Monday, June 22, 2026

वाचकांची प्रतिक्रिया

लोकप्रिय लेखक , कवी आणि तरूणाईचा लाडका चारोळीकार चन्द्रशेखर गोखले यांच्या " मनोवेधस " या पुस्तकाची प्रथम आवृत्ती ८/१/२०२२ रोजी प्रकाशित झाली.शेखरची पत्नी सौ. उमा गोखले प्रकाशक असलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने .....१८ एप्रिल १९९० या दिवशी पारल्यातील दिक्षीत रोड वरील अनिरुध्द सोसायटीच्या गच्चीवर आमच्या शेखरच्या " मी माझा" या पहिल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले..ज्येष्ठ लेखक , नाटककार आणि पत्रकार श्री. विजय तेंडुलकर यांच्या हस्ते..शेखरची 'नीलाताई ' या नात्याने त्या प्रकाशन सोहळ्यात माझा ही सहभाग होता. अल्पावधितच ' मी माझा ' ला प्रचंड यश आणि प्रसिध्दी मिळाली...शेखर तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला.
शेखर प्राथमिक शाळेत असल्यापासूनच मी त्याच्या अंगी असलेले विविध गुण पारखत होते.माझ्याकडे तो काही विषय शिकण्यासाठी येत होता. परंतु शाळेतल्या अभ्सासापलिकडचा शेखर सतत माझं लक्ष वेधून घेत होता.
चित्रकार शेखर , लीलया नृत्याविष्कार करणारा शेखर आणि सतत काहीतरी वेगळा विचार करणारा....गोष्टी लिहिणारा शेखर...दबलेला...घाबरलेला शेखर...कारण त्या बालवयात ज्या गुणांसाठी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप त्याच्या घरातून मिळायला हवी होती ती नाही मिळाली ..त्या ऐवजी " धपाटे"च खावे लागले. ५० वर्षांपूर्वीचा काळ आणि मध्यमवर्गीय व्यवहारी विचारसरणी लक्षात घेता ती पालकांची चूक होती असेही म्हणता येणार नाही कारण ' याने तुझं पोट भरणार आहे का ? ' हा त्यांचा प्रश्ण परिस्थितीजन्य होता शिवाय ' बाल मानसशास्त्र आणि पाल्यांचा व्यक्तीमत्व विकास ' हे विषय तर त्याकाळी कोसौ मैल दूर होते.....असो !!
   चार दिवसांपूर्वीच शेखरने मला त्याचे नुकतेच प्रकाशित झालेले " मनोवेधस " पाठवले आणि सर्व आठवणी जाग्या झाल्या....उगमापाशी नदीची बारीकशी धार असते
             प्रवाह पुढे पुढे जायला लागतो
   नदी अथांग सागराशी एकरूप होते
   तिचा प्रवास थांबतो....प्रवाह नाही...
जशी " मनोवेधस "ची सप्तरंगी कथा....मला खूप भावली ! तुम्हाला ही भावेल ! जरूर वाचा !!!!!
शेखर , उमा तुम्हा दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद !!   तुमची
                नीलाताई ( नीला रवीन्द्र )
                 १५/२/२०२६

Saturday, June 6, 2026

द लॉस्ट बॅलन्स कादंबरी



** दखल ** 
द लॉस्ट बॅलन्स..कादंबरी (अनघा प्रकाशन) 
1. ललित : रुक्ष विषयाला संवेदनशीलतेची जोड देणारी महत्वाची कादंबरी.
2. महाराष्ट्र टाइम्स : तोल ढळलेल्या माणसांची गोष्ट.
3. साप्ताहिक सकाळ :सुन्न अनुभव देणारी कादंबरी.
4. सामना :अर्थकारणाचा संमिश्र आलेख.
5. सकाळ अवतरण :एका विनाशाचे अस्वस्थ दर्शन.
6. लोकमत : बँक विश्वातील कोलाहलाचा पंचनामा.
7. ठाणे वार्ता :समकालीन विषयाचा भयाण पट 
8. ठाणे वैभव :दुभंगलेल्या जाणिवांचा विस्तृत पट. 
9. महाराष्ट्र दिनमान : कथा एका आर्थिक घुसमटीची. 
10. समरसता साहित्य पत्रिका :झिरो बॅलन्सची शोकांतिका.
11. दखनी स्वराज्य :आर्थिक गर्तेत सापडलेल्या माणसांची कथा.
12. वृत्तप्रकाश : डेबिट पडलेल्या माणसांची कथा.
समस्त संपादकांचे, समीक्षकांचे मनापासून आभार. कादंबरी सवलतीत मिळवण्यासाठी फक्त फोन करा. 9869014319. धन्यवाद.


Thursday, June 4, 2026

मराठी emagazine नियतकालिक

साहित्यिक आणि कलावंत यांच्यासाठी -कला-आणि साहित्यास वाहिलेले "नियतकालिक अक्षर मराठी online"

-----------------------------------------

मराठी साहित्याचा प्रसार व्हावा आणि साहित्यिक ,कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ' ईअक्षरमन ' द्वारे नियतकालिक स्वरूपात ई-बुक प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तरी ज्या साहित्यिक आणि कलावंत यांना उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपले साहित्य (प्रकाशित असेल तर काव्यसंग्रह किंवा कथासंग्रहाच नाव , अप्रकाशित असेल तर ब्लॉग लिंक or fb post लिंक ) पुढील पत्यावर ई-मेल द्वारे पाठवायचे आहे.

Email id : eaksharman@gmail.com

टीप : आपल्या साहित्यासोबत वाचकांना संपर्क साधण्यासाठी gmail id देणं जरुरी आहे .

विषय :

संपादकीय लेखन

शब्दोत्सव (एक कवी एक कविता )

काव्यतरंग (एक लेखक एक लेख )

ओळख साहित्यिकांची

कलादर्शन (Photography,Calligraphy,चित्रकला इत्यादी )

बोलीभाषा प्रशिक्षण उपक्रम

समाजकारण (राजकीय आर्थिक देश आणि राज्यातील घडामोडी )

देश-विदेश

पुस्तक परिचय : कथासंग्रह , काव्यसंग्रह (Hardcopy Books, Ebooks)

दिनविशेष

मैत्रीचा कट्टा (ओळखीच्या साहित्यिक मित्राचे साहित्या बद्दल लेख)

समाज प्रबोधन लेखन : सामाजिक उपक्रमाची माहिती

साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची माहिती (Event Updates)

मराठी संस्कृती (दशावतार ,कला , पोवाडा , गोंधळ , सण उत्सव इत्यादी )

लेखक-कवींच्या लेखन-प्रवास विषयक परिचय

महाराष्ट्र दर्शन : पुणे , कोल्हापूर , कोकण,अलिबाग , किल्ले इत्यादी ) लेख

---------------------------------------------

Blog @ https://eaksharman.blogspot.com




Tuesday, June 2, 2026

कोकणातल्या चहाच्या आठवणी

कोकणातल्या चहाच्या आठवणी

कोकणातला चहा म्हणजे फक्त पेय नाही, तर तो माणसांना जोडणारा एक धागा आहे.

पावसाळ्याची एखादी सकाळ. बाहेर नारळाच्या झाडांवर पावसाचे थेंब टपटपत असतात. अंगणात ओलसर मातीचा सुगंध दरवळत असतो. अशा वेळी आजीच्या हातचा उकळता चहा स्वयंपाकघरातून येतो. पितळेच्या भांड्यात उकळलेला, थोडी वेलची आणि भरपूर माया मिसळलेला.

गावात कोणाच्याही घरी गेलं की पहिला प्रश्न असायचा, "चहा घेणार ना?" त्या एका कपात आपुलकी, चौकशी, गप्पा आणि नात्यांचा गोडवा भरलेला असायचा. चहा पिताना शेजारच्या घरच्या बातम्या, समुद्राच्या लाटांच्या गोष्टी, आंब्याच्या बागेचे हिशेब आणि जुन्या आठवणी रंगत जायच्या.

संध्याकाळी समुद्रकिनारी बसून घेतलेला चहा तर अजूनच खास. समोर मावळणारा सूर्य, खाऱ्या वाऱ्याची झुळूक आणि हातात गरम चहाचा कप. त्या क्षणी आयुष्य खूप साधं आणि सुंदर वाटायचं.

आज शहरात अनेक प्रकारचे चहा मिळतात, पण कोकणातल्या त्या मातीच्या सुगंधासोबत, आजीच्या हाकेसोबत आणि पावसाच्या सरींसोबत मिळालेल्या चहाची चव अजूनही मनात ताजी आहे.

"कोकणातला चहा आणि त्याच्या आठवणी मनातून कधीच उतरत नाहीत." ☕🌴🌧️

@ eaksharman