Sunday, February 27, 2022
Saturday, February 26, 2022
स्वा सावरकर
तात्या गेले !
अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की,
की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास - निसर्ग माने|
जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे
बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे||
तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला, त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.
सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, " देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !" वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची ज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की ,”१० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल.! “ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.
अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ' मोरिया ' बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच 'भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी' असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ‘आझाद हिंद’ चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे 'पाया’ आणि सुभाषचंद्र हे 'कळस' आहेत! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें ,पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले.
मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत “हे कृष्ण, हे श्याम” असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली. तुकोबा "आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा!" असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम
✍🏻आचार्य अत्रे.
'दैनिक मराठा'
दिनांक २७ मार्च १९६६
प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
#स्वातंत्र्यवीर_सावरकर #आत्मार्पण_दिन
वपु
स्वत:चेच सांत्वन स्वत:चे करायची वेळ आली कि समजावे एकटेपणाचे ढग आपल्यावर घुमू लागलेत.
आभाळ शांत झालंय.निरभ्र झालय.फिकट झालंय…
पण आभाळ कधी एकाच रंगावर स्थिर राहिलंय का?
ढग येतात,जातात, वादळं उठतात,आभाळ काळवंडून येतं, पाउस पडतो...
रंगांची उधळण सर्वात जास्त कोण करत असेल तर ते म्हणजे आभाळ नि
भावनांच्या रंगांची सर्वात जास्त कोण करत असेल तर ते म्हणजे माणसाचे मन.
माणूस कधी कधी पूर्ण भरलेला असतो तर कधी पूर्ण रिता असतो.दोन्ही स्थितीत चंचलता असते.या दोघांच्या मध्ये असते ते स्थैर्य.
जास्त असले कि ते गमावू हि भीती आणि कमी असले तर काहीच नाही हि कुरकुर.या गोष्टी शांत जगू देत नाहीत.
स्थैर्यात जगणारी माणसं तशी कमीच असतात.सापडतात ती हि वृद्ध झालेली, काही वयाने तर काही मनाने.
बहुतेकदा घालवलेल्या आयुष्यात काही चुका आपण किती नकळत केल्या आणि उगाच केल्या याचा उलघडा झालेली....
आता त्यावर काहीच उपाय नाहीयेय,वेळ निघून गेलीय अशी जाणीव झालेली...आणि म्हणून शांत झालेली....
जन्मासोबत प्रवास सुरु होतो,सुरु केलेला प्रवास कुठे संपणार हे माहित नसतं...वाटा-वळणे घेत घेत आयुष्य अश्या ठिकाणी आणून सोडतं कि ज्याचा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता....
क्षणाक्षणाला क्षण रंग बदलतो,आयुष्य कात टाकतं...सुख असो वा दु:ख.ते त्या क्षणासोबत क्षणाने जुनं होत जातं...
आयुष्य हे मानवी अंदाजाच्या मुठीत कधीच मावले नाही...ते विशाल असतं...समजायला उमजायला कठीण.....
व. पु....
#वपु #vapu
स्वा सावरकर पुण्यतिथी
आजच्याच दिवशी भारत मातेला सोडून तिचा प्रिय पुत्र गेला तेव्हा ती ढसाढसा रडली. #स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन म्हणजे एक धगधगते यज्ञकुंडच. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे फक्त अनुसरण नाही तर अनुकरण करणारे स्वा. सावरकर. जसा सूर्य या जगातील अंधार दूर करतो नि सर्व प्राणिमात्रांना जगण्याची शक्ती देतो. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे #क्रांतीसूर्य. त्यांनी स्वतःच्या तेजाने लाखो तरुणांच्या मनात क्रांतीज्योतीची मशाल पेटविली. ती मशाल एवढी पेटली की त्याची धग इंग्रजांना सहन नाही झाली त्यांना येथून शेवटी हाकलून लावले गेले. पण आजच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले त्याग नि देशकार्य भारतातील काही लोकांना कळत नाही हे आपले दुर्भाग्य. मृत्यूला पण न घाबरणारे मृत्युंजय सावरकर. स्वतः तात्या म्हणतात की “मला मुसलमान नि ख्रिश्चनाची भीती वाटत नाही, मला भीती वाटते ती हिंदुत्वाशी वैर असलेला हिंदूचीच. यांचीच प्रचिती त्यांना प्रत्यक्ष कार्य करताना वेळोवेळी आली. पण त्या गोष्टीला न जुमानता तात्यांनी आपले देशकार्य चालू ठेवले. यावर भिडे गुरुजींच्या एक श्लोक आठवतो.
असंख्यात गेले विरोधात लोक ।
तरी घालणें ना यमालाही भीक ।।
जरी सागरा एवढे म्लेंच्छ आले ।
‘शिवाजी' आणि मावळे नाही भ्याले ।।
शेवटी एवढेच सांगतो जर संपूर्ण हिंदू समाजाने जर स्वा. सावरकर समजून जर फक्त अनुसरण न करता अनुकरण केले तर निश्चितच आपण तात्यांच्या मनातील इतिहासातील सातवे सोनेरी पान लिहू शकू. ते आज जरी आपल्यात नसले तरी ते त्यांच्या कार्याने नि पुस्तक रूपाने आपल्यात जीवित आहेत.
आजच्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी प्रायोपवेशन करून त्यांनी आत्मार्पण केले. #हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन.
- विठ्ठल वाघ
#हिंदु_संघटक_सावरकर #सावरकरी_विचाररत्ने #अखंड_हिंदुस्थान #सावरकर #vitthal_wagh #वीर_सावरकर #द्रष्टे_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर
इतिहास २
आज परम पूज्य वीर सावरकर जी की पुण्यतिथि है ... कुछ तथ्य जो उनके व्यक्तित्व को बखान करते हैं ..
-बहुत कम लोगो को इसकी जानकारी है कि उन्होंने भी अपने स्व. मोतीलाल नेहरु , प. जवाहर लाल नेहरु जी और महात्मा गाँधी की तरह बार एट लॉ की परीक्षा पास की थी | पर इंग्लैंड मे उन्हे बैरिस्टर की डिग्री सिर्फ इसीलिए नही मिली क्योकि उन्होने अंग्रेज़ो की वफ़ादारी की शपथ लेने से इनकार कर दिया था |
- नवम्बर 1905 मे उन्होने भारत मे पहली बार विदेशी वस्त्रो की होली जलाई , वो भी अपने महात्मा गाँधी जी से लगभग 17 साल पहले |
- जब कॉंग्रेस के अधिवेशन मे "लॉंग लिव द किंग" गाया जाता था तब वीर सावरकर कोल्हू मे बैल की जगह जुतकर 30 सेर तेल रोज निकलते थे | नारियल के रेशे से रस्सी बुनते थे |
-1908 मे उन्होने "भारत का स्वाधीनता संग्राम 1857" लिखा जिसे अँग्रेज़ों ने छपने से पहले ही प्रतिबंधित कर दिया था | इसे भारत में स्वयं भगत सिंह के छपवा कर बंटवाया था | इस ग्रंथ को क्रांतिकारियो की गीता कहा जाता था | विडंबना देखिये आज भगत सिंह के कथित समर्थक ही वीर सावरकर पर भद्दे कमेंट करते हैं |
-अँग्रेज़ों के शासन काल मे वो अकेले ऐसे क्रांतिकारी थे जिन्हे 2 जीवन काले पानी की सज़ा दी गयी थी | इस पर जब उनसे पूछा गया कि वो इस सजा को किस रूप में देखते हैं तो उन्होंने कहा था कि " 2 जन्म की छोडिये मुझे तो इस पर हंसी आती है कि अंग्रेज सरकार ये समझती है कि ये लोग भारत पर शासन करते रहेंगे | "
- एक महान क्रांतिकारी होने के साथ साथ वो एक महान कवि भी थे | उन्होंने अंडमान की जेल मे उन्होने कील से दीवारो पर खुरच कर लगभग 10000 पंक्तियो का महाकाव्य लिखा था |
- परम पूज्य डॉ. हेडगेवार जी, बाबा साहेब आंबेडकर और गाँधी जी की तरह ही वीर सावरकर समाज सुधारक भी थे | ब्राह्मण होते हुए भी वो छुआछूत के सबसे बड़े विरोधी थे | 1931 मे उन्होने "पतित पावन मंदिर" की स्थापना की थी जिसमे सभी हिंदू बिना किसी भेदभाव के पूजा कर सकते थे | इस मंदिर में दलित पुजारियों की नियुक्ति की गयी थी | जिस ज़माने में किसी दलित की छाँव मात्र से कथित सवर्ण अपवित्र हो जाते थे उस समय मंदिरों में दलित पुजारियों की नियुक्ति बहुत बड़ी बात थी |
-1937 मे उन्हे हिंदू महासभा का अध्यक्ष चुना गया था | उसके बाद उन्होंने इस संगठन को एक नयी दिशा दी |
यहाँ अगर मैं वीर सावरकर पर लिखना शुरू करूँ तो शायद मेरी डायरी के सारे पन्ने भर जायेंगे, मेरी कलम की स्याही खत्म हो जाएगी और फिर भी मैं उनके व्यक्तित्व का 1 छटांक भी वर्णन न कर पाउँगा | दुःख होता है कभी कभी जब ऐसे महान क्रांतिकारियों पर कुछ तथाकथित फेसबुकिये क्रांतिकारी लांक्षन लगाते हैं | सूर्य पर थूकने वाले शायद ये भूल जाते हैं कि उनका थूक वापस उन्ही के चेहरे पर गिरता है | आप चाहे सावरकर को कितना ही कलंकित करने की कोशिश क्यों न करो हर बार आप मुंह की ही खाओगे |
शत शत नमन उस वीर को जिसने अपने जीवन के बहुमूल्य 29 वर्ष जेल और नज़रबंदी मे बिताए और बदले में आजाद भारत में जेल गए | जिसने भारत की आज़ादी के लिए अपने नाख़ून खिचवाये और बदले में आज़ाद भारत में ताने सुने | माँ भारती अपने इस वीर पुत्र पर गर्व करती है | पुन:श्च नमन .. _/\_
~अनुज अग्रवाल
इतिहास
"आ मृत्यु...आ...तू आ"
~~~~~~~~~~~~~~~
83 वर्ष की आयु में वीर सावरकर ने हिन्दू साधुओं की प्राचीन परंपरा अपनाकर, 1 फरवरी, तिथि माघ शुक्ल एकादशी को अन्न, जल और दवाइयों का त्याग कर दिया। उनका कहना था, "जब जीवन मिशन पूरा हो जाए, और समाज की सेवा करने लायक ताकत न बचे, तब मृत्यु का स्वयं वरण कर लेना चाहिए, बजाय इसके कि मृत्यु की प्रतीक्षा की जाए।" गीतोक्त कछुआ बनने का जिस योगी ने आजीवन अभ्यास किया, अंतिम समय अब स्वयं को समेटना शुरू कर दिया। जो मृत्यु दो आजीवन कारावास पाए उस निहत्थे व्यक्ति के पास आने का साहस नहीं कर पा रही थी, अंततः स्वयं उसी ने मृत्यु की विवशता देख उसे अपने पास बुला लिया। इसे उस साधु ने आत्मार्पण नाम दिया था।
अन्न, जल और दवाई के बिना 26 दिन के कठोर उपवासपूर्वक अपना नश्वर देह छोड़ने से पूर्व सावरकर ने एक कविता लिखी थी, जिसके एक अंश का हिंदी अनुवाद नीचे है।
"आ मृत्यु आ तू आ
आने के लिए निकली ही होगी
तो आ भी जा अभी
मुरझाने के डर से
डर जाएं फूल
अंगूर भी रस भीने
सूख जाने से
डर जाऊं क्यों तुझसे मैं
किसलिए
मेरे इस प्याले में पीते पीते
कभी न खत्म होने वाली है भरी
आंसुओं की मदिरा
बस मेरे लिए
आ यदि तू भूखी है
नैवेद्य के लिए
और अभी दिन यद्यपि यौवनयुक्त
फिर भी मेरे सारे छोटे मोटे काम
खत्म हो चले हैं
किसी तरह कर जुगाड़
ऋण चुकता किया
जन्मार्जित जो जो सब
ऋषिऋण के लिए
श्रुति जननी चरण तीर्थसेवन करके
और आश्रय करके सन्तों के ध्रुवपद का
और आशा के श्मशान में
आचरण की एक घोर तपस्या
देव ऋण के लिए
रणवाद्य बजा बजाके धड़र धड़र
और बढ़ आगे हमला कर
ठीक उसी क्षण को
जब होगी प्रभु की प्रथम रणआज्ञा
और रण यज्ञ अग्नि में
जले अस्थि अस्थि मांस मांस
ईंधन जैसे
आ मृत्यु आ
आने के लिए
निकली ही होगी घर से
तो आ भी जा अभी"
वो पूछ रहे हैं, री मृत्यु! डर जाऊं क्यों तुझसे? तू स्वयं मुझसे डरी है, मैं तुझ से नहीं। कालेपानी का कालकूट पीकर, काल के कराल स्तंभों को झकझोर कर मैं बार बार लौट आया हूँ और आज भी जीवित हूँ। हारी तू मृत्यु है मैं नहीं। पर यह विखण्डित स्वतंत्रता मेरे अंतर्मन को 19 साल बाद अब भी चीर रही है, आज़ादी के बाद तो गाली और उपेक्षा ही इस जीवित हुतात्मा का नया कालापानी बन गई हैं। उनके आंसुओं की मदिरा अभी खत्म नहीं हुई है। उपेक्षा और तिरस्कार ऐसा कि मौत के बाद भी सावरकर की मृत्यु पर एक दिन का भी राजकीय शोक घोषित नहीं हुआ, महाराष्ट्र का एक भी कैबिनेट मंत्री उनकी अंत्येष्टि में शामिल नहीं हुआ, लोकसभा स्पीकर द्वारा सदन में उन्हें श्रद्धांजलि देने का निवेदन खारिज कर दिया गया, नेहरू ने सेल्युलर जेल तुड़ाकर हॉस्पिटल बनाने की बात कही थी।
83 की आयु में 26 दिन शरीर सुखाकर सावरकर स्वयं को अब भी यौवनयुक्त पा रहे हैं, आजादी के हर पन्ने पर खड़े होकर कह रहे हैं, छोटे मोटे काम तो पूरे हो गए!! वेदमाता के चरण पकड़कर, तीर्थों के तीर्थ उस अंडमान का सेवन कर और सन्तों के चरणचिन्हों पर चलकर जन्मों जन्मों में अर्जित किया ऋषिऋण किसी तरह जुगाड़ करके चुकता कर रहा हूँ। हिंदुत्व की असीमित आशाओं के निर्जन वन में किया तपस्याचरण ही मेरा देव ऋण चुकता करेंगे। अब रण वाद्य बजाकर आ जा, प्रभु की इच्छा से क़ि अब मैं जीवन का क्षण क्षण होम कर देने के बाद यह बची खुची देह भी आहूत कर दूं। आ मृत्यु आ, तेरा अब वरण कर लूं... इसी के बाद मृत्यु को सावरकर प्राप्त हुए...
अगर ये तपस्वी ये योगी ये तीन ऋणों को चुकता करने वाले आत्मिकोपवीत सावरकर नास्तिक हैं, तो कोई भी आस्तिक नहीं है, कोई भी नहीं...
~~ मुदित मित्तल
बातमी
हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने परवा आणखी एका ठिकाणी नवीन ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते. म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला नाही पण गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते.
पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं आहेत. नळ स्टॉप जवळील ऑफिसच्या २ टॉवरला प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ पिंगल आणि आर्यभट यांची नावं आहेत. सेनापती बापट रोड च्या ऑफिस इमारतीला भगीरथ. तसेच इमारतीमध्ये आतल्या बाजूने ठिकठिकाणी वेदातील संदर्भ भिंतीवर दर्शविलेले आहेत.
केवळ हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ असं बोलून काही होत नाही. त्याचं श्रेष्ठत्व टिकवायला कृतीतून संदेश द्यावा लागतो आणि या कंपनीने तो वेळोवेळी दिलाय. या कंपनीतलं वातावरण मी जवळून अनुभवलंय (अडीच वर्ष काम केलंय ). अगदी लहान गोष्ट सांगतो , आयटी कंपनी असूनही इथल्या महिला सदस्य अगदी 'हळदी कुंकू' सारखा संस्कार सणही इथे मोठ्या आनंदाने साजरा करतात. सत्यनारायणाची पूजाही रीतसर घातली जाते. हे सगळं करूनही Persistent ही आयटी क्षेत्रात एका वेगळ्याच शिखरावर विराजमान आहे. गेल्या तिमाहीत तब्बल १४९१ करोड रुपयांचा रेव्हेन्यू आहे.
इथे काम करणारा हा 'कामगार' नाही तर Persistent परिवाराचा 'सदस्य' असतो. जगभर तब्बल १५ हजारहुन सदस्य असणाऱ्या या कंपनीची उलाढाल शेकडो कोटींमध्ये आहे. साधी रहाणी- उच्च विचारसरणी म्हणून रतन टाटा यांना आपण ओळखतो मात्र मराठमोळे आनंद देशपांडे सर हे तितकंच भावलेलं व्यक्तिमत्व.
- Rohit Pawar रोहित पवार (एक माजी सदस्य)
Friday, February 25, 2022
post 5
अवघे सात मराठे पंधरा हजार सैन्यावर हल्ला करतात..
१) विसाजी बल्लाळ
२) दिपाजी राउत
३) विठ्ठल पिलाजी अत्रे
४) कृष्णाजी भास्कर
५) सिद्धी हिलाल
६) विठोजी शिंदे
७) आणि खुद्द सरनोबत कुडतोजी उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच प्रतापराव गुजर.
त्यातल्या एकाचेही पाय डगमगत नाहीत, आपण मृत्यूकडे जात आहोत हे माहीत असून देखील ते घाबरत नाहीत, ते माघार घेत नाहीत, या सर्वांची ताकद म्हणजे "श्री छत्रपती शिवाजी महाराज"
#नेसरी ची लढाई..
#२४फेब्रुवारी१६७४
*#वेडात मराठे वीर दौडले सात..🚩🙏*
#fbshare
Tuesday, February 22, 2022
इतिहास १
कन्नप्पा नयनार
एक मशहूर धनुर्धर थिम्मन एक दिन शिकार के लिए गए। जंगल में उन्हें एक मंदिर मिला, जिसमें एक शिवलिंग था। थिम्मन के मन में शिव के लिए एक गहरा प्रेम भर गया और उन्होंने वहां कुछ अर्पण करना चाहा। लेकिन उन्हें समझ नहीं आया कि कैसे और किस विधि ये काम करें। उन्होंने भोलेपन में अपने पास मौजूद मांस लिंग पर अर्पित कर दिया और खुश होकर चले गए कि शिव ने उनका चढ़ावा स्वीकार कर लिया।
उस मंदिर की देखभाल एक ब्राह्मण करता था जो उस मंदिर से कहीं दूर रहता था। हालांकि वह शिव का भक्त था लेकिन वह रोजाना इतनी दूर मंदिर तक नहीं आ सकता था इसलिए वह सिर्फ पंद्रह दिनों में एक बार आता था। अगले दिन जब ब्राह्मण वहां पहुंचा, तो लिंग के बगल में मांस पड़ा देखकर वह भौंचक्का रह गया। यह सोचते हुए कि यह किसी जानवर का काम होगा, उसने मंदिर की सफाई कर दी, अपनी पूजा की और चला गया। अगले दिन, थिम्मन और मांस अर्पण करने के लिए लाए। उन्हें किसी पूजा पाठ की जानकारी नहीं थी, इसलिए वह बैठकर शिव से अपने दिल की बात करने लगे। वह मांस चढ़ाने के लिए रोज आने लगे। एक दिन उन्हें लगा कि लिंग की सफाई जरूरी है लेकिन उनके पास पानी लाने के लिए कोई बरतन नहीं था। इसलिए वह झरने तक गए और अपने मुंह में पानी भर कर लाए और वही पानी लिंग पर डाल दिया।
जब ब्राह्मण वापस मंदिर आया तो मंदिर में मांस और लिंग पर थूक देखकर घृणा से भर गया। वह जानता था कि ऐसा कोई जानवर नहीं कर सकता। यह कोई इंसान ही कर सकता था। उसने मंदिर साफ किया, लिंग को शुद्ध करने के लिए मंत्र पढ़े। फिर पूजा पाठ करके चला गया। लेकिन हर बार आने पर उसे लिंग उसी अशुद्ध अवस्था में मिलता। एक दिन उसने आंसुओं से भरकर शिव से पूछा, “हे देवों के देव, आप अपना इतना अपमान कैसे बर्दाश्त कर सकते हैं।” शिव ने जवाब दिया, “जिसे तुम अपमान मानते हो, वह एक दूसरे भक्त का अर्पण है। मैं उसकी भक्ति से बंधा हुआ हूं और वह जो भी अर्पित करता है, उसे स्वीकार करता हूं। अगर तुम उसकी भक्ति की गहराई देखना चाहते हो, तो पास में कहीं जा कर छिप जाओ और देखो। वह आने ही वाला है।”
ब्राह्मण एक झाड़ी के पीछे छिप गया। थिम्मन मांस और पानी के साथ आया। उसे यह देखकर आश्चर्य हुआ कि शिव हमेशा की तरह उसका चढ़ावा स्वीकार नहीं कर रहे। वह सोचने लगा कि उसने कौन सा पाप कर दिया है। उसने लिंग को करीब से देखा तो पाया कि लिंग की दाहिनी आंख से कुछ रिस रहा है। उसने उस आंख में जड़ी-बूटी लगाई ताकि वह ठीक हो सके लेकिन उससे और रक्त आने लगा। आखिरकार, उसने अपनी आंख देने का फैसला किया। उसने अपना एक चाकू निकाला, अपनी दाहिनी आंख निकाली और उसे लिंग पर रख दिया। रक्त टपकना बंद हो गया और थिम्मन ने राहत की सांस ली। लेकिन तभी उसका ध्यान गया कि लिंग की बाईं आंख से भी रक्त निकल रहा है। उसने तत्काल अपनी दूसरी आंख निकालने के लिए चाकू निकाल लिया, लेकिन फिर उसे लगा कि वह देख नहीं पाएगा कि उस आंख को कहां रखना है। तो उसने लिंग पर अपना पैर रखा और अपनी आंख निकाल ली। उसकी अपार भक्ति को देखते हुए, शिव ने थिम्मन को दर्शन दिए। उसकी आंखों की रोशनी वापस आ गई और वह शिव के आगे दंडवत हो गया। उसे कन्नप्पा नयनार के नाम से जाना गया। कन्ना यानी आंखें अर्पित करने वाला नयनार यानी शिव भक्त।
Thursday, February 3, 2022
post 4
#सावरकर_समजून_घेताना..
भाग पहिला..
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे म्हणजे अनेक , रहस्यमय व रोमांचकारी प्रसंग , अनपेक्षित घटना यांनी भरलेला एकच आयुष्याचा जीवनपट आहे ..एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती गोष्टी घडू शकतात ! असा व्यक्ती की ज्याच्या एकाच आयुष्यात किती प्रकारच्या भूमिका वाट्याला येतात ! आणि ती प्रत्येक भूमिका तो समरसून जगतो व त्या प्रत्येक भूमिकेला नुसता न्याय देत नाही तर त्याला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवतो ..असे भव्य-दिव्य चरित्र निर्माण केलेला नेता क्वचितच भारतीय इतिहासात सापडेल !
पण माझा आजचा विषय जे तुम्हाला व आपल्या सर्वांना माहीत आहे ते चर्चा करणे नसून , वीर सावरकरांचे एक वेगळे दर्शन तुम्हाला दाखविणे आहे , मला खात्री आहे की या लेखाच्या शेवटी मी ते करण्यात यशस्वी होईल 🙏.
सावरकर लहानपणापासून अतिशय प्रखर बुद्धिमान होते ..त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती ..त्यांची निर्णयक्षमता तेव्हापासून अफाट अशी होती ..लेखक व कवी म्हणून एखादा विषय कुणालाही समजून सांगणे यात त्यांचा हातखंडा होता , वक्ते म्हणून ते अगदी काही क्षणात ते समोरच्याला स्वतःकडे खेचून घ्यायचे .त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा होता ..एक प्रकारे कुणालाही आपल्या विचारांकडे खेचून घेण्याची चुंबकीय शक्ती लहानग्या विनायकामध्ये देखील होती ..ते स्वतः शिवाजी महाराज , वासुदेव बळवंत फडके , चाफेकर यांच्या चरित्रापासून प्रेरित होते ..
असा हा व्यक्ती त्या काळात जी पदवी मिळविणे खूप प्रतिष्ठित समजले जायचे ती बॅरिस्टर देखील झाले ..त्या काळात ही अशी लोक खोऱ्याने पैसे कमवायचे ...एक सुरक्षित व श्रीमंतीचे आयुष्य जगणे म्हणजे त्यांना अगदी सहज शक्य होते आणि त्यांनी तसे जर केले असते तर ते त्या काळात एकदम साहजिक गोष्ट होती ....पण या माणसाने क्रांतिकार्याच मार्ग स्वीकारला जो अतिशय खडतर असा मार्ग , का तर भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे व या भूमीला परत गतवैभव मिळवून द्यावे ...आज ही गोष्ट वाचताना किंवा मी लिहताना खूप सहज लिहतोय पण त्या काळात हे तेव्हडे सोप्पे नव्हते ...मुळात सावरकर ज्या काळात जन्मले तो काळ म्हणजे ब्रिटिश सरकारचा सुवर्णकाळ होता आणि ते असे सत्ताधीश होते की ज्याच्या सत्तेचा सूर्य कधीच मावळू शकत नाही, असे ठामपणे मानणारे सगळेच होते ...
हा क्रांतिकार्याचा मार्ग स्वीकारला म्हणजे काय कधीतरी झोपेतून उठून आपले त्यांच्या मनात विचार आला व त्यांनी ते सुरू केले असेही नव्हते ...त्याच्या परिणामांचा विचार त्यांनी पुरता केलेला होता .. वीर सावरकर त्यांच्या वहिनी म्हणजे येसु वहिनी ..यांना काव्यमय पत्र , "माझे मृत्यूपत्र" यात लिहतात ,
' की घेतील व्रत न आम्हीं हे अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे
बुद्धयाची धरिले करी वाण हे सतीचे '
जे काही सावरकर करत होते त्याचे भयंकर परिणाम त्यांना आधीच माहीत होते , पण तरीही या अग्निकुंडात त्यांनी उडी घेतलीच होती ..तर असा परम निश्चय असलेला मनुष्य भित्रा बिलकुल नव्हता ..त्यांना न्यायालयाने ५० वर्षे काळे पाणी ची शिक्षा दिल्यावर त्यांनी ठणकावून विचारले , " _इतकी वर्षं तुमचे राज्य तरी टिकणार आहे का ? "_
शिवाजी महाराज वीर सावरकरांचे आदर्श होते ..शिवचरित्र मध्ये आग्र्याची सुटका आठवते का ? जेव्हा आग्र्याच्या दरबारात अपमान झाला तेव्हा शिवरायांनी बाणेदारपणे उत्तर दिले व अपमान सहन केला नाही , पण त्यानंतर जेव्हा औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवले तेव्हा शिवरायांनी ओळखले की आता तो स्वाभिमान असा सारखा-सारखा दाखवून उपयोग नाही तर आपल्याला वेगळे चतुराईचे हत्यार बाहेर काढावे लागेल ..तेव्हा तात्पुरतं आजाराचे सोंग घेऊन आपले लोकही परत स्वराज्यात पाठविण्याचे नाटक केले ...यातून आपण औरंगजेबाला घाबरलो असे नाटक केले ..ही एक प्रकारची तात्पुरती माघार होती ...कारण स्वराज्याचे खूप मोठे कार्य अजूनही बाकी होते , जे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते ..आपल्या मातेला दिलेली वचनपूर्ती अजून बाकीच होती ..
शिवरायांचा शत्रू औरंगजेब व परतंत्र भारताचा शत्रू म्हणजे ब्रिटिश यांची ताकद खूप मोठी होती ..अशावेळी या ताकदीला ताकदीने उत्तर देणे किंवा देत राहणे म्हणजे स्वतःला कायमचे कैदेत अडकवून ठेवणे वा आपले जीवनकार्य (म्हणजेच स्वराज्य किंवा स्वातंत्र्य ) मिळविणे चे स्वप्न विसरून जाणे हे एकच होते .. दूर अंदमानात म्हणजे मूळ भारत भूमी पासून दूर राहून हे कार्य असे कितीसे वीर सावरकरांना साधणार होते का ? तर नाही , खचितच नाही !! दूर दिल्लीत म्हणजे मूळ स्वराज्यभूमिपासून दूर राहूनही जसे शिवरायांना साधणार नव्हतेच ...तर तात्पुरती माघार हा अंतिम जे युद्ध होणार आहे त्याच्या पूर्वतायरीचाच भाग होता . तर मी इथे हा उहापोह थांबवतो , जास्त काही न बोलता माझ्या चतुर वाचकांवर हे सगळे जे सांगितले त्यातून अर्थ कसा काढायचा ते सोपवतो .
असे हे वीर सावरकर मग जेव्हा मूळ भारतभूमीवर परत आले .. ज्या माणसाचे मूळ पिंड क्रांतिकारी मनाचे आहे तो मनुष्य खरेच गप्प बसला असेल का ? ( वीर सावरकरांनी अनेक प्रकारे क्रांतीकारकांना गुप्तपणे मदत केली ) शिवाजी राजे कैदेतून युक्तीने सुटून परत आले तेव्हा त्यांनी बादशहाला पत्र पाठविले व त्यात त्यांनी तुमच्या आदेशानुसार राहतो असे खोटेच कळवले व पुढच्या काही वर्षांत स्वराज्य मजबूत करून घेतले ..
रत्नागिरीला असताना सावरकरांनी अनेक मोठी कामे केली .. अस्पृश्यता निवारण, वेगवेगळ्या जातीच्या लोकांची सहभोजने, पतितपावन मंदिराची स्थापना ( अवघ्या भारतातील _एकमेव मंदिर_ जे सर्व जातींच्या लोकांना दर्शनासाठी खुले केले ) , कोकणातील पाचशे पेक्षा जास्त विहिरी सर्व जातींसाठी खुल्या केल्या ( तो काळ खूप कठीण होता ,स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव ) ..इथे बघा बरं का, सावरकर हे स्वतः स्पृश्य (जातीने ब्राह्मण ) होते , त्यांच्या या जातिनिर्मूलनाच्या कामामुळे तेथील मूळ ब्राह्मण समाजाने देखील त्यांना वाळीत टाकले होते ..तरीही श्री व सौ सावरकर यांनी हे कार्य सुरूच ठेवले ..यातून हिंदू समाज संघटित होत गेला ..
पुढचे एक मोठे काम वीर सावरकरांनी केले ते म्हणजे मराठी भाषा शुद्धीकरण !! मी खाली काही सावरकर यांनी मराठी भाषेला दिलेत ते शब्द देतोय , हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल हे केवढे थोर काम त्यांनी करून ठेवले आहे,
सावरकरांनी किंवा त्यांचे बंधू बाबाराव यांनी दिलेला शब्द(प्रचलित शब्द)
हुतात्मा (शहिद)
महापौर (मेयर)
दिग्दर्शक /दिग्दर्शन (डिरेक्टर)
दिनांक (तारीख , Date)
विधिमंडळ (Assembly)
ध्वनिक्षेपक ( Loudspeaker)
निर्बंध ( कायदा )
आणि असे अजून शब्द ..जागेच्या अभावामुळे इथे सगळेच सांगू शकत नाही असो कारण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे , असो 🙏.
जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा वीर सावरकर यांनी उघडपणे तरुणांना सैन्यात भरती व्हा असे सांगायला सुरुवात केले , त्यांच्यावर प्रचंड टीका झाली .पण सावरकर ठाम होते .त्यांना दूरदृष्टी होती , की हेच सैन्य व प्रशिक्षित झालेले सैनिक भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा देशाचे संरक्षण करू शकेल आणि ते सत्य ही झाले ( १९४७ ला भारत-पाकिस्तान युद्ध झाले ) .. असेच त्यांनी दूरदृष्टीने चीन भारतावर हल्ला करू शकतो हे खूप आधी सांगितले होते ( आणि हिंदी-चिनी भाई भाई म्हणणाऱ्या चीनने १९६२ साली आक्रमण केले )
त्यांनी जे जे काही आयुष्यात केले ते खूप ठामपणे केले .
स्वातंत्र्यवीर सावरकर काय काय होते ते बघा ,
महाकवी सावरकर ( कमला , गोमंतक )
नाटककार सावरकर ( संन्यस्त खड्ग व इतर )
कादंबरीकार सावरकर ( काळे पाणी , मला काय त्याचे )
निबंधकार सावरकर
इतिहासकार सावरकर ( सहा सोनेरी पाने , १८५७ चे स्वातंत्र्यसमर )
क्रांतिकारक सावरकर
हिंदुसंघटक सावरकर
हे सर्व वाचताना आपणच अचंबित होऊन जातो की हा एकच मनुष्य किती अद्भुत आणि विविध प्रकारचे आयुष्य जगलाय !
वीर सावरकर कायम म्हणायचे , 'देश हा देव असे माझा '' देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो , व या देशाचे आपण देणे लागतो ' त्यांची देशभक्ती म्हणजे उच्च कोटीची होती ...आयुष्यात जे काही भयंकर अनुभव आले , त्यामुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व विचार कधीच बदलले नाही , उलट ते अजून दृढ होत गेले ( मी स्वतः त्यांच्या याच गुणाने अगदी लहानपणापासून प्रेरित होतो व आजही आहे ) . म्हणजे मी आजही कुठलेही संकट आले तरी सावरकरांच्या जीवनाकडे बघतो व विचार करतो या माणसाला सगळेच नकारात्मक अनुभव येऊनही हा मनुष्य कायम सकारात्मक राहिला ,मग आपले संकट तर त्यापुढे काहीच नाही 🙏.
आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे ..सावरकर काय किंवा इतर कुणीही महापुरुष असो जोपर्यंत आपण त्यांनी देशाला जितके दिले त्याच्या काही प्रमाणात सुद्धा देशाला परत देत नाही तोपर्यंत या महान लोकांविषयी वाईट किंवा चुकीचे बोलण्याचा कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही ..कुणावर किती विश्वास ठेवला पाहिजे हे बघताना हा निकष लावा की या बोलणाऱ्या व्यक्तीने देशाला किती दिले आहे , आणि मग पुढे जावे .
_सावरकर समजून घ्यायचे असतील तर आधी सावरकर वाचले पाहिजे_ ..वीर सावरकरांनी पूर्ण आयुष्यात दहा हजार पानांचे लेखन केले , जे एकूण आठ खंडात विभागले आहे ..दुसऱ्या कुणाला वाचण्याची गरजच नाही इतके सावरकरांनी स्वतः लिहून ठेवले आहे .
महत्वाची सूचना - ज्यांना सावरकर वाचायला किंवा समजून घ्यायचे असतील त्यांनी त्यांचे माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचण्यास घ्यावे . हे एकच पुस्तक वाचल्यावर नुसतेच तुम्ही सावरकरांच्याच प्रेमात पडणार नाही तर इतर ही असंख्य क्रांतिकारक तरुणांच्या त्यागाची महानता तुमच्या लक्षात येईल ...देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अशा स्वतःचे आयुष्य भारतमातेवर उधळून देणाऱ्यांमुळेच मिळाले आहे हे लक्षात येईल .
हेमंत सदाशिव सांबरे
संपर्क-९९२२९९२३७०.
#सावरकरी_विचाररत्ने #vitthal_wagh #hindusthan #सावरकर #स्वातंत्र्यवीरसावरकर #VeerSavarkar #Savarkar #BharatMata #JaiShriRam
Wednesday, February 2, 2022
post 3
ब्राह्मणस्य गुदा शंखं शालग्रामं च पुस्तकम्।
धरणी न सहते कामिनी कुचमर्दनम्।।
Meaning: The back part of a Brahmin, conch shell, shalgram, book and chest of a woman should not rest (touch) on the ground. if these things touch the ground, then these acts are considered fault or bad.)
Tuesday, February 1, 2022
post 2
आज १ फेब्रू सावरकरांची आठवण
बरोबर १९६६ च्या १ फेब्रूवारीला सावरकरांनी प्रायोपवेशन करायचे ठरवले.आपले ह्या जन्मिचे कार्य पुर्ण झाले आहे.ही तात्यांची भावना होती.आपल्या दिर्घायुष्याचे महत्व काय,अशा प्रश्नावर ऊत्तर देताना ते एकदा म्हणाले होते की”जगण्याची चिंता मी कधीच केली नाही,म्हणूनच बहूधा ईतका दिर्घकाळ जगलो असेन!”तात्यांनी वांच्छीलेले स्वातंत्र्य ,भाषाशुध्दी,सामाजीक सुधारणा,सैनिकीकरण आदी विषयात पुष्कळ यश मिळाले होते म्हणून तात्या म्हणत की त्यांचे जिवन कृतार्थ झाले आहे.त्यांनी पुर्वी जेजे पेरलय ते आता ऊगवत आहे.त्याला आता फळे येत आहेत.हा आपल्या आयुष्याचा फलऋतु आहे.यांवर आपण त्यांना म्हटले की , हे ठीक आहे पण अद्याप पाकिस्तान नष्ट व्हायचे आहे,आपल्याला मानणारे असे राज्यकर्ते राज्यावर बसायचे आहेत,त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.त्यावर ते म्हणत “”अरे जगात कोणाचीही सर्व स्वप्ने कधीच साकार होत नाहीत,जे झाले हे अपेक्षेपेक्षा ,कल्पनेपेक्षा पुर्ण झाले आहे.ऊरले ते काम पुढच्या पिढीचे आहे.तिला मार्गदर्शन हवे तर मी ते ग्रंथरूपाने लिहून ठेवले आहे.ते वाचणे आणि त्याला अनुसरून वागणे किंवा न वागणे हे त्यांचे काम आहे.””तेव्हा तात्यांचा जिवन संपवण्याचा विचार पक्का ठरला.ज्ञानेश्वरांप्रमाणे गुहाप्रवेश शक्य नव्हता.जल समाधी घ्यावी असा विचार केला पण तो सोडून दिला व शेवटी समर्थ रामदासस्वामीं प्रमाणे प्रायोपवेशन करायचे ठरवले.आणि १ फेब्रू १९६६ ला अन्न पाणी त्याग केला.सर्वांच्या भेटीगाठी बंद केल्या.५,६ दिवस गेले तात्यांचा रक्तदाब खूप खाली गेला.डॉ.पुरंदरेना घाम फूटला.औषध दिले पण ते औषधही घेत नव्हते.पण दूसऱ्यादिवशी रक्तदाब स्थिरावला.डॉ आश्चर्य वाटले.हे कसे झाले? कारण तात्यांचा योगाभ्यास दांडगा होता.काही सिध्दी त्यांना प्राप्त होत्या .हिंदू धर्मातील न पटणाऱ्या आचार विचारांवर कडक टीका करणाऱ्या सावरकरांनी त्यांच्या ध्वजावर अभ्यूदयनिदर्शक कृपाणासमवेत निःश्रेयस निदर्शन कूंडलिनीही अंकित केली होती.शास्त्रीय दृष्टीचे सावरकर त्यांना पटल्यावाचून स्वतः अनुभवल्यावाचून ही गोष्ट मानणे शक्य नाही.त्यांना योग शास्त्र अवगत होते .म्हणूनच सर्व भयंकर हालअपेष्टा सोसूनही ते ईतकी वर्ष जगले.त्यांच्या लिखाणात, भाषणात लोकांना मोहून टाकणारी शक्ती आली.त्यांचे नाक,कान,डोळे आदी ज्ञानेंद्रीये शेवटपर्यंत ऊत्तम कार्यक्षम राहीली.८३ व्या वर्षी सुध्दा त्यांचे केस काळे होते.प्रायोपवेशन चालू होते दिवस चालेल होते.आयूष्यभर ज्या मृत्यूला त्यांनी पळवून लावले त्याला आता निमंत्रण देऊनही तो जवळ यायला घाबरत होता .त्याही परीस्थीतीत ते सहाय्यकाला बोलावून पत्रे वाचून घेत होते.ऊत्तरे देत होते.एका मोठ्या नेत्याची तार आली .एकाने लिहीले होते”. तात्यांची प्रकृती कशी आहे? कळवा “.तर दूसऱ्याची होती”” तात्यांची प्रकृती सुधारो,अशी मी प्रार्थना करीत आहे”. हे वाचून तात्या म्हणाले नीट वाच अर्थ समजून घे.सहाय्यक म्हणाले भावना एकच आहेत तात्या.त्यावर ते म्हणाले”नाही मनातल्या भावना तारेत ऊतरतात. पहिला मी जायची वाट बघतोय व दूसरा मी बरा व्हावा असे म्हणतोय.अनेक लोक भेटायला येत होते.आचार्य अत्रेही आले.ते कोणालाच भेटत नव्हते १७ व्या दिवशी सहाय्यकाचा हात हातात घेऊन म्हणाले””आम्ही जातो अमुच्या गावा।
आमुचा राम राम घ्यावा।
आता कैचे देणे घेणे । आता संपले बोलणे ।
सहाय्यकाशी बोलेले हे ते शेवटचे शब्द.त्यानंतर तात्यांनी हे जिर्ण शरीर टाकून त्यांचा आत्मा पुढच्या प्रवासावर निघाला.जन्माची सांगता त्यांनी पुर्ण केली .
लक्षावधी लोकांना स्फूर्ती देणारे वक्ते,ग्रंथकार,नाटककार,महाकवी,परकीय साम्राज्याला आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर,विचारवंत समाजसुधारक,स्वाभिमानी हिंदुंचे हिंदूहृदयसम्राट श्री विनायक दामोदर सावरकर अखेर त्यांनी मृत्यूला २६ दिवसांनी कवटाळले व २६ फेब्रू १९६६ ला सकाळी ह्या जन्माची सांगता करून अनादी अनंत अवध्य आत्मा स्वर्गाकडे गेला.
त्यांचे महान स्फूर्ती कार्य ,त्यांचे विचार हिंदू युवक युवतींनी कार्यप्रवण करून त्यांचे उर्वरीत कार्य पुर्ण करतील हीच अपेक्षा.हा दृढ विश्वास.
शरद पोंक्षे.
#fbshare
post 1
आजच्या ५६ वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक १ फेब्रुवारी १९६६ या दिवशी सावरकरांनी आपले कार्य पूर्ण झाले आता निरोप घ्यायला हवा असे ठरवून प्रायोपवेशन सुरू केले आणि कोणाच्याही आग्रहाला किंवा विनंतीला न जुमानता त्यांनी ते चालू ठेवले, त्यावेळी त्यांनी फक्त दूध घेत नंतर तेही त्यांनी बंद करून टाकलं होतं, मातृभूमीसाठी स्वतःहून आत्मार्पण करणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झाले..
धन्य धन्य ते हिंदुसंघटक सावरकर..