#news
"नमस्कार, संध्याकाळचे सात वाजतायत. मी प्रदीप भिडे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर..." अशी ज्यांची सहज शब्दफेक ऐकत आपण सारेच मोठे झालो, ते महाराष्टाच्या मनामनात स्वतःचं स्थान निर्माण करणारे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
दूरदर्शनवरील बातम्या हाच ज्या काळात सर्वांच्या माहितीचा आधार होता, तेव्हापासून वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात उतरलेल्या भिडे यांची मराठी बातम्यांवर अमीट छाप पडली होती. काळ कितीही बदलला तरी ती कायम राहील.
१९९४-९५ पासून दूरदर्शनवर, सह्याद्री वाहिनीवर काम करताना मला त्यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले, मार्गदर्शन लाभले.
सदैव हसरा चेहरा, हस्तांदोलनासाठी पुढे असणारा हात आणि "काय रे कसा आहेस" हा आपुलकीचा आवाज म्हणजे भिडे साहेब.
आज दूरदर्शनमधील त्या सर्व आठवणी मनात दाटून आल्या आहेत...
भिडेसाहेब... भावपूर्ण श्रद्धांजली !
#महेश_म्हात्रे
...............
DD सह्याद्री वर चे माझ्या आवडते वृत्त निवेदक होते !
😢भावपूर्ण श्रद्धांजली !
जसं जसं वय वाढत जातंय तसं तसं नश्वर जगाची आठवण करून देते !
ॐ शांती ! 🙏
........
ई अक्षरमन
......
दूरदर्शनचा आवाज असलेले प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन.
..
सूत्रसंचालन, मुलाखत आणि वृत्तनिवेदन यांच्या धीरगंभीर आणि सुस्पष्ट आवाजाला भावपूर्ण श्रद्धांजली.
..
दूरदर्शनरून ज्यांच्या ७ च्या बातम्या ऐकत लहानाचा मोठा झालो. ज्यांच्या भारदस्त आवाजानं कायम भुरळ घातली. ज्यांनी वृत्तविवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात, मनामनात स्थान निर्माण केलं असे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे.
.
Tejas K
0 comments:
Post a Comment