तुम्ही दोन मित्र एकमेकांना भेटला, तर तुम्हांला किती आनंद होतो ! आणि पुष्कळ वर्षांनी भेटलात तर हा आनंद आणखी शतपट असतो. दोन मित्रांच्या भेटीत गोडी असते. कारण तेथे निर्मळ प्रेम असते. परंतु दोन थोर पुरुष परस्परांस भेटतात तेव्हा तर अपूर्व गोडी असते. ती चंद्रसूर्यांची भेट असते. हरिहरांची ती भेट असते. समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांची अशीच एकदा भेट झाली होती. एका नदीकिनारी या दोन साधूंचे काय बोलणे होणार म्हणून हजारो लोक जमले होते. परंतु एकाने पाण्यात दगड टाकला. दुसऱ्याने आकाशाकडे बोट केले. दोघे निघून गेले. त्याचा अर्थ काय? एकजण म्हणाला : ‘पाण्यात दगड बुडतो त्याप्रमाणे हे लोक संसारात बुडत आहेत.’ दुसरा म्हणाला : काय करणार? प्रभूची इच्छा.’
~ साने गुरुजी
0 comments:
Post a Comment