जीवन त्यांना कळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
मीपण ज्यांचें पक्व फळापरी सहजपणाने गळलें हो
मीपण ज्यांचें पक्व फळापरी सहजपणाने गळलें हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचें, गेलें तेथें मिळलें हो
चराचरांचें होउनि जीवन स्नेहासम पाजळलें हो
जीवन त्यांना कळले हो
चराचरांचें होउनि जीवन स्नेहासम पाजळलें हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्कालीं अन् दीनांवर घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
आपत्कालीं अन् दीनांवर घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रें मोहित होऊन जळलें हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुललें अन् परिमळलें हो
जीवन त्यांना कळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुललें अन् परिमळलें हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचें वैभव ज्यांनी तुळिलें हो
सायासाविण ब्रह्म सनातन घरींच ज्यां आढळलें हो
- उरींच ज्यां आढळलें हो
जीवन त्यांना कळले हो
सायासाविण ब्रह्म सनातन घरींच ज्यां आढळलें हो
- उरींच ज्यां आढळलें हो
जीवन त्यांना कळले हो
- बा. भ. बोरकर
0 comments:
Post a Comment