केले आहेत. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून हीच एक बाब स्पष्ट झाली आहे. अंतर्मन कधीही निवड करण्याच्या किंवा तुलना करण्याच्या फंदात पडत नाही. बाह्यमनानं केलेली सूचना, मग ती खोटी असली तरी, अंतर्मन त्याचा स्वीकार करतं.

संमोहन विद्येद्वारेही हे प्रयोग करण्यात आले आहेत. एखाद्यास संमोहित करून त्यास सांगण्यात आलं की, तू नेपोलियन बोनापार्ट आहे, किंवा मांजर आहे, किंवा कुत्रा आहे. तर संमोहित व्यक्तीच्या अंतर्मनावर ते लगेच बिंबतं, ही व्यक्ती मग ती सांगितल्याप्रमाणं वागायला लागते. अशा व्यक्तीचं संमोहित झालेलं बाह्यमन, त्यास मिळणारे आदेश अंतर्मनाकडे पाठविते आणि अंतर्मन कसलाही विचार न करता, त्या सूचना, आदेश खरे मानून तशी कृती करायला लागतं.

बाह्यमनास वस्तुनिष्ठ मन, असंही म्हटलं जातं. कारण ते वास्तवाचं भान राखून, निर्णय घेतं. त्यासाठी शरीरातील पाच ज्ञानेदियांचं साह्य घेण्यात येतं. त्यांच्या साह्यानं बाह्यमन भोवतालच्या परिस्थितीचं निरीक्षण करतं व नंतर निर्णय घेतं. परंतु, जेव्हा बाह्यमन काही कारणास्तव निर्णय घेण्याचं थांबवतं, त्यावेळी अंतर्मन सक्रिय होतं व स्वत: निर्णय घेऊ लागतं. झोपताना किंवा ग्लानी आली असेल, अशावेळी अंतर्मन काम करू लागतं. त्यासाठी त्याला ज्ञानेदियांची गरज भासत नाही. इतरत्र घडणारी घटनाही ते बघू शकतं किंवा ऐकू शकतं. ते तुमच्या शरीरातून बाहेर पडून, दूरवर जाऊन माहितीही गोळा करून आणतं.

अंतर्मन झोपत नाही किंवा विश्रांतीही घेत नाही. त्यामुळे तुम्ही झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूवीर् त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अद्भुत आणि अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार बरे होऊ शकतात, असं सिद्ध झालं आहे. प्राचीन काळी मंदिरातील अनेक धर्मगुरू आजारी माणसाला औषध देऊन त्यास लगेच झोपायला सांगत. झोपेत देव येऊन तुम्हास बरं करील, असं ते त्याला सांगत. तसं सांगण्यामागचं खरं कारण अंतर्मनाची अपार ताकद हेच होतं!

अनुवाद : जॉन कोलासो


मजेदार पुणेरी मराठी

मजेदार पुणेरी मराठी

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human

Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती

आहे.काही उदाहरणे देत आहोत ..

पुणेकराकडून पुणेकरांसाठी

1. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .
2. ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी
3. नाही
4. ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..
5. ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.
6. गावच्या गप्पा घरी !
7. ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य
8. काडी चावापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स
9. शोभेचे नाहीत .गुमान बूड त्याच्यातच विझवा. .
10. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.
11. संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

Friday, October 28, 2011

दिवाळी SMS


दिवाळी SMS
 ****************************

********************
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी
उजळेल आयुष्याची वहिवाट !!
 शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !

********************
 दिपावलीच्या शुभ क्षणांनी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!

********************
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत,
फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

********************
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

********************
तेजोमय दीप तेवावा
आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा
सदैव तुमच्या जीवनी !
॥ शुभ दीपावली ॥

********************
यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग,
सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ,
प्रेमाची भाऊबीज
अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

********************
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

********************
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

********************
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 
 ********************
 यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल,
आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

********************
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

********************
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

********************
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!

********************
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

********************

Wednesday, October 26, 2011

मराठी हास्यकट्टा 11

अमेरिका : आमची कुत्री फुटबॉल खेळतात.
जपान : आमचे मासे नृत्य करतात.
चीन : आमचे हत्ती सायकल चालवतात.
भारत: आमची गाढवं देश चालवतात...

*************

झम्प्या बोड़ीस्प्रे मारून बसमधे चडला
एका मुलीने कमेंट्स पास केलि - आज काल फिनेलचा वापर जास्त होतोय ना .....?
झम्प्या - तरी पण माश्या काही पाठलाग नाही सोडत.. :-D


*************

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,
एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला
"मग आम्ही काय करू"-पलीकडून उर्मट प्रश्न आला
"तुम्ही काही करू नका" - अत्रे शांतपणे म्हणाले,
मृतांच्या नातेवाईक यांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच.......

*************

मुलगी एका गाडीतून
एका मुलाला ओव्हरटेक
करते.
मुलगा : (जोरात ओरडून )
ए....... म्हैस.
मुलगी : तू गाढव... मूर्ख...
बिनडोक..
एवढं बोलत असतानाच
तिची गाडी एका म्हशीला धडकते
आणि अपघात होतो.
.
.
.
तात्पर्य :
मुलींना त्यांच्या भल्याचं
सांगितल तरी कळत
नाही..................


*************

पुणेरी बॉय फ़्रेंड :-

मुलगी : आपन मेक डोनॉल्ड ला जाऊ या का ? मला खुप भूख लागली आहे..
मुलगा : पण मझी एक आट आहे, मला मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग मग जाऊ...!!
...
मुलगी थोडा वेळ विचार करून बोलते, जाऊ दे ना आपन " के एफ़ सि " ला जाऊ...!!
मुलगा हुशार आसतो तो तिला विचारतो मला जरा " के एफ़ सि " चा फ़ुल फ़ॉर्म सांग मग जाऊ....!!
मुलगी : आपन ना मीसळ पावच खाउ खुप छाण मीळतो...

**************
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!'
October 26 at 8:47pm

दिवाळी शुभेच्छापत्रे

दिवाळी शुभेच्छापत्रे

                                                                          1 2

Sunday, October 23, 2011

मराठी हास्यकट्टा 2

मी नेहमी तुज्या घरा समोर येताना मन माझ घाबरत असत ,
मी नेहमी तुझ्या घरा समोर येताना मन माझ घाबरत असत ,
कारण ?
कारण !

तुज्या बापच लक्ष्य सारख माझ्या वर असत ..... :)

****************
बायकांच्या या पाच गोष्टी कधी समजत
नाहीत .....
* तुम्ही ना अगदी "हे" आहात ? ( "हे"
म्हणजे काय ? )
* तुम्ही पहिल्या सारखे
आता नाही राहिलात !! ( मग काय
दुसऱ्या सारखे झालो ?)
* मला तुमच्या कडून
हि अपेक्षा नव्हती ( बये मग
कसली अपेल्षा होती ?)
* खर्र सांगा ... मी कशी दिसते ? (खर
सांगून का मार खायचाय ?)
* मी खूप स्वार्थी आहे ना ? ( हो म्हटलं
तर झालच .....आपल् .....

Saturday, October 22, 2011

मराठी हास्यकट्टा 4

लग्न मंडपात सारे गाव पेटले
कारण
काय म्हणे तर
...
त्या नवऱ्याने नवरी एवजी
करवली चे नाव घेतले ................

*****************
गेलो होतो रानात..
उभा होतो उन्हात..
दिसली "ती"एका क्षणात..
भरली माझ्या मनात..
म्हणून I LOVE U बोललो तिच्या कानात..
दिली ना तिने एक सटकन "गालात."
आता पुन्हा नाही जाणार त्या रानात..!!!!

****************
"आई म्हणते आजकाल,
झोपेत मी सारखा हसत असतो..
कस सांगू तिला कि,
स्वप्नांत तिच्या सुनेलाच मी पाहत असतो..!" .... :D

************
आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो ...
पण आता त्याने नामी युक्ति काढलिय ...
तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो ..
.
.
... .
.
" दया दरवाजा तोड दो "
आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो :-)

************

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का ??? ... बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ

***************

एका मुलाला १ चिराग मिळाला... खुश होऊन त्यानी तो घासला....
लगेचच धूर झाला... आणि थोड्याच वेळात..............
.
.
"धड्दम" असा स्फोट झाला.. ५ जागीस ठार !! आणि ७ जखमी....!!!!!
अल्लादिन चा जमाना गेला आता....
****************
रजनीकांत:
लहानपणी माझ्या घरात लाईट
नव्हती, म्हणून मी "अगरबत्ती लाऊन
अभ्यास केला!"
मकरंदा: हो का? आमच्याकडे पण
लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती, मग काय
माझं एक दोस्त व्हता, 'प्रकाश'
नावाचा, त्याला सोबत बसून अभ्यास
केला, . . पण पुढे तो पावसात
भिजला नि विझला... . ... . . . .
रजनीः मग काय केलं?. . . . . ....
मकरंदा: काय नाय, माझही एक
मैत्रीण पण होतो....'ज्योती'
नावाची.... . . ..........

Friday, October 21, 2011

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

लळा जिव्हाळा शब्दच खोटे


लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
मासा मासा खाई॥
कुणी कुणाचे नाहि,
राजा कुणी कुणाचे नाहि ।

कुणी कुणाचे नाहि,
राजा कुणी कुणाचे नाहि ।

लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
पिसे तणसडी, काड्या जमवी चिमणी बांधी खोपे ।
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई ॥१॥

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ।
कोण कुणाची बहिण भाऊ, पती पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ॥२॥

कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि ।
लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।

चित्रपट : जिव्हाळा
गायक : सुधीर फडके
गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : श्रीनिवास खळे

Sunday, October 16, 2011

मराठी हास्यकट्टा - 5

मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?
मुलगा:- घरी विचारूनसांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
... ... मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा, चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर ताई आणि दादा त्यांची
खेळणी द्यायचे. कळले का
मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा.
:) :)

**************
मुलगी मुलाला Message करते....

मुलगी: ये मला जोक पाठवणा..
मुलगा message करतो
मुलगा:मी अभ्यास करतोय,मला वेळ नाहीये..
... ... .
.
.
.
.
.
मुलगी:आणखी एक जोक पाठवणा....

********************
झम्प्या बोड़ीस्प्रे मारून बसमधे चडला

एका मुलीने कमेंट्स पास केलि - आज काल फिनेलचा वापर जास्त होतोय ना .....?

झम्प्या - तरी पण माश्या काही पाठलाग नाही सोडत.. :-D

****************
एकदा गंपू प्रवचनाला जाऊन घरी परतला. घरी आल्या-आल्या त्याने बायकोला उचलून घेतलं.

गंपूची बायको : अहो...हे काय करताय? प्रवचनात नक्की काय सांगितलं तुम्हाला?

गंपू : हेच की...आपल्या दु:खांचा भार आपणच उचलला पाहिजे ....
************
पती : आज आपल्या चिरंजीवांनी माझ्या खिशातून काही पैसे चोरलेले दिसताहेत..... पत्नी : कशाला त्याच्यावर आळ घेता उगाच? मी तुमच्या खिशात हात घातला नसेल हे कशावरून? पती : अगं, खिशात अजून काही पैसे शिल्लक आहेत
************

दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात..एक मित्र मरत असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो ...तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव.. काही दिवसांनी मेलेला मित्र दुसर्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला ...एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट ...कोणती आधी सांगू ...दुसरा मित्र म्हणाला चांगली आधी ...मेलेला मित्र म्हणाला ..आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे...वाईट बातमी म्हणजे ...बुधवारच्या म्याच मध्ये तुला बोलिंग करायची आहे :)

Saturday, October 15, 2011

feeling (फीलिंगस् )

feeling (फीलिंगस् )
fellings ह्या शब्दाचा अर्थ वळवताच येत नाही अनि “ दोस्ती , प्रेम अनि सहज , असच “ ह्या शब्दातूनच हा शब्द जातो “fellings “ . कधी घडली असेल तुमच्या बरोबर “हो” अनि “नाही “ स्वतालाच विचारा .......अशीच एक “ feelings” ..............



योग योग आहे का खरच योग माहित नाही पण माझ्या गोष्टी सर्व fb (facebook) वरच येतात, आता मनात येतो म्हणून लिहितो म्हणून हा योग होतो ...........

facebook वर “ती” खूप दिवसा पासून add होती पण कधी बोलत नसे ,मी पण तिला “message” करून थकलो अनि “ hopes” सोडून बसलो होतो ..एक दिवस “ reply” आला अन् त्यच दिवशी online भेटली. fb वरच normal बोलन ........

मी :- hiiiiiii..........

ती :- hiiiiiii..................

........

मी:- कशी आहेस अनि आज online कशी ?

ती :- असते कधी कधी अनि मी ठीक आहे ......(उत्तरावरून attitude girl वाटली )

मी :- okz......हो पण माझ्या एका पण msg चा reply नाही केला.

ती:- reply करायचा असतो .......

मी:- कल्याण .....

ती :- काय “कल्याण” ?

मी:- नाही मी “कल्याण” ला राहतो तू कुठे राहते ?

ती :- नवीमुंबई ......

मी:- gud मग fb कधी पासून आहे ...?

ती :- खूप नाही 6 months ......

मी :- अनि chat करते का नाही ?

ती :- नाही .......तेवढी मी बसतच नाही ....

मी :- okz.....

ती :-झाल का आपण नंतर बोलू मी जाते आता ......?

मी:- एवढ्या लवकर .........

ती :- नसीब मी बोलले तरी ......:)

मी :- ohhhh......as u wish ........

ती :- byeeeeee

मी :- tc ......



रोज online भेटायची अनि time झाल कि attitude मध्ये निघून जायची पण बोलताना माझ्या मनावर हावी असायची .एक दिवस असाच बोलताना ती oflline झाली. reply बंद म्हणून नेहमी प्रमाणे गेली म्हणून मी वाट बघायची सोडून मी पण logout झालो ..........

थोड्याच वेळात unknown no . वरून friendship msg आला..... मी मनातल्या मनात वाह..... आता हा no . कोणाचा म्हणून फोन लावला तर cut , दुसऱ्यांदा cut , तिसर्यांदा cut , चौथ्य्न्दा मीच cut-cut बंद केली. अनि थोड्याच वेळात त्या नंबर वरून फोन आला . मी विचारलं whos this ?

ती :- ओळख ......

मी :- कस ओळखू ........?

ती :- ते तुज बघून घे ......

मी :- अस कस ......?

ती :- असच ?

मी :- तुझं नावाचा पहिला अक्षर सांग अनि ,..शेवटच .......

(तिने सांगितलं अनि मी ओळखल पण )

ती :- मी direct offline झालो .तुला राग आला असता ना ......म्हणून मी msg केला .........

मी :- ohhhh......अस काय ?

ती :- चल झाल बोलून नंतर वेळ भेटला तर बोलेन नाही तर नाही .......

मी :- मी “msg” करेन ना ......

ती :- कशाला ......मी सहज फोन केला होता.......

मी :- okz........चांगल आहे तुज .........

अनि फोन कट झाला .......खरा खेळ तर आता सुरु झाला होता “feelings “ चा ......मला राग येईल म्हणून फोन केला होता पण लगेच तो कट पण केला ....पण २-३ दिवसांनी तिचे msg यायला सुरवात झाली मग मी पण msg करू लागलो .......



“ गोड गोड गोडवी .....

मन भरून जावी .....

शब्द च नाही वळत ...

हि feeling च नाही कळत ........”



“ hiiii.........hellooooo...

..

how r u ............

कशी आहेस ...? कसा आहेस तू ?

ह्या शब्दन मध्ये लपलेली .....

हि feeling च नाही कळत ........”



असाच दिवस–रात्र msg वर बोलायचो ...पण एक दिवस मीच विचारलं .......

मी :- hellllooooo मला काही तरी सांगायचं आहे .....?

ती :- मला माहित आहे तुला काय बोलायचं आहे .....

मी :- मग तुज उत्तर काय असेल .......

ती :- हे बघ उत्तर काही पण असल तरी आपण असे जास्त दिवस नाही बोलू शकत .........

मी :- अस का ?

ती :- असाच आहे अनि खर आहे ?

मी:- sorry मी माझ्या feelings चुकून मांडल्या ......

ती :- i recept ur feelings ..... अनि sorry ........ उद्या पासून मला msg पण नको करत जाऊ ...,,मला त्रास होतो ..... thanks for very nice friendship .................



तिने फोन कट केला अनि मी पण “कट” झालो .......त्या दिवसा पासून तिचा फोन च नाही लागला अनि facebook अनि friendship अनि feelings चा असा end झाला ........

तिने अस का केल मला नाही समजल ......तुम्हाला समजेल किवा नाही पण शेवटी राहते ती “FEELINGS” ......



“ “ मी अनि “ती “ मध्ये ......

तीच लांब झाली ........

एकट पडलेल्या मनाला हेच नाही वळत .......

. हि वेगळी अशी “feeling “ च नाही कळत........” “....................



feeling (फीलिंगस् )



fellings ह्या शब्दाचा अर्थ वळवताच येत नाही अनि “ दोस्ती , प्रेम अनि सहज , असच “ ह्या शब्दातूनच हा शब्द जातो “fellings “ . कधी घडली असेल तुमच्या बरोबर “हो” अनि “नाही “ स्वतालाच विचारा .......अशीच एक “ feelings” ..............



योग योग आहे का खरच योग माहित नाही पण माझ्या गोष्टी सर्व fb (facebook) वरच येतात, आता मनात येतो म्हणून लिहितो म्हणून हा योग होतो ...........



facebook वर “ती” खूप दिवसा पासून add होती पण कधी बोलत नसे ,मी पण तिला “message” करून थकलो अनि “ hopes” सोडून बसलो होतो ..एक दिवस “ reply” आला अन् त्यच दिवशी online भेटली. fb वरच normal बोलन ........

मी :- hiiiiiii..........

ती :- hiiiiiii..................

........

मी:- कशी आहेस अनि आज online कशी ?

ती :- असते कधी कधी अनि मी ठीक आहे ......(उत्तरावरून attitude girl वाटली )

मी :- okz......हो पण माझ्या एका पण msg चा reply नाही केला.

ती:- reply करायचा असतो .......

मी:- कल्याण .....

ती :- काय “कल्याण” ?

मी:- नाही मी “कल्याण” ला राहतो तू कुठे राहते ?

ती :- नवीमुंबई ......

मी:- gud मग fb कधी पासून आहे ...?

ती :- खूप नाही 6 months ......

मी :- अनि chat करते का नाही ?

ती :- नाही .......तेवढी मी बसतच नाही ....

मी :- okz.....

ती :-झाल का आपण नंतर बोलू मी जाते आता ......?

मी:- एवढ्या लवकर .........

ती :- नसीब मी बोलले तरी ......:)

मी :- ohhhh......as u wish ........

ती :- byeeeeee

मी :- tc ......



रोज online भेटायची अनि time झाल कि attitude मध्ये निघून जायची पण बोलताना माझ्या मनावर हावी असायची .एक दिवस असाच बोलताना ती oflline झाली. reply बंद म्हणून नेहमी प्रमाणे गेली म्हणून मी वाट बघायची सोडून मी पण logout झालो ..........

थोड्याच वेळात unknown no . वरून friendship msg आला..... मी मनातल्या मनात वाह..... आता हा no . कोणाचा म्हणून फोन लावला तर cut , दुसऱ्यांदा cut , तिसर्यांदा cut , चौथ्य्न्दा मीच cut-cut बंद केली. अनि थोड्याच वेळात त्या नंबर वरून फोन आला . मी विचारलं whos this ?

ती :- ओळख ......

मी :- कस ओळखू ........?

ती :- ते तुज बघून घे ......

मी :- अस कस ......?

ती :- असच ?

मी :- तुझं नावाचा पहिला अक्षर सांग अनि ,..शेवटच .......

(तिने सांगितलं अनि मी ओळखल पण )

ती :- मी direct offline झालो .तुला राग आला असता ना ......म्हणून मी msg केला .........

मी :- ohhhh......अस काय ?

ती :- चल झाल बोलून नंतर वेळ भेटला तर बोलेन नाही तर नाही .......

मी :- मी “msg” करेन ना ......

ती :- कशाला ......मी सहज फोन केला होता.......

मी :- okz........चांगल आहे तुज .........

अनि फोन कट झाला .......खरा खेळ तर आता सुरु झाला होता “feelings “ चा ......मला राग येईल म्हणून फोन केला होता पण लगेच तो कट पण केला ....पण २-३ दिवसांनी तिचे msg यायला सुरवात झाली मग मी पण msg करू लागलो .......



“ गोड गोड गोडवी .....

मन भरून जावी .....

शब्द च नाही वळत ...

हि feeling च नाही कळत ........”



“ hiiii.........hellooooo...

..

how r u ............

कशी आहेस ...? कसा आहेस तू ?

ह्या शब्दन मध्ये लपलेली .....

हि feeling च नाही कळत ........”



असाच दिवस–रात्र msg वर बोलायचो ...पण एक दिवस मीच विचारलं .......

मी :- hellllooooo मला काही तरी सांगायचं आहे .....?

ती :- मला माहित आहे तुला काय बोलायचं आहे .....

मी :- मग तुज उत्तर काय असेल .......

ती :- हे बघ उत्तर काही पण असल तरी आपण असे जास्त दिवस नाही बोलू शकत .........

मी :- अस का ?

ती :- असाच आहे अनि खर आहे ?

मी:- sorry मी माझ्या feelings चुकून मांडल्या ......

ती :- i recept ur feelings ..... अनि sorry ........ उद्या पासून मला msg पण नको करत जाऊ ...,,मला त्रास होतो ..... thanks for very nice friendship .................



तिने फोन कट केला अनि मी पण “कट” झालो .......त्या दिवसा पासून तिचा फोन च नाही लागला अनि facebook अनि friendship अनि feelings चा असा end झाला ........

तिने अस का केल मला नाही समजल ......तुम्हाला समजेल किवा नाही पण शेवटी राहते ती “FEELINGS” ......



“ “ मी अनि “ती “ मध्ये ......

तीच लांब झाली ........

एकट पडलेल्या मनाला हेच नाही वळत .......

. हि वेगळी अशी “feeling “ च नाही कळत........” “...............

Wednesday, October 12, 2011

मराठी हास्यकट्टा 7

मुलाची आई (मुलीच्या आईला)- ‘‘मला तुमची मुलगी पसंत आहे हो; पण एक सांगायला हवंच हं. माझा मुलगा ना नास्तिक आहे. त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही.’’
मुलीची आई- ‘‘त्याची नका चिंता करू, एकदा लग्न होऊन तो माझ्या मुलीबरोबर राहू लागला की, आठ-दहा दिवसातच त्याला सारे देव आठवू लागतील.’’

************************

इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
"काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?"
राजु खडबडुन जागा होत " देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले "
पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
तेव्हा जोशी बाई सोडुन सगळे हसले. जोशी बाई मात्र गंभीरपणे बोलल्या " कोण राजु ना ? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच फोडले असेल.

************************
फलक.
एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक.

"येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल."

************************
अमितकडे त्याचे मामा, मामी त्यांची तीन मुले आणि मावशी अशी पाहुणेमंडळी अचानक येऊन टपकली. अमितच्या आईला फार आनंद झाला. ती आपल्या भावाचे, भावजयीचे, बहिणीचे स्वागत करायला आनंदाने पुढे झाली. सर्व मंडळी घरात येऊन बसली. चहा-पाणी झाले, बाबा म्हणाले, ‘‘अमित, पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये. हे ऐकून सर्वजण खुश झाले. अमित बाहेर गेला व पाहुण्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दोन रिक्षा घेऊन आला.

************************
चिकटरावांचा मुलगा हजार जबाबी....!!
शिक्षक : राजा, या वेळी तू 80 टक्के मार्क्‍स मिळवायला हवेत बरं का!
चिकटरावांचा मुलगा : सर, मी 80 टक्के नाही तर 100 टक्के मार्क्‍स मिळवीन.
शिक्षक : माझी चेष्टा करतोस का रे?
चिकटरावांचा मुलगा: चेष्टा करायला तुम्हीच तर सुरुवात केली सर.

Thursday, October 6, 2011

दसरा

दसरा



’दश-हरा’ म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला ’विजयादशमी’ असेही म्हणतात.संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात हा सण विविध प्रकारे साजरा होतो. केवळ भारतातच नव्हे तर भारताबरोबरच हा सण जावा, सुमात्रा व जपानमधेही साजरा केला जातो. नेपाळचा तर हा राष्ट्रीय सण आहे.

या दिवशीचे आणखी एक विशेष असे की याच दिवशी द...ुर्गामातेने महिषासुराचा वध केला.सलग नउ दिवस चाललेले हे युद्ध दहाव्या दिवशी संपले….तोच हा दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणुन द्यायचे आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करायची. मनातले राग, दु:ख सगळ काही दहन होणाऱ्या रावणाच्या पुतळ्याबरोबर तिथेच सोडायचे आणि एक नवी प्रसन्न सुरुवात करायची. अज्ञातवास संपवून निघालेल्या पांडवांनी याच दिवशी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली हत्यार बाहेर काढून त्यांची पुजा केली होती. ह्यादिवशी सिमोल्लंघन केले जाते…….पुर्वी राजे याच दिवशी नवे प्रदेश काबिज करण्यासाठी निघत असत.

सौजन्य: Talyatil Ganpati (सारसबाग पुणे)

Wednesday, October 5, 2011

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला?

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला?

सीबीआयची साइट हॅक होण्यापासून ते फेसबुकवर सातत्याने येणारे व्हायरस यामुळे गेल्या काही दिवसांपासून सायबर जगतामध्ये खळबळ माजली आहे.
या असुरक्षिततेला तोंड देण्यासाठी जगभरातील अनेक देश सरसावले आहेत. भारतानेही ११ एप्रिल रोजी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचा उहापोह...
- नीरज पंडीत

फेसबुकवर कमेंट टाकत आहात

किंवा ट्विट करत आहात...जरा थांबा, आधी भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने नुकतीच जाहीर केलेली नियमावली वाचा आणि मगच पुढचे पाऊल उचला. नाहीतर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता.

जगातील कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी किंवा आपले मत व्यक्त करण्यासाठी सर्वात प्रभावी ठरत असलेल्या इंटरनेट या माध्यमाचा वाढता दुरुपयोग लक्षात घेता केंदीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने २०००सालच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याला पूरक ठरणारी नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली सायबर क्षेत्र अधिक सुरक्षित करणार असली तरी, यामधून इंटरनेट वापरणाऱ्यांवर आणि इंटरनेटवरील विविध साइट्सवर मोठे निर्बंध येणार आहेत. यामुळे कदाचित आपल्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा येणार असल्याची भीती तज्ज्ञांना आहे. याला जगभरातील विविध कंपन्यांनी तसेच देशातील अनेक संस्थांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे.

नवी नियमावली सांगते...

नव्या नियमावलीमधील दुसऱ्या उपनियमानुसार सोशल नेटवकिर्ं ग साइटवर अथवा आपल्या ब्लॉगवर एखाद्या विषयावर लिखाण केले. हे लिखाण जर बेकायदेशीर असेल तर त्यावर तातडीने कारवाई होईल. या बेकायदेशीर लिखाणाच्या व्याख्येमध्ये या नियमावलीत भारतातीलच नव्हे तर जगातील कुठल्याही आयटी कायद्यात तरतूद नसेलेले मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. हे लिखाण लहान मुलांच्या विचाराला हानी पोहचवणारे नसावे, त्यामधून कुठल्याही समाज घटकाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्या बद्दल गॉसिपिंग केलेले नसावे, तुटलेले नातेसंबंध, परराष्ट्राशी संबंधांवरील वक्तव्य, सरकार विरोधी भूमिका अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. यातील बहुतांश गोष्टी आपण रोजच्या नेट जीवनात करत असतो. पण नव्या नियमानुसार अशा गोष्टी केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. समजा याप्रकरणी कारवाई करायचे ठरवले तर यासाठी ठरविण्यात आलेली प्रक्रिया खूप विचित्र असल्याने याला सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटी तसेच गुगलसारख्या कंपन्यांनी विरोध केला आहे. नव्या नियमावलीनुसार एखाद्या साइटवर जर कोणी 'काळ्या' यादीत नमूद केलेल्या मुद्द्यांपैकी एखाद्याला पूरक ठरेल अशी कमेंट केली तर ती कमेंट ३६ तासांच्या आत त्या साइटवरून काढण्यात यावी. तसे झाले नाही तर त्या व्यक्तीबरोबरच त्या साइट कंपनीलाही आरोपी ठरवून कोर्टात खेचले जाणार आहे. मग ती साइट देशातील असो किंवा परदेशातील. समजा एखाद्या व्यक्तीने फेसबुकवर कसाबच्या फाशीसंदर्भात एखादी कमेंट केली तर, ती या नव्या नियमानुसार गुन्हा ठरू शकेल. ही कमेंट फेसबुकने ३६ तासांत डिलिट केली नाही तर, त्या व्यक्तीच्या आणि फेसबुकच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येईल. आता कमेंट करणारी व्यक्ती जर भारतात असेल तर, त्याला पकडणे सोपे आहे. परंतु, जर ती व्यक्ती परदेशात असेल तर त्याला पकडण्यासाठी त्या संबंधित देशाशी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल. त्या देशातील नियमांनुसार इंटरनेटवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने नसतील तर ती व्यक्ती तेथील कायद्यानुसार गुन्हेगार ठरणार नाही.

तसाच मुद्दा वेबसाइट कंपन्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे जर या प्रकरणी पोलिसांनी फेसबुकच्या विरोधात तक्रार दाखल केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वप्रथम भारताला अमेरिकेकडून परवानगी घ्यावी लागेल कारण भारतात फेसबुकचे कोणतेही र्सव्हर अथवा अधिकृत कार्यालय नाही. नियमातील विशेषत: या भागाला गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांनी विरोध केला आहे. तसेच या प्रकरणी जर कोणी पकडले गेलेच तर त्यांना दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तर हे नियम म्हणजे खरेखुरे हॅकर्स किंवा इंटरनेटचा गैरवापर करणाऱ्यांवर बंधने आणणारे नसून उलट सामान्य व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे असल्याचे सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे कार्यकारी संचालक सुनील अब्राहम यांनी स्पष्ट केले.

सायबर कॅफे चालकांना आंदण?

नव्या नियमावलीनुसार सायबर कॅफे चालकांना सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक बंधणे घालण्यात आली आहेत. मात्र यासाठी त्यांना दिलेल्या अधिकारांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर यानिमित्ताने आपली खासगी माहिती सायबर कॅफेचालक संग्रहीत करून ठेवू शकतो हे धोक्याचे असल्याचे अब्राहम यांनी स्पष्ट केले. नियमांनुसार सायबर कॅफे चालकाने त्याच्या कॅफेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत काढून ठेवणे, फोन नंबर घेणे तसेचत्याच्या इंटरनेट ब्राऊजिंगची माहितीही संग्रहीत करून ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात एवढी माहिती स्टोअर करून ठेवण्यासाठी सर्वच कॅफे धारकांकडे तेवढी स्पेस नसते, आणि असली तरी आपण केलेले ब्राऊजिंग आणि आपण त्याला दिलेली वैयक्तिक माहिती या सर्व गोष्टींचा तो गैरवापर करू शकतो. प्रत्यक्षात ही माहिती कोर्टाच्या परवानगी शिवाय कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला देता येणार नाही असे नियमांत आहे मात्र यावर लक्ष कोण ठेवणार?

सरकारची भूमिका

सायबर जगतात होणारी घुसखोरी आणि सामान्यांकडून आलेल्या तक्रारी विचारात घेऊन ही नियमावली तयार करण्यात आली आहे. आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान कायदा २००० सालचा असून, यापूवीर् २००८मध्ये त्यात काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी ठरविलेल्या काही नियम ११ एप्रिल २०११ रोजी जाहीर करण्यात आले असून त्याची कठोर अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव आर. चंदशेखर यांनी स्पष्ट केलेय.

तज्ज्ञांचा विरोध

सरकारच्या या नव्या नियमावलीला तज्ज्ञांनी प्रसार माध्यमे तसेच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मोठा विरोध केला आहे. अब्राहम यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीने कोणत्याही वेबसाइटवर अथवा ब्लॉगवर आपली कमेंट टाकली आणि ती या नियमावलीत नमूद केलेल्या बेकायदेशीर मुद्द्यांमध्ये सापडली तर त्या ब्लॉगच्या मालकालाही शिक्षा होणार आहे, यामुळे बड्या कंपन्यांबरोबरच ब्लॉगचालकांनीही याला विरोध केला आहे.
-अनामिक

मराठी हास्यकट्टा 8

गंपूचा पाय काळानिळा पडला.
डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल.
ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला.
डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आहे.... :D

***************
शिक्षक इंग्रजी अल्फाबेट्स शिकवत असतात.

शिक्षक : मुलांनो सांगा 'ए' च्या पुढे काय येतं??

गंपू : (खूप विचार करून)

क्या बोलती तू !!

***************
गोट्या दारू पिवून उशिरा रात्री घरी येतो. त्याला कल्पना असते कि त्याची बायको गंगू दरवाजा उघडणार नाही म्हणून तो युक्ती करतो आणि गुलाबाचे फुल आणण्याचे नाटक करतो, दरवाज्यावर ठक ठक करतो आणि म्हणतो : मी एका सुंदर स्त्री साठी गुलाबाचे फुल आणले आहे. गंगू दरवाजा उघडते आणि विचारते : फुल कोठे आहे. ? गोट्या : सुंदर स्त्री कोठे आहे ?

***************
पिंकी : तू आजीच्या वाढदिवसाला तिला काय भेट देणार?
गंपू : फुटबॉल!
पिंकी : ...पण आजी कुठे फुटबॉल खेळते?
गंपू : पण तिने माझ्या वाढदिवसाला 'भगवद्गीता ' दिली होती!!
September 18 at 11:46pm
***************
एकदा एक माणूस नदीत बुडत असतो...आणि ओरडत असतो,
"बाप्पा मला वाचवा, बाप्पा मला वाचवा!!"
तिथे गणपती बाप्पा प्रकट होतात आणि जोरजोरात नाचू लागतात ...
तो माणूस म्हणतो, "बाप्पा मला वाचवायचं सोडून नाचताय काय?".....
बाप्पा म्हणतात.....
"वा रे वा !, माझ्या विसर्जनाच्या वेळेला किती जोरजोरात नाचत होतास!!
गणपती बाप्पा मोरया ...!
September 1 at 12:22am
***************
गंपू : मरताना माणसाला काय द्यायला हवं?
झंपू : बिर्ला व्हाइट सिमेंट.
गंपू : का?
झंपू : क्यूँ की इस सिमेंट में जान हैं!!
***************
उंदिरांची टोळी तलवारी घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?
उंदिर : .. तिकडे हत्तीच्या आयटमला कोणीतरी प्रपोज केला आणि
नाव आमच्यावर आलंय... :)

***************

समजा तुम्हाला एखादा कोंबडा हातात दिला आणि सांगितलं कि ह्याची कोंबडी करा. तर कशी कराल..?????
सांगा सांगा
लवकर सांगा
.
विचार करा...
.
.
डोकं खाजवा...
.
.
नाही जमत..??
.
.
सोप्पंय...
.
.
वरती एक वेलांटी लावली कि झाली कोंबडी..!!!!
October 5 at 12:24pm
***************

Tuesday, October 4, 2011

दसरा SMS

दसरा  SMS


*************************

आपटयाची पानं त्याला हृदयाचा आकार,
मनाचे बंध त्यांना प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,
"विजयादशमी"च्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.
!!!!सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
*****************************************
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या...
ठेवुनी चेहरा हसरा, दुख सगळे विसरा....
सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा....
करुनी वध रावणाचा, राम राज्याने दिला आसरा....
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा.....
*****************************************
मराठी संस्कृतीचा ठेउनिया मान
तुम्हा सर्वाना देतो मी सोनियाचे पान...

सोने घेताना ...ठेवा चेहरा ' हसरा '
तुम्हा सर्वाना ... " शुभ दसरा "
*****************************************
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी..
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी..
दस-याच्या लाख - लाख शुभेच्छा !
*****************************************
लावा दारी ,
सुखाचे किरण येऊदे घरी ,
पूर्ण होवूदे तुमच्या सर्व इच्छा ,
विजया दशमीच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!!!
*****************************************
मराठी अस्मितेची मराठी शान"
मराठी परंपरेचा मराठी मान"
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येयील"
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान"

... शुभ दसरा !!!..

सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
सोनं घ्या सोन्यासारखं राव्हा!!!!
*****************************************
दारात फुले झेंडूची,
लूट करा आज सोन्याची,
तुमच्या जीवनी धारा वाहू दे हर्षाची,
ही एकच शुभेच्छा दसर्‍याची…..
सर्वांना विजयादशमीच्या खुप साऱ्या मंगलमयी शुभेच्छा.!!!!

Monday, October 3, 2011

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...


खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...
काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.
-अनामिक

Sunday, October 2, 2011

मराठी हास्यकट्टा 10

बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.
चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.
चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'

********************

गंपू : तव्यावर ठेवल्यावर पॉपकॉर्न ताडताड का उडतो?
झंपू : स्वत: बसून बघ, मग कळेल!!
October 3 at 6:22pm
********************
जगात अशी कुठली गोष्ट आहे कि जी तुमच्या विचारांना शब्दात बदलवते ?
?
?
?
?
... ... ?
?
?
?
?
?
?
अहो दारू
********************
सगळ्या सरदारांना अजुन पर्यंत समाजल नहीं की...
.

.
" अन्ना हजारे ने इतके दिवस तर कही खाल्लेल नहीं.
.
.
.
पण तरी ते बिल कशाच मागत आहे.?".
********************
बायको : अहो, खर सांगा ना.
नवरा : काय ?
बायको : तुम्हाला कधि असं वाटलं कां, जर माझ लग्न दुसऱ्या कुणाशी झालं असत तर.........
नवरा : नाही, मी कुणा बद्दल असा वाईट विचार करत नसतो... :)
********************
मलिंगाची आई : "बाळा, जरा केस कापून ये!"
मलिंगा : "का ग, आई ?"
.
.
मलिंगाची आई : "पितळेची भांडी घासायची आहेत, काथ्या संपला आहे!".....
********************
ऑपरेशन झाल्यावर पेशंट डॉक्टरला विचारतो की, डॉक्टर साहेब मी आता पूर्ण बरा झालो आहे ना!
समोरून उत्तर येते, बेटा डॉक्टर साहेब भूतलावर राहिलेत, मी तर चित्रगुप्त आहे!!!!!! :) :)

********************

पती : अगं ... महागाई खूप वाढलीय . यावेळी तू
तुझ्या बर्थडेसाठी जरा कमीच खरेदी कर .
पत्नी : बरं ... मी यावेळी केकवर लावण्यासाठी ४० च्याऐवजी २५च मेणबत्त्या घेईन .

********************
परीक्षा सुरू असते. सगळी मुलं भरभर पेपर लिहित असतात. एकटा गंपू प्रचंड टेन्शनमध्ये असतो. शिक्षक त्याच्याजवळ येऊन विचारपूस करू लागतात..
शिक्षक : काय रे, टेन्शन आलंय का?.... रोल नंबर विसरलास का?... पेन नाहीये?... की, कॅलक्यूलेटर राहिलं घरी??
गंपू : गप्प बसा ओ.... मी चुकीच्या विषयाची चिट आणलीये आणि तुम्हाला पेन-पेन्सिलचं पडलंय....

********************

डॉक्टर : (पेशंटला) दिवसातून रोज दोन-तीन किलोमीटर पायी चालत फिरा. तब्येत चांगली राहील.
पेशंट : काही फरक पडत नाही. दुसरं काही सांगा. मी पोस्टमन आहे.
********************

एक मालवणी गृहस्थ देवळात जातात.
गृहस्थ : यंदा माझी बायपास झाली असा. तो नवस फेडाक इलंय. जरा जोरदार गाऱ्हाना होऊ द्या.
पुजारी : देवा म्हाराजा, यंदा यांची बायपास झाली हा, तशी दरवर्षी होऊ दे रे म्हाराजा...!

********************
गंपू : प्रिये, तू माझ्या हृदयात, श्वासात, स्वप्नात राहतेस....

गर्लफ्रेण्ड : नाही रे... मी अंधेरीत राहते!

Saturday, October 1, 2011

गो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली

गो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली...



गो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली

गो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली

नव-या मुलाची आली हळद ही ऒली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली

हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा

सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी

सासरच्या ऒढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव आला नारायण ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग पोरं-थोरं, ताशा वाजिलं

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला

जड जीव झाला लेक जाय सासराला
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं

सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी… गं पोरी सुखाच्या सरी…

सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
-गुरु ठाकूर (चित्रपट: तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं)