Thursday, October 10, 2024

रतन टाटा ४ शब्दांच्या पलीकडचे नाते..❤️❤️

शब्दांच्या पलीकडचे नाते..❤️❤️

आयुष्यात काही जणांकडे बघून सुद्धा छान वाटतं आणि त्यात अत्यंत शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तींच्या अवतीभवती असणं सुद्धा म्हणजे नक्की पूर्वसंचित असेल असंच वाटून जातं आणि असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शंतनू नायडू. पुण्यातील हा तरुण रतन टाटांच्या जवळ दिसताना अभिमान वाटायचा, आज वाटतं किती अनुभव आणि समृद्ध क्षण याला मिळाले असतील याची मोजदाद ही होणार नाही. याचं एक पुस्तक ‘ i came upon a light house's वाचनात आले आणि पुन्हा आज याची आठवण आली. या मुलाने रतन टाटा यांना जिंकले आणि पूर्णकालीन टाटामय होऊन गेला. आज याचा सारखा विचार येतोय रतन टाटांच्या उत्तरायणात हा सावलीसारखा त्यांच्या बरोबर होता. जिथे कुणी जाऊ शकत नव्हते तिथे याचा वावर सहज होता. ही आणि अशी सहजता आपल्या प्रत्येकाला जमायला हवी असे ही याला बघून वाटले. 

शंतनू नायडू यांच्याच पुस्तकातला हा प्रसंग, २०१६ मध्ये शंतनू नायडू एमबीएसाठी कॉर्नेल विद्यापीठात गेला.  पण त्याने टाटांना वचन दिले की एकदा त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर तो टाटा ट्रस्टसाठी पूर्ण समर्पित असेल आणि रतन टाटा यांनी आनंदाने त्यांची विनंती मान्य केली.

भारतात परतल्यानंतर, टाटांनी त्याला फोन केला आणि म्हणाले, “माझ्या ऑफिसमध्ये खूप काम करायचे आहे. तुला माझा सहाय्यक व्हायला आवडेल का?" यावर शंतनूने लगेच होकार दिला. रतन टाटा हे आधीपासूनच शंतनूच्या सुस्वभावी आणि सर्जनशील कल्पनांचे फॅन होते. रतन टाटा व्यवसाय आणि गुंतवणुकीबाबत शंतनूचा सल्ला घेतात असे ही वाचनात आहे. शंतनू नायडूने आपल्या कामाने रतन टाटा यांचे मन जिंकले आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होता. मला वाटतं जिद्द आणि चिकाटी याचं दुसरं नाव म्हणजे टाटा. जो त्यांच्याकडे आला तो त्यांचाच होवून गेला. 

From mentor to father figure,from boss to friend

सर्वेश

0 comments: