Monday, April 11, 2011

मराठी हास्यकट्टा 26

तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
... गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?
अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
**********************
कार..

अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते.

तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
... ' काय बाबूराव आज पायी पायी , काय कार विकली की काय ?'

अत्रे म्हणाले. ' अरे आज तुम्ही एकटेच ? वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
**********************
संपतराव आपल्या
पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज अजूनं माझ्या पॅंटच्या खिशातले काही
पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
.
पत्नी : कमाल आहे तुमच्या
... अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून
तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?...
.
संपतराव : तू नक्कीच खिशात हात
घातलेला नाहीस, कारण त्यात ... अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
**********************
वकील : चोरी करताना स्वताच्या बायको मुलांचा विचार तुझ्या मनात नाही आला?

चोर : विचार आला होता साहेब, पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचाच समान मिळत होत.

**********************
पु.ल. देशपांडे ह्यांचे काही मजेदार किस्से

एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,” आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!”

**********************
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले “अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!”
**********************
वाऱ्यावरची वरात’चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले… ‘प्रयोग संपेपर्यंत थांब!’ लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, ‘उद्या याची ‘वरात’ निघणार आहे, पण तो आजच ‘वाऱ्यावर’ स्वार होऊन आला आहे’…आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
**********************
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले “गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये.” यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
**********************
एकदा एक ‘कदम’ नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले…..पु लं नि आशीर्वाद दिला …….
‘कदम कदम बढाये जा’
April 11 at 9:06pm

0 comments: