Monday, September 1, 2014

देव असलाच तर असावा


#मराठी

देव

देव----,
असलाच तर असावा
उगवत्या सूर्याच्या सोनवर्खी बिंबात
पडणा-या पावसाच्या पारदर्शी थेंबात
मेढीला फुटलेल्या हिरव्यालूस कोंबात

देव----,
दिसलाच तर दिसावा
आडवाटेला ऐचानात फुललेल्या एकांड्या फुलात
आपल्याच अंगठ्यातून दूध चोखणा-या मुलात
आजीच्या गोधडीत सुरकौतल्या उबदार गालात

देव----,
भेटला तर भेटावा
वेठबिगार मजूराच्या निढळाच्या घामात
हंबरणा-या गायीच्या करूणाकर प्रेमात
अन्यायाविरूद्ध पेटणा-या रक्ता-रोमरोमात

साहेबराव ठाणगे
https://www.facebook.com/profile.php?id=100008367404839

Related Posts:

  • आठवले शब्द मरणाच्या दारी आत्मनआठवले शब्द मरणाच्या दारीआता उराउरी भेटताती.जगावे मरावे अजाणता कोणीत्वां - मी कोण योनी आकळावी.कुणाचे कशाला जपावे आत्मननादावले मन भार वाही.अर्थ अस… Read More
  • तारका झोपायचा संकेत काही देत नाही तारका झोपायचा संकेत काही देत नाही, पेरलेले चांदणे माझे हृदय की शेत नाही,वाहला नाही कधी आवेग माझ्या भावनांचा,कारणाने सागराच्या याच मी अटकेत नाही,… Read More
  • काव्यतरंग मीमराठी उपक्रम #काव्यतरंग #मीमराठी उपक्रम एक कवी एक कविता =============== काव्यतरंग मी मराठी उपक्रम #काव्यतरंगएक कवी/कवयित्री एक … Read More
  • वेदने तुज स्मरावे किती वेदने तुज स्मरावे किती ! पापण्यांनी भिजावे किती! दाब वेड्या तुझे हुंदके...सांत्वनांनी रडावे किती?श्वान सारे तुझ्या भोवतीआंधळ्या तू दळावे कि… Read More
  • नात्यांचा अर्थ नात्यांचा अर्थ किती जणांना समजतो ? श्वासांचा स्पर्श किती जणांना उमजतो ? जीवनाचे हे गहीरे सत्य जाणले ज्यांनी प्रेमाचा सागर लिलया पार केला त्यांनी … Read More

0 comments: