Saturday, February 26, 2022

स्वा सावरकर पुण्यतिथी

आजच्याच दिवशी भारत मातेला सोडून तिचा प्रिय पुत्र गेला तेव्हा ती ढसाढसा रडली. #स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन म्हणजे एक धगधगते यज्ञकुंडच. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे फक्त अनुसरण नाही तर अनुकरण करणारे स्वा. सावरकर. जसा सूर्य या जगातील अंधार दूर करतो नि सर्व प्राणिमात्रांना जगण्याची शक्ती देतो. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे #क्रांतीसूर्य. त्यांनी स्वतःच्या तेजाने लाखो तरुणांच्या मनात क्रांतीज्योतीची मशाल पेटविली. ती मशाल एवढी पेटली की त्याची धग इंग्रजांना सहन नाही झाली त्यांना येथून शेवटी हाकलून लावले गेले. पण आजच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले त्याग नि देशकार्य भारतातील काही लोकांना कळत नाही हे आपले दुर्भाग्य. मृत्यूला पण न घाबरणारे मृत्युंजय सावरकर. स्वतः तात्या म्हणतात की “मला मुसलमान नि ख्रिश्चनाची भीती वाटत नाही, मला भीती वाटते ती हिंदुत्वाशी वैर असलेला हिंदूचीच. यांचीच प्रचिती त्यांना प्रत्यक्ष कार्य करताना वेळोवेळी आली. पण त्या गोष्टीला न जुमानता तात्यांनी आपले देशकार्य चालू ठेवले. यावर भिडे गुरुजींच्या एक श्लोक आठवतो. 
    असंख्यात गेले विरोधात लोक ।
    तरी घालणें ना यमालाही भीक ।। 
    जरी सागरा एवढे म्लेंच्छ आले ।
    ‘शिवाजी' आणि मावळे नाही भ्याले ।।

शेवटी एवढेच सांगतो जर संपूर्ण हिंदू समाजाने जर स्वा. सावरकर समजून जर फक्त अनुसरण न करता अनुकरण केले तर निश्चितच आपण तात्यांच्या मनातील इतिहासातील सातवे सोनेरी पान लिहू शकू. ते आज जरी आपल्यात नसले तरी ते त्यांच्या कार्याने नि पुस्तक रूपाने आपल्यात जीवित आहेत. 
  आजच्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी प्रायोपवेशन करून त्यांनी आत्मार्पण केले. #हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन.



- विठ्ठल वाघ 

#हिंदु_संघटक_सावरकर #सावरकरी_विचाररत्ने #अखंड_हिंदुस्थान #सावरकर #vitthal_wagh #वीर_सावरकर #द्रष्टे_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर


0 comments: