Showing posts with label महाराष्ट्र दिन. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र दिन. Show all posts

Sunday, May 3, 2020

महाराष्ट्र दिन

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य 
संघटना आयोजित 


#महाराष्ट्र_दिन प्रश्न मंजुषा या स्पर्धेचे उत्तरे







....







जय मराठी ! जय महाराष्ट्र 
#मराठीएकीकरणसमिती

Sunday, May 1, 2011

मी मराठी तर्फ़े महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!
माय मराठी पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही |
असतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपातील सारे पण स्वराज, महाराष्ट्र कधी ही संपणार नाही ||


जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा॥।
महाराष्ट्र ही पराक्रमी व शुर लोकांची, संतांची भुमी आहे...
आणि आम्हाला महाराष्ट्रच्या भुमीत जन्मल्याचा सार्थ अभिमान आहे..



महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानास मानाचा मुजरा.
१ मे महाराष्ट्र दिन आणि हुतात्मा दिन चिरायू होवो .


 

महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले , महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले.... 
उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा
जयजयकार तयाचा आसमंती गर्जावा
सांडीले रुधीर जयानी महाराष्ट्रासाठी
जन्म तयाचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा...
जय  हिंद !!  जयमहाराष्ट्र !!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....



महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले .. मराठा तितुका मेळवावा ..महाराष्ट्र धर्म वाढवावा.बेळगाव , भालकी निपाणी हे भाग अजून महाराष्ट्रात सामील होणे अजून बाकी आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून अपूर्ण आहे.





Saturday, May 1, 2010

महाराष्ट्र माझा !!

महाराष्ट्र माझा !!

महाराष्ट्र माझा !!
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!