Thursday, January 28, 2010



नाती

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........


काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........


नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........


पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...

Wednesday, January 27, 2010



नाती


जेव्हा एखादं नातं तुटतं
व्यक्ती जेवढी दुरावते
आठवनी तेवढ्याच जवळ येतात.
विसरायचा प्रत्येक प्रयत्न
मनाला दंश करुन जातात.


आपुलकीची जखम
खोल मनात तशीच राहते.
सगळे कही जुने जुने,
पण वेदना नवीन देत जाते.


चुक कोणाची होती
अर्थ याला राहातच नाही,
आठवनींचे ढग दाटुन आले तरी
डोळ्यातले अश्रु गालावर ओघळतच नाही.


त्या व्यक्तीचे “बोलणे” विसरु
पण, हा रोजचा “अबोला” मात्र सलतं.
ओठ हसत असले तरी
दुखतं किती ते मनालाच कळतं.


जेव्हा एखादं नातं तुटतं
दुखतं किती ते फ़क्त मनालाच कळतं

Friday, January 8, 2010

पाऊस आलाय….भिजून घ्या

पाऊस
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

Monday, January 4, 2010

पाऊस


काल हुतलय पावसाक
माफ कर बाबा.
आज भिजाक जमाचा नाय
मॆत्रीच्या पावसात भीजान
झालय वलोचींब
न्हावक घालता बघ माका
शुभेच्छांचो प्रत्येक थेंब
मीत्रांची इतकी गर्दी झाली
की भीजान भीजान माका सर्दी झाली
मगे पावस रिमझीम हसलो
ढगांका घेवन क्शीतीजार जावन बसलो
जाता जाता हुंता कसो " काळजी नको झीला, खुप भीजान घे
आनी मगे भीजान झाला की परत मॆत्रीचीच ऊब घे.

Saturday, January 2, 2010

मैत्री

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.


काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.


काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.


मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात



Friday, January 1, 2010



कुणीतरी असाव .........


कुणीतरी असाव .........
कुणीतरी असाव,
आपल वाटणार,
कुणीतरी असाव,
आठवण काढणार !


कुणीतरी असाव,
स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव,
आसव टीपणार !


कुणीतरी असाव,
गाली हसणार !
कुणीतरी असाव,
लाजवणार !


कुणीतरी असाव,
मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव,
चांदण्यांचा वर्षाव करणार !


खरच कुणीतरी असाव,
क्षितिजापार घेवून जाणार

Monday, December 21, 2009

मकरसंक्रांत SMS




संक्रां


मनात असते आपुलकी मणून स्वर होतो ओला ,
हलवा, तिळगुळ घ्या घ्या अन गोड गोड बोला !!!

नाते तुमचे आमचे हुळूवर जपायचे तिळगुळ हलव्या संगे अधिक द्रूड
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेछा !!!

एक तील रुसला फुगला रडता रडता गुळाच्या पाकात पडला ,
खुदकन हसला ,हातावर येताच बोलू लागला ,
तील गुल घ्या नि गोड गोड बोला !!!!

दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा
बंध दाटत्या नात्याचा !!
शुभ मकरसंक्रांत

Tuesday, December 16, 2008

एकदातरी आयुष्यात कुणी असे भेटावे
ज्याला आपल्या मनातले सर्व कही सांगावे,
संगता संगता आयुष्य पूर्ण सरून जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे ......

एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे,
ज्याला घेवून सोबतीने खुप खुपछलावे,
चलता दुरवर खुप खुप थकावे ,
पण थकल्या वरही आधार साठी त्यच्या कडेच पाहावे.............
एकदातरी आयुष्यात कोणी असे भेटावे,

दुख त्यचे आणि आश्रू माझे आसवेत,
त्याच्या साथी मी जगताच रहावे जगताच रहावे
आणि त्यच्या साठी जगतानाच आयुष्य सरून जावे ...............
एकदातरी आयुष्यात कोणी असे भेटावे

ज्याच्या सोबतीला प्रतेक क्षणाने सुखावे,
उनत त्याने सावली तर पावसात थेम्ब व्हावे,
आणि मायेच्या थेम्बानी मी ,चिम्ब भिजुन जावे ,
एकदातरी कोणी असे भेटावे ,सुर त्याचा आणि शब्थ माझे असाव

Thursday, October 30, 2008

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.
आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.
आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.
असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद तर,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं ........!!!!!!!!!

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!!!

Wednesday, October 29, 2008

आयुष्य
ठरवल होत खुप काही पण सारच तस घडल नाही
विधिलिखित असत सार मीही याला अपवाद नाही

सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाही
भल्यासठीच होते सारे कलतय पण वळत नाही...........
हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

मला एवढेच वाटते..................................
मला एवढेच वाटते सुन्दर आयुष्य जगावे,
स्वप्नाचे गाव पवलोपावली बसावे

सुन्दर कल्पनानी सजलेले असावे,
वास्तवाचे भान मात्र सदैव रहावे

जगण्याला मानाचा मुजरा असावा,
अपमानाला क्षणीकही थारा नसावा

एक विश्वासाची सोबत असावी,
प्रेमाने मयेने मने जुळावी

मला एवढेच वाटते नवी आशा फुलावी,
येणार्या शतकची सुन्दर पहाट असावी.........

मन
मन कधी फ़सत,मन कधी रुसत...
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं...
सांगायला मात्र काही जमत नसत...
समजुन घ्यावं असं खुप वाटतं...

Tuesday, October 28, 2008

आयुष्याच्या अल्बममध्ये
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा ........................

Monday, October 27, 2008

तिच्या प्रेमात अजुनही झुरतो आहे नाव
तिचे घेण्यात वेगळीच नशा आहे
कधीतरी हो म्हणेल अशी वेडी आशा आहे.
प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...

प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं,
पाखरू बनून उंच उंच
तिला घेवून उडायलाच हवं...

तिच्या हस-या चेह-यावर जावू नका
अंतर्मनात जावून दुःख
एकदा तरी बघायलाच हवं,
अगदी मरण यातना सोसून
तिचा श्वास होवून जगायलाच हवं...

आयुष्याचा श्वास आहे ती
म्हणुन आयुष्य अजुन टिकून आहे,
तिलाही खुप त्रास होत असेल
केवळ तुम्हाला त्रास नको म्हणुन
ती हातचं काही राखून आहे...

असं प्रेम मिळणं हा
नशिबाचा एक भाग आहे,
ते मिळवण्यासाठी थोडं धडपडायलाच हवं,
त्यासाठी प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं..

Sunday, October 26, 2008

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद तर,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं ........!!!!!!!!!!

Friday, October 24, 2008

ठरवल होत खुप काही पण सारच तस घडल नाही
विधिलिखित असत सार मीही याला अपवाद नाही
सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाही
भल्यासठीच होते सारे कलतय पण वळत नाही...........
हे जीवन एक रहस्य आहे,तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,तरी जगा समोर हसावं लागतं...."
मला एवढेच वाटते..........

Thursday, October 23, 2008

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !


शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून
स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून
पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन..
...टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून


दुरुनच बघायचय तिला चाकां आडून
विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून
चालायचय सोबत मग सायकल हातात धरून..
...विचारणारे तिला आता योग्य संधी बघून


शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून
बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून
बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून..
...कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?


नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून
पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून
मी मात्र तिच्या नजरेला चुकवून..
...काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?


तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून
हातातली छत्री झटकन उघडून
माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून..
...पहायचय रे मला एकदा प्रेम करून

Wednesday, October 22, 2008

तूका कोंकण साद घालता



कोकणातून शहरात आलेल्या प्रत्येक चाकरमन्याची कर्मभूमि जरी मुंबई असली
तरी कोकण ही त्याची जन्मभूमि जननी आहे.
त्या जननीची निदान आठवण तरी काढणे हे प्रत्येक चाकरमन्याचे कर्तव्य आहे.

अरे शहरी धन्या चाकरमन्या
तूका कोंकण साद घालता
वरसातून एकदातरी भेटिक बोलयता
अरे सायबा भेटाक बलयता

शहरात गेलंय चाकरी केलयं
कसो रे कनो वाकयलंय
पैश्यामागे लागान कसो घराक इसारलंय
अरे पोरा घरार पाणी सोडलंय

मातयेत लोळान मोठो झालंय
कसो मातीक इसारलंय
आनी मातीच्याच छातीवर बंगले उभारलंय
अरे लेका जमीन खावनं बसलंय

हुतुतू खेळलंय खोखो खेळलंय
कसा मैदान गाजयलंय
फळकुट हातात घेऊन खेळाची वाट लायलंय
अरे गड्या खेळार ओस मारलंय

हापूस चोकून मिटके मारलंय
आंब्यार ताव मारलंय
तोरा चावान पोरां तुझी त्वांड आमट करतत
अरे बाबा तोंडार म्हावं मारलंय

शिकान-शिकान पदव्या घेतलंय
मोठो बॅरीस्टर झालंय
कोंन्व्हेंटमध्ये पोरां शिकवून मराठी बिगड़लंय
अरे पुता मराठीची वाट लायलंय

लयं बरा केलंय रेल्वे हेलंय
थोडो परवास सुखावलो
भैयाक वसरी दिलंय तूझो भावबंद दुखावलो
अरे भावा भावाशीक दुखयलंय

अरे इस्टेट् कमयं पैसो कमयं
कर झिला घराची आठवं
-अनामिक

Tuesday, October 21, 2008

कोकणात येवा



कोकणात येवा आंबोलीक जावा, धबधब्यात न्हावा!
मालवणचो बांगडो खावा,खाजा घेवा, दर्यात थोडे पेवा!!

चारय बाजुक दर्यो आणी किल्ल्यात पाणी गोड!
उगाच नाय सगळ्याका सिंधुदुर्ग किल्ल्याबद्द्ल ओढ!!

वाडीचो डोंगर चढा, मोती तलाव फिरा, खेळणी घेवा लाकडी!
आरवलीचो वेतोबा, रेडीचो गणपती बघुक वाट करा वाकडी!!

आंबे, फणस, जांभळा, काजु, कोकणचो मेवो!
शिपये, मुले, तिसरे खरो रत्नागिरीचोच ठेवो!!

डोंगरमळे शेती, पोफळी, माडार नारळाचो भार!
गाडयेत्सुन बघीत येवा सगळा हिरव्या हिरव्या गार!!

नापरे, आंबोली धबधब्यासाठी पावसात तुंम्ही येवा!
तेरेखोल खाडी बघताना फेरीबोटीचोय अनुभव घेवा!!

डोंगरदरे, शेतीमळे, पार करुन कोकण रेल्वे सुरु झाली!
मुंबयपासुन गोव्या पर्यंत माणसा एकदम जवळ ईली!!

निसर्ग सौंदर्य म्हणतत ता तुंम्हीच डोल्यांनी बघा!
बघुन वगी र्‍हवा नको इतर लोकांका तुंम्ही सांगा!!

हकडे तकडे खयच जवक नको, कोकणच आमचा बरा!
कोकण बगुन पाय उचलाचो नाय, जावक तुमच्या घरा!
ज़ावक तुमच्या घरा!!
-अनामिक

Monday, October 20, 2008

नका शंका करू माझ्या मैत्रीवर--
कराल माझ्या मैत्रीवर शंका
तर पेटेल रावणाची लंका
वाजेल सर्वत्र डंका
जर कराल माझ्यावर शंका
नेहमी चांगल्या मित्रांसाठी मी धडपडतो
बोलताना त्यांच्याशी थोडा गड़बड़तो
चुक माझी असता थोड़ा हडबडतो
आणि चुक नसेल तर मित्रांना खुप बडबडतो
आहे मी हळव्या मनाचा
लोभ नाही मला धनाचा
नेहमी विचार करतो जनाचा
पण या जगात कुणी ना कुणाचा ..

Sunday, October 19, 2008

चांदण्या रात्री आकाशाकडे बघून
ढगांच्या पलिकडचे जग पहावं,
कुशित घेऊन तारे मोजावे वाटावं
असं कोणीतरी असावं

धगधगत्या आयुष्यात विसावा घ्यावा
ज्वलंत जीवनाचे चित्र निर्माण करावं
हातात हात घेऊन चालत रहावं
असं कोणीतरी असावं

ओलावलेल्या पापण्यांच्या कडा पुसून
थेट ह्रदयापर्यंत पोचावं,
असं नक्षत्रासारखं
कोणीतरी असावं....