#मराठी #Marathi #पुस्तक #Book
शब्दमल्हार ~ प्रवीण दवणे
---------
जगणं तसं सर्वांचं थोड्याफार तपशीलानं तेच असतं. वेगळेपण येतं - ते तुमच्या आतल्या धडपडीमुळे ! त्या धडपडीचं मोल यश अपयश यात मोजता येतं नाही . तुम्हाला तुमच्या आतल्या चेहऱ्या पर्यंत कितपत पोहोचता आलं , ते महत्वाचं असतं . कवितेचं बोट धरून तो चेहरा मी धुंडाळतो आहे . त्या धुंडाळ ण्यात , ती दमछाक होण्यात एक गंमत आहे .
एक मन , आकाश शोधतानाची धडपड हि सुद्धा एक कविताच असते .
जे कुठचं नसतं ते आपल्यातून प्रकटतं याचं आनंद प्रत्येक कलावंताला असतो . आपल्याच कलाकृतीकडे
अलिप्तपणे , चकित होऊन पाहण्याचे क्षण आनंद हि देतात आणि अंतर्मुख हि करतात . शब्द मल्हारा चे सूर
सरस्वतीच्या गाभाऱ्यात आळविताना माझ्या कवितेने मला हि अनुभूती दिली .
0 comments:
Post a Comment