Sunday, April 19, 2026
Saturday, April 18, 2026
मी माझा ६
मी माझा ३
मी माझा ५
मी माझा ४
मी माझा २
मी माझा
Thursday, April 16, 2026
पीडित पुरुषांसाठी संघटना हवी
Wednesday, April 15, 2026
श्रावणबाळ
विव्हळला श्रावणबाळ
'हा ! आई गे !' , दीर्घ फोडूनी हांक
तो पडला जाऊन झोंक
ये राजाच्या श्रवणी करुणावाणी
हृदयाचे झाले पाणी.
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवें आणुनी नयनी
तो वदला, 'हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा' !
मग कळवळूनी, नृपास बोले बाळ.
'कशी तुम्ही साधीली वेळ'
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असती बसले.
कावड त्यांची, घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला.
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरांत रुतुनी बसला.
मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला !
त्यां वृद्धपणी, मीच एक आधार
सेवेस अतां मुकणार
जा, बघतील ते, वाट पांखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही,
दुर्वार्ता फोडुं नका ही,
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी, करा तुम्ही सांभाळ
होउनियां श्रावणबाळ.
परि झांकुनी हे, सत्य कसे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
"घ्या झारी... मी जातो..." त्याचा बोल
लागला जावया खोल.
सोडीला श्वास शेवटला,
तो जीव विहग फडफडला,
तनु-पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा, रडला धायीं धायीं
अडखळला ठायीं ठायीं.
— ग. ह. पाटील
Monday, April 13, 2026
आशा ..
आठवण
आठवण
गीत आणि प्रतिक्रिया
गीत @ https://youtu.be/615uBOyQ7lE?si=pEdjHcIQ3eBnQ-uF
आपली ओळख नाही. फेसबुक मैत्रीही नाही. पण हे भावगीत एवढे आवडले की प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवले नाही.
हे भावगीत वाचताना मनाला एक विलक्षण शांतता आणि तृप्तीचा अनुभव येतो. मंजिरी जोशी यांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द केवळ कविता नसून एका समाधानी मनाचा आरसा आहेत.
या गीतावर आधारित माझी काही मते आणि प्रतिक्रिया:
१. शब्दांतील मौन आणि भावपूर्णता
कवितेची सुरुवातच खूप प्रभावी आहे. "तुझी भेट होता मुके शब्द झाले" या ओळीतून भेटीचा तो क्षण शब्दांच्या पलीकडचा असल्याचे जाणवते. जेव्हा मन पूर्णपणे भरून येते, तेव्हा शब्द अपुरे पडतात, हे सत्य लेखिकेने अतिशय हळुवारपणे मांडले आहे.
२. निसर्ग आणि भावनांचा सुरेख संगम
नभाची ओढ, सांजवेळ आणि धरणीची 'अबोली भाषा' या प्रतिमांचा वापर करून मानवी भावनांना निसर्गाशी जोडले आहे. "मुकी वेळ ती तार छेडून गेली" ही ओळ मनातील सुप्त तारा कशा छेडल्या गेल्या, याचे सुंदर चित्रण करते.
३. कृतार्थतेचा परमोच्च बिंदू
शेवटच्या कडव्यातील ओळी मनाला स्पर्श करून जातात:
मिळाले मला सर्व जे जे हवे ते
सौख्यातुनी चांदणे मोहरले
आयुष्यात जे हवे होते ते सर्व मिळाल्याचा जो कृतार्थ भाव (Sense of Fulfillment) आहे, तो या ओळींतून स्पष्टपणे जाणवतो. सुखाची तुलना 'मोहरलेल्या चांदण्याशी' करणे हे अत्यंत कल्पक आणि सकारात्मक आहे.
थोडक्यात सांगायचे तर...
हे गीत म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, आयुष्यातील एका तृप्त वळणाचे सादरीकरण आहे. मंजिरी जोशी, तुमच्या शब्दांतील ही प्रसन्नता आणि गांभीर्य वाचकाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते.
तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा!
#अभिप्राय #मराठीसाहित्य #भावगीत #तृप्ती
Saturday, April 11, 2026
Friday, April 10, 2026
आई
बालभारतीच्या कविता १
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप
लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी
त्यानं काय केलं पाप ?
माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती
दुसऱ्याच्या हाती माप
बाप फोडतो लाकडं
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !
कवी : इंद्रजीत भालेराव
गीत ७
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी
ऐक आभास मला थोडा तरी अंदाज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
ये खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे
गंध दे मजला फुलांचा, हसने निर्व्याज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
लज्जत-ए-गम के सिवा,
तूने मुझे सब कुछ दिया
वेदनेने बहरलेली एक सुंदर सांज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे
इलाही जामदार
जीवन त्यांना कळले हो गीत ६
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होऊनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन् परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
उरींच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो
बा. भ. बोरकर
गीत ५
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा
@eaksharman
परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव,
जणू की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
ग. दि. माडगूळकर (गदिमा)
गीत ४
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा
@eaksharman
परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव,
जणू की पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
ग. दि. माडगूळकर (गदिमा)
गीत ३
गीत २
गीत १
हिंदी काव्य २
हिंदी काव्य १
ज़िंदगी क्या है किताबों को हटा कर देखो
सिर्फ़ आँखों से ही दुनिया नहीं देखी जाती
दिल की धड़कन को भी बीनाई बना कर देखो
पत्थरों में भी ज़बाँ होती है दिल होते हैं
अपने घर के दर-ओ-दीवार सजा कर देखो
वो सितारा है चमकने दो यूँही आँखों में
क्या ज़रूरी है उसे जिस्म बना कर देखो
फ़ासला नज़रों का धोका भी तो हो सकता है
वो मिले या न मिले हाथ बढ़ा कर देखो
Nida Fazli
काव्य ८
काव्य ७
काव्य ६
काव्य २ वाट
जगण्याची वाट चिंचोळी होत चालली आहे
वाटतं मागनं कोणी येऊ नये
आणि आपल्या पुढे कोणी असू नये
सांभाळलेलं बोचकं भिरकावलं तर
ते वेचायलाही कोणी जाऊ नये
कोणाची चाहूल नको
कोणाची हाक नको
मला ओळखणारं कॊणी नको
मलाही माझी ओळख नको
जायची घाई नाही
थांबायची हौस नाही
आणि त्या वाटेवरून जाताना
चालायची गरज नाही
#चंगो
काव्य १ एका तळ्यात होती बदकें पिलें सुरेख
काव्य १० केले कुणास्तव ते किती,हे कधी मोजू नये
हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.
डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.
सत्यास साक्षी ठेवुनी वागेल तो,
बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही !
त्याला तयारी पाहिजे.
@eaksharman
पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे
विंदा करंदीकर
काव्य १२ चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
काव्य ११ देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेत जावे.
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.
@eaksharman
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे !
विंदा करंदीकर
काव्य ७ माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसांची रास
फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास
माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा
माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा
@eaksharman
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले भोळाभाबडा शालीन भाव शब्दावीण बोले
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे
भात वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात
माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी
बा. भ. बोरकर
काव्य ८ एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा
एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...
@eaksharman
असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.
बा. भ. बोरकर
काव्य ९ निळा पक्षी
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.
तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.
याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.
याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.
काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
विंदा करंदीकर
निळा पक्षी
काव्य ६ देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे, जे कोंडीती साऱ्या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे।
आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥
@eaksharman
देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्म रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके ।
चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पाऱ्यासारखे ॥
देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥
बा. भ. बोरकर
