Wednesday, April 20, 2011

सूर्यफुल-सचिन आचरेकर

 सूर्यफुल


रोज ते सूर्यफुल सूर्याकडे बघायचे..
सूर्यासोबत आपली दिशा बदलायचे...

काळ्या ढगात सूर्य लपला..
की ते पण रूसायाचे..

सूर्याकडे बघून सगळेच डोळे मिटतात..
पण सूर्यफुल नजरेला नजर द्यायचे..
सूर्याची कीराणे अंगावर झेलायचे..
आणि सुखद भावनानी..फुलायचे...

एक दिवस सुर्या उगवला...
पण त्याला सूर्यफुल नाही दिसले..
सूर्याच्या किरणानी पण फुलला शोधले....

शेताताले ते सूर्यफुल नेले होते माणसाने...
तेलाच्या घाण्यात...तेल बनवण्यासाठी...
सूर्य मात्र रडत होता त्या फुलासाठी....

0 comments: