Tuesday, September 2, 2014

तितकं वेडेपण झेपलं असतं तर….


#मराठी

तितकं वेडेपण झेपलं असतं तर….

पायाखालची वाट माझ्याच बापाची होती
शून्याच्या वळणावर सूचना लाखाची होती
हळव्या हळव्या कपाळावर आठी होती खडूस
मीच म्हणालो जीवनाला प्रेमात नको पडूस

पण तितकं वेडेपण झेपलं असतं तर….
वादळाच्या हृदयामध्ये बांधलं असतं घर …

भावनांच्या गालांनी खाल्ली होती थप्पड
कारण नशा चढण्याआधी केली होती धडपड
एक वणवा विझला तेव्हा एक प्रश्न मिटलाही
राखे मध्ये असतं "भलं" हा विश्वास पटलाही

पण तितकं वेडेपण झेपलं असतं तर….
मरणालाही म्हणालो असतो …. हात माझा घट्ट धर

झेपलं असतं तर….

- विजय बेंद्रे (एक वादळी पाऊस)
https://www.facebook.com/vijay.bendre.52

0 comments: