वाट जरी ओळखीची, वळणं वाकडी रस्त्याची..
ओळख आपली जुनी, शाळेतल्या एका वर्गातली..
शब्द जरी नाही मिळाले, भावना तुझ्या मांडयाचीस..
नयनांची भाषा ती, किती छान सांगायचीस..
मायना नसला तरी, शब्द रचना करायचीस..
भिजलेल्या नयनांनी भावना मात्र सांडायचीस..
लाटानविना सागर म्हणजे, भक्ती वाचून देव..
शब्द तुझे ओठातले, भावनांना आलेले पेव..
तर्कांनी वेढलेले जग, वसलेले मनी तुझ्या..
मूर्ती तुझी सोज्वळ, वसलेली मनी माझ्या..
विस्तावासारखे विचार, मनी आग, मग धग काय..?
किती करशील तर्क, मग पाहिलेल्या स्वप्नांना अर्थ काय..??
असतो गुंतत सोडवताना, किती मारल्यास गाठी..
साप आला आडवा, तरीही मोडते ती काठी..
कितीही आणि कशाही का असतात अपेक्षा..
मनची कुठलीही आशा तुझं वाचून होते निराशा..
म्हणाली असतीस चुकले, तरी असते माझे भागले..
मनात मावणार नाही इतके, इतके प्रेम मी असते दिले..
आहे न प्रीत मग, अहम पणा बाळगू नकोस..
माझं असलं मन, असे पटकन तोडू नकोस..
प्रत्येक वेळी नाही फिरत देहा भोवती दृष्टी..
कधी कधी असतो कुणी कुणासाठी कष्टी..
सख्या माझ्या, ऐकण्या शब्द आसुसलेले माझे कान..
प्रीतीचे अंगण दारी तुझ्या, ऐकण्या शब्द ओतलेले प्राण..
जिंकशील किंवा हरशील, आशा बाळगू नको..
कधी उदार होवून बघ, बचतीची तमा बाळगू नको..
-मयूर आपटे
0 comments:
Post a Comment