Friday, November 19, 2010

काकांचा कट्टा

रस्त्याने जाताना पुरुषाला मागे वळून बघायला लावणारी स्त्री हीच सुंदर असते का?
-श्रीराम पाध्ये, डोंबिवली

परवा तुम्ही रस्त्याने जाताना खड्डय़ात पडलात, त्याचं कारण आता समजलं.

-----------
सुंदर बायको नेहमी शेजाऱ्याला का?
-अमित पाटील

तुमच्या शेजाऱ्याचे मत तुम्हाला कळले तर.

-----
जर तुम्ही इंजिनिअर असता तर काय केले असते?
- हृषिकेश साळुंखे

मी कशाला काय केले असते? असिस्टंट इंजिनिअरला काम सांगितले असते.

राजकारणाविषयी तुमचे मत काय?
-जान्हवी भोईर
मी सध्या सत्ताधारी पक्षात असल्याने मला राजकारण आवडते.

आम्हांला वाटेवर काटे मिळतात, तुम्हाला कविता कशा मिळतात?
-विजय महाम्बरे, वेंगुर्ले

सतत डोक्यात कुणाचा तरी काटा काढायचा विचार सोडून द्या!

२०२० पर्यंत जर खरंच इंधन संपले तर..
-मुकेश , पालघर

आम्ही सर्व गार पाण्याने आंघोळ करतो व कच्च्या भाज्या खातो,तुमचे बघा!

काका तुमचे वय किती?
-भूषण वागड, वासिंद
माझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्याचे विसरलात वाटतं!


नवरा जेव्हा सौंदर्याची स्तुती करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो?
-मुकेश जाधव, सटाणा
सास-याचा प्रॉव्हिडंट फंड आला असणार.

0 comments: