Showing posts with label बातमी. Show all posts
Showing posts with label बातमी. Show all posts

Sunday, August 2, 2026

पुस्तक परिचय




आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या साईड इफेक्ट्स ( डिंपल पब्लिकेशन )  या गूढकथा संग्रहाचे पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कवयित्री, अनुवादक प्रा सुजाता राऊत आणि म.टाइम्सचे संपादक यांचे मनापासून आभार. संपूर्ण परीक्षण text स्वरूपात खाली दिले आहे. 

** मनाच्या डोहातील गूढ तरंग **
मानवी मनाचे पदर अनाकलनीय अतर्क्य व अथांग आहेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड Mystery म्हणजे गूढ याविषयी बोलताना म्हणतो खरं गूढ हे बाह्य गोष्टीत नसून मनाच्या आतच दडलेलं आहे व हा मनाचा प्रवास थक्क करणारा आहे.
      लेखक, चित्रकार, कवी रामदास खरे यांच्या साईड इफेक्ट्स या गूढ कथासंग्रहाचे वाचन करताना आपल्याला याचा प्रत्यय येतो. मराठीत रहस्यकथा,भयकथा, गूढकथा यांना सहसा एकच मापदंड लावला जातो. पण या तीनही कथाप्रकारांची स्वतःची अशी शक्तीस्थळं आहेत. त्यातही गूढकथेचा आवाका मोठा आहे. फक्त रहस्य उलगडणे किंवा वाचकाच्या मनात थरार निर्माण करणे यापुरतीच गूढकथा सीमित नाही. 
        उत्कृष्ट साहित्यरचनेसाठी आवश्यक असणारे काही घटक असतात ज्यामध्ये पात्रनिर्मिती,वातावरण भवतालाचे तपशील व मुख्य म्हणजे मनाचा प्रवास असतो. प्रस्तुत गूढकथासंग्रहात हे सर्व घटक संतुलित पद्धतीने आले आहेत.म्हणूनच या कथा परिणामकारक ठरतात. या सर्व कथांमध्ये प्रथमपुरुषी किंवा तृतीयपुरुषी निवेदन आहे. त्यातून कथा उलगडत जातात. गूढकथा आहेत म्हणजे सतत भीतीची काळीशार सावली जाणवत राहील असा लेखकाचा कुठेही प्रयत्न नाही. उलट अगदी सहज नेहमीच्या संवादातून या कथा उलगडतात.
      सरप्राईज ही कथा मैथिली व मिलिंद या दांपत्याची आहे. भर पावसाळ्यातल्या दिवशी मैथिलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद सरप्राईज देणार असतो. पण प्रत्यक्षात काय घडतं? कोणतं सरप्राईज मिळतं हे उत्तम रीतीने लेखकाने हाताळलेलं आहे. ड्रीमलँड या कथेतला नायक व त्याचा मित्र जगू या दोघांच्या संवादातून उलगडत जाते. जगूला पडणाऱ्या स्वप्नांनी नायकाबरोबरच आपणही अस्वस्थ होतो. पण शेवटी जगूच्या आयुष्यात काय घडतं? हे मुळातून वाचलं पाहिजे.
       मानवी आयुष्याचा प्रवास हा सरळ रेषेसारखा नाही. नियतीचं अतर्क्य असं गूढ त्यामध्ये दडलेलं आहे. मुख्य म्हणजे मनाच्या या डोहामागे काय अद्भुत गहन तरंग लपलेले आहेत याचा अंदाज आपण लावू शकत नाही. रामदास खरे यांच्या सर्वच कथांमध्ये हे समान सूत्र दिसतं.
      कोंड ही यातील एक उत्कृष्ट कथा आहे. गावच्या जमिनीचा व्यवहार बघायला आलेला मध्यमवयीन नायक,तिथे भेटलेली नाजूक पावलांची राधा, तिच्या आयुष्यातला पेच हे साकारत जातं. या कथेचा शेवट अगदी वेगळा व कथेला उंचीवर नेणारा आहे. लेखकाचे संवाद नेमके व सहज आहेत आणि भाषा चित्र समोर उभी करणारी आहे. शब्दांचा वापर अचूक आहे. उदाहरणार्थ “आठवणींचा आग्यामोहोळ फुटलेला. माझ्या कृश गात्रांच्या फांद्यावर हट्टाने चिकटून बसलेला आठवणींचा सनातन थर. घाटांची आवर्तन सुरू झालीयेत” अशा पद्धतीचे वर्णन व निवेदन अनेक कथांमध्ये आढळते. अबाधित या कथेतील देवचाराचे वर्णन खिळवून टाकेल असे आहे. या कथेत व इतरही काही कथांमध्ये कोकणचे, तिथल्या भवतालाचे संदर्भ व वर्णन येते. गूढ फक्त घटनांमध्ये नसते, ते भवतालात, चराचरात, आसमंतात भरलेले असते. मनाच्या आतल्या प्रदेशात तर असतेच असते. कोकणची ही पार्श्वभूमी काही कथांमध्ये एखादे मुख्य पात्र असल्यासारखी समोर येते. “निळभोर आभाळ ,विस्तीर्ण नदीकाठ, हिरव्या गर्द डोंगरांची पार्श्वभूमी लाभलेली. झाडांच्या उलट्या सावल्या पाण्यात विरघळत चालल्यात शांतपणे. कसलीही घाई नाहीये .सगळं कसं निस्तब्ध निवांत. पेंटिंग साठी पोषक वातावरण” हे कोंड या कथेतील वर्णन.
     काळीशार गर्द सावली, जाळं, नेक्स्ट अशा अनेक कथांमध्ये पात्रांचा भवताल व घटना त्यातील नाट्य फुलवलेले आहे. अनेक कथांचा शेवट हा सूचक आहे. त्यातील गूढ वाचकांना खुणावत राहतं. काही कथांमध्ये बरेच तपशील येतात. उदाहरणार्थ नेक्स्ट ही कथा. पण कथेची घडण होण्यासाठी ते आवश्यक वाटतात. या कथा फक्त घटना समोर ठेवत नाहीत तर त्यामध्ये गुंतलेल्या माणसांचे मनोव्यापारही समोर येतात. या सर्व कथांची गुंफण सहज आहे. रहस्य समोर ठेवायचं, वाचकाला भयाने गारद करावं किंवा उगाच संमोहाच्या आवर्तात ठेवावं अशी कुठलीही भूमिका नाही. उलट प्रवाही निवेदनात कथा समोर येतात. काही कथांचा पैस मोठा आहे. उदाहरणार्थ डायरी, मुक्ती या कथा. त्यासाठी अधिक विस्तृत स्वरूपात खोल आशय या कथा नक्कीच व्यक्त करू शकतात.यापुढे लेखकाने अशा पद्धतीच्या दीर्घकथा लेखनाकडे वळावं असं वाटतं. 
     डिंपल प्रकाशनाने त्यांच्या परंपरेला साजेशी अशी पुस्तकाची निर्मिती केली आहे. आजचे महत्त्वाचे कथालेखक व चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी समर्पक शब्दात पुस्तकाची पाठराखण केली आहे. लेखकानेच या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे. त्यातील गडद लाल,केशरी काळ्या रंगात या कथांचे साईड इफेक्ट चित्रित झालेले आहेत. मनाला संमोहित करणारे गूढ अनुभव देणारे हे पुस्तक वाचताना आपण मानवी मनाच्या गूढगर्द अरण्यात प्रवेश करतो व रमून जातो.
      – सुजाता राऊत, ठाणे. 

साईड इफेक्ट्स (गूढकथा )
रामदास खरे
डिंपल पब्लिकेशन,वसई. 
पृष्ठे :१२२, मूल्य रू.२००/

Friday, May 15, 2026

बातमी

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. माणसाच्या मनाचा वेध घेणारा, मानसिक आरोग्याबद्दल समाजात संवेदनशील संवाद घडवून आणणारा आवाज आज हरपला. त्यांच्या लेखनातून, विचारांतून आणि कामातून अनेकांना स्वतःकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळाली. 

समकालीन प्रकाशनतर्फे डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐

Tuesday, May 5, 2026

Saturday, February 26, 2022

बातमी

हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते  संस्थापक आहेत. तब्बल  १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने परवा आणखी एका ठिकाणी नवीन ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला. 
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते. म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला  नाही पण गणेशमूर्ती  स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते. 
पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं आहेत. नळ स्टॉप जवळील ऑफिसच्या २ टॉवरला प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ पिंगल आणि आर्यभट यांची नावं आहेत. सेनापती बापट रोड च्या ऑफिस इमारतीला भगीरथ. तसेच इमारतीमध्ये आतल्या बाजूने  ठिकठिकाणी वेदातील संदर्भ भिंतीवर दर्शविलेले आहेत. 
केवळ हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ असं बोलून काही होत नाही. त्याचं श्रेष्ठत्व टिकवायला कृतीतून संदेश द्यावा लागतो आणि या कंपनीने तो वेळोवेळी दिलाय. या कंपनीतलं वातावरण मी जवळून अनुभवलंय (अडीच वर्ष काम केलंय ). अगदी लहान गोष्ट सांगतो , आयटी कंपनी असूनही इथल्या महिला सदस्य अगदी 'हळदी कुंकू' सारखा संस्कार सणही इथे मोठ्या आनंदाने साजरा करतात. सत्यनारायणाची पूजाही रीतसर घातली जाते.  हे सगळं करूनही Persistent ही आयटी क्षेत्रात एका वेगळ्याच शिखरावर विराजमान आहे. गेल्या तिमाहीत तब्बल १४९१ करोड रुपयांचा रेव्हेन्यू आहे. 
इथे काम करणारा हा 'कामगार' नाही तर Persistent परिवाराचा 'सदस्य' असतो. जगभर तब्बल १५ हजारहुन सदस्य असणाऱ्या या कंपनीची उलाढाल शेकडो कोटींमध्ये आहे. साधी रहाणी- उच्च विचारसरणी म्हणून रतन टाटा यांना आपण ओळखतो मात्र मराठमोळे आनंद देशपांडे सर हे तितकंच भावलेलं व्यक्तिमत्व. 
- Rohit Pawar  रोहित पवार (एक माजी सदस्य)


Wednesday, May 27, 2020

बातमी

भारतीय राज्यघटनेचे प्रकरण चार - विशेष निदेशक तत्त्वे : अनुच्छेद ३५०-क प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी - प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि अशा सोयी पुरविणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रपती स्वत:ला आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. असे असता प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण झाले असून ते तात्काळ थांबवावे.
#मराठीशाळावाचवा
#मातृभाषेतूनशिक्षण

#मराठीएकीकरणसमिती


Tuesday, May 5, 2020

Friday, May 1, 2020

गोष्ट कोकणातली


#Goshtakokanatli

आज दिनांक १ में २०२० रोजी

आपलो गाववालो अनिकेत रासम पेपरात झळकलो आसा!☺️ अभिनंदन त्याचे ! 👏👏👏👏


महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩



Saturday, January 25, 2020

Monday, June 24, 2019

बातमी

राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची सक्ती तामिळनाडूच्या धर्तीवर झाले पाहिजे यासाठी विकास प्राधिकरण कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शाळा बंद पडू नये यासाठी मराठी शाळांच्या गुणवत्तेबाब सक्षमीकरण करणे, मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे अशा मागण्या मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाने केल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी सक्तीचे करण्यात यावे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/20/marathi-language-is-compulsory-in-all-education-boards.html

Tuesday, December 11, 2018

बालसाहित्य पुरस्कार

मित्रांनो आनंदाची गोष्ट.....
मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, काव्यकोडी लिहिणं आणि लिहिलेलं मुलांपुढे सादर करणं , हाच माझा प्रांत. मुलांना त्यातून झालेला आनंदच माझ्या  पुढील लेखनासाठी ऊर्जेचा स्त्रोत बनत गेला .खरंतर, याच प्रक्रियेतून माझ्या लेखनाची वाटचाल गेली २६ वर्षे  सुरु आहे. आजमितिस २५ पुस्तके लिहिली. पुस्तकांच्या ब्रेल लीपी आवृत्या निघाल्या. हिंदी, इंग्रजीत अनुवाद झाले. पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील बालदोस्तांनी माझ्या पुस्तकांवर भरभरुन प्रेम केलं. 
आज याच टप्प्यावर माझ्या एकूणच प्रयोगशील लेखनासाठी मातोश्री स्नेहप्रभा तौर बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय. बुलडाणा येथे संपन्न होणाऱ्या बालसाहित्य परिषदेत हा पुरस्कार  मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
तौर परिवाराचे यासाठी मनापासून आभार.
https://www.facebook.com/eknath.avhad.3

Monday, November 14, 2016