केवळ श्रद्धांजली वाहण्याकरता हत्तींचा एक कळपच्या कळप वीस किमीचा प्रदीर्घ प्रवास करून त्यांच्या घरी आला.
पण, त्यांना त्यांचा मृत्यू झाल्याचं कळलं कसं असेल?
कुणी आणि कसं सांगितलं असेल?
मनुष्यमात्राच्या समजुतीच्या बाहेरच्या अतार्किक अशा काही गोष्टी ह्या जगतात आहेत काय?
लॉरेन्स अँथनी म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आता एक लोककथा बनून राहिली आहे. लॉरेन्सनी आतापर्यंत ३ पुस्तक लिहिली आहेत. त्यापैकी The Elephant Whisperer हे एक होय. वनचर प्राण्यांना वाचवून त्यांनी जगभर त्यांच्या पुनर्वसनाचं मोठंच कार्य केलं आहे. २००३ मधील अमेरिकेच्या आक्रमणातून बगदाद प्राणि संग्रहलयातील वाचवण्याचं धाडसी काम त्यांनीच केलं. मार्च ७, २०१२ ह्या दिवशी लॉरेन्स मरण पावले. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी आणि दोन नातू आहेत. आणि त्यांचे सखे… शेकडो हत्ती!
त्यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी ३१ हत्तींचा एक कळप, दोन पुढारी हत्तिणींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरी आले. आणि त्यांनी आपल्या प्रिय मानव-मित्राला अखेरचं निरोपाचं वंदन केलं. त्या अखेरच्या निरोपाकरता द. आफ्रिकेतील त्यांच्या घरी पोचायचं म्हणून त्या ३१ हत्तींनी अत्यंत शांतपणं, थोडाथोडका नव्हे तर २० किलोमीटरचा प्रवास केला.
ते विलक्षण दृश्य पाहून आसपासचे लोक थक्क झाले. केवळ त्या हत्तींनी दाखवलेल्या अफाट बुद्धित्तेमुळंच नव्हे. तर लॉरेन्स यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं तरी कसं ह्यामुळं, हे स्थान त्या हत्तींच्या लक्षात राहिलं कसं ह्यामुळं आणि हत्तींच्या कृतज्ञतेच्या भावनेमुळं लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पुन्हा इतक्या शिस्तशीरपणं अगदी एका रांगेत चालत येणं त्यांना कसं जमलं असेल, ते कोण सांगणार!
लॉरेन्सची पत्नी फ्रान्स्वाज (Francoise) अगदी हेलावून गेली. कारण, गेल्या तीन वर्षांत ते हत्ती त्यांच्या घरी एकदाही आले नव्हते! तरीही आपण कुठं जात आहोत, ह्याची त्यांना नेमकी माहिती होती. आपल्याला संरक्षण देणाऱ्या आपल्या मित्राला अखेरची मानवंदना देण्याकरताच केवळ त्यांनी हा प्रदीर्घ प्रवास केला होता.
तसेच आदरांजली वाहण्याकरता दोन दिवस आणि दोन रात्री ते सगळे हत्ती काहीही अन्नपाणी वर्ज्य करून घराच्या अंगणात बसून राहिले. आणि दोन दिवसांनंतर आले तसेच परत गेले.
कुणाही माणसाच्या समजशक्तीच्या आवाक्यात न येणारी ही सत्यकथा वाचून आपलंही मन भरून आल्याविना राहणार नाही.
या बातमीचा स्त्रोत...
: http://www.nativevillage.org/
Source : fb
0 comments:
Post a Comment