हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने परवा आणखी एका ठिकाणी नवीन ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते. म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला नाही पण गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते.
पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं आहेत. नळ स्टॉप जवळील ऑफिसच्या २ टॉवरला प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ पिंगल आणि आर्यभट यांची नावं आहेत. सेनापती बापट रोड च्या ऑफिस इमारतीला भगीरथ. तसेच इमारतीमध्ये आतल्या बाजूने ठिकठिकाणी वेदातील संदर्भ भिंतीवर दर्शविलेले आहेत.
केवळ हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ असं बोलून काही होत नाही. त्याचं श्रेष्ठत्व टिकवायला कृतीतून संदेश द्यावा लागतो आणि या कंपनीने तो वेळोवेळी दिलाय. या कंपनीतलं वातावरण मी जवळून अनुभवलंय (अडीच वर्ष काम केलंय ). अगदी लहान गोष्ट सांगतो , आयटी कंपनी असूनही इथल्या महिला सदस्य अगदी 'हळदी कुंकू' सारखा संस्कार सणही इथे मोठ्या आनंदाने साजरा करतात. सत्यनारायणाची पूजाही रीतसर घातली जाते. हे सगळं करूनही Persistent ही आयटी क्षेत्रात एका वेगळ्याच शिखरावर विराजमान आहे. गेल्या तिमाहीत तब्बल १४९१ करोड रुपयांचा रेव्हेन्यू आहे.
इथे काम करणारा हा 'कामगार' नाही तर Persistent परिवाराचा 'सदस्य' असतो. जगभर तब्बल १५ हजारहुन सदस्य असणाऱ्या या कंपनीची उलाढाल शेकडो कोटींमध्ये आहे. साधी रहाणी- उच्च विचारसरणी म्हणून रतन टाटा यांना आपण ओळखतो मात्र मराठमोळे आनंद देशपांडे सर हे तितकंच भावलेलं व्यक्तिमत्व.
- Rohit Pawar रोहित पवार (एक माजी सदस्य)
0 comments:
Post a Comment