Sunday, June 19, 2022

Post 1

गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे-  कवी आरती प्रभू  
[माझ्या 'मराठीतील काव्यरंग' या नवीनतम पुस्तकातून]
प्रस्तुती - श्रीनिवास हवालदार   
गेले दयायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया
आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा
 'नक्षत्रांचे देणे' ची पहिली ओळख एका दूरदर्शन वाहिनीवर बरेच वर्षांपूर्वी झाली. मराठीच्या  अनेक प्रसिद्ध कवी , संगीत नियोजक इत्यादिंच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल निर्मित केलेला हा धारावाहिक कार्यक्रम फार लोकप्रिय होता. त्यावरून असा अनुमान  केला की नक्षत्राप्रमाणे चमकणारे जे व्यक्ती समाजास भरभरून योगदान करतात त्यांना आपण ही काही देणे लागते. परंतु  'गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे'  ही आरती प्रभूं ची संगीतबद्ध कविता बरेच वेळा ऐकल्यानंतरही त्यातील धागे दोरे माझ्या पूर्व अनुमानाशी तंतोतंत जुळत नव्हते. कविता कोणाला उद्देशून आहे, त्याला काय द्यायचे राहिले आणि नक्षत्रांशी त्याचा काय संबंध असावा या बद्दल काही स्पष्ट चित्र समोर येत नव्हते. तेंव्हा आकाशातील सुदूर नक्षत्रांशी जवळीक साधणे आवश्यक होते.अंतर्जालावर नक्षत्रांबद्दल खालील माहिती मिळाल्यामुळे आरती प्रभूंची कविता उलगडण्यास मदत झाली-   
     “ पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. उदा. १) अश्विनी- कुचला २) भरणी- आवळा ३) कृत्तिका- उंबर ४) रोहिणी- जांभूळ वृक्ष वर्षांतून एकदा तरी नक्की लावावी. आयुर्वेदानुसार संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते.,” 
   आरती प्रभू आपल्या प्रिय व्यक्ती समोर आपल्या आपराधिक भावना आणि पश्चात्ताप  व्यक्त करत आहेत की माझ्या हलगर्जीपणा मुळे मी तुझ्या जन्मानंतर तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या जन्म नक्षत्राचा एक साधासा आराध्यवृक्ष ही लावून शकलो नाही आणि पालन पोषण करण्यासाठी वेळही देऊ शकलो नाही इतके वर्ष गेल्यानंतर आता मी इतका दरिद्री झालो आहे की तुझा संरक्षणासाठी माझ्याकडे वृक्षा ऐवजी फक्त काही कळ्या आणि ओली पाने शिल्लक आहेत.त्याने कदाचित तुझे प्राण वाचू शकतील.  
  मी तुझ्या भेटीसाठी हसत आलो होतो.मला माहित नव्हते की ही भेट शेवटचीच आहे. आणि आता दिवसरात्र मला पश्चात्तापाच्या अग्नीत जळावे लागणार आहे.मी आता पर्यंत दगडासारखा भावनाहीन होऊन तुझ्याशी वागलो हे शल्य मला रात्रंदिवस टोचत राहील
मला आता जाणीव होते आहे की माझ्या अशा भावनाहीन वागण्यामुळे बालपणामध्येच तुला अकाली मृत्यू येत आहे.


0 comments: