Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

Thursday, April 7, 2011

महाराष्ट्र

 जेव्हा महाराष्ट्राला जाग येते.......

मराठी अस्मीतेवर हल्ला होण्यापूर्वीच
गडगडतो तो राज गड ,
हल्ल्यासाठी तयार होतो तो प्रतापगड,
आणि, ढाल घेऊन उभा राहतो तो तोरणा........

अरे मी, मी मराठी माणूस
जागा झालोय,
आठवूनी बाजीची पावनखिडं,
हातात तलवार घेऊन, दुश्मनांची वाट पाहतोय.......

अरे मी, मी मराठी माणूस
भुकेला झालोय,
आता परप्रातीयांची काही खैर नाही,
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते...............

अरे मी, मी मराठी माणूस
अंगात माझ्या मराठयाचं रक्तं,
शपथ शिवरायांची घेऊन,
उभा करतो आज महाराष्ट्राचा तक्तं...........

अरे मी, मी मराठी माणूस
आवाज उठवतोय, अत्याचारावरच नाही तर,
रक्त भ्रष्टाचारी मानसाचं साडूंन
भविष्य मराठय़ाचं जपतोय........

जेव्हा महाराष्ट्राला जाग येते...............
!!! जय महाराष्ट्र !!!

-अनामिक 

Saturday, May 1, 2010

महाराष्ट्र माझा !!

महाराष्ट्र माझा !!

महाराष्ट्र माझा !!
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!