Saturday, September 6, 2014

नभाखालती अथांग


#मराठी

नभाखालती अथांग
वेड्या वळणाच्या वाटा
दर्याखोर्या पहाडांशी 
काळ्या अंधाराच्या लाटा

वाट चालायची दूर
कुठे दिसेना सावली
मला टाकून एकटी
कुठे हरवून गेली

होता सकाळ पाठीशी
मध्यान्हीला पावलात
आता दिवस ढळता
कुठे विरली नभात

शोधशोधले किती मी
चोहिकडे आसपास
उगा चाहुलीचे तिच्या
खोटे खोटेच आभास

खोल मनाच्या तळात
हाक अवचित आली
आणि माझीच सावली
मला तिंथे गवसली

वर्षा
https://www.facebook.com/varsha.kulkarni.1840

Related Posts:

  • तो यथेच्छ बरसत होता #मराठीतो यथेच्छ बरसत होतामी एका आडोशाला होतोछत्रीची उघडझाप करतस्वत:लाच सावरत होतोतो यथेच्छ बरसत होतारस्त्यावर कोणीच नव्हतंचहूकडे अंधार पसरलेलाकाहीच… Read More
  • आता मी #मराठीआता मी======आता मी -मन कठोर करायचं ठरवलंय...आता मी -तुला विसरायचं ठरवलंय …मी बोलायचं,तू टाळायचंहे नेहमीचं-आता मी -गप्प गप्प रहायचं ठरवलंय …तु… Read More
  • कितीसा असा उरणार आहे #मराठीकितीसा असा उरणार आहेदाटूनच आलाय तो बरसणार आहे..कर्कश त्याचा वावर आहे..सोसलं जे वसूल करणार आहे..पावसाला पाऊस म्हणाव की नाही..ही शंका आज असुरी … Read More
  • नभाखालती अथांग #मराठीनभाखालती अथांगवेड्या वळणाच्या वाटादर्याखोर्या पहाडांशीकाळ्या अंधाराच्या लाटावाट चालायची दूरकुठे दिसेना सावलीमला टाकून एकटीकुठे हरवून गेलीहोता… Read More
  • तृप्ती शोधतो आहे #मराठीतृप्ती शोधतो आहेपंचतारांकित चवीला भोगतो आहेभाकरी पिठल्यात तृप्ती शोधतो आहेअंतरी भक्ती नसोनी, रोज जगदंबे,पोट भरण्या जोगवा मी मागतो आहेका मनाची… Read More

0 comments: