Sunday, May 29, 2011

पु.लं चे किस्से

 पु.लं चे किस्से 

काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.

गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ’ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
‘ आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ‘ गणपतीपप्पा ’ झाल्यासारखा वाटतो ’

----------
पुलंच्या लहानपणाचा एक प्रसंग.

पुलं तेव्हा चौदा पंधरा वर्षांचे होते. लोकमान्य सेवा संघात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर होणा-या प्रश्नोत्तरात शाळकरी पुरुषोत्तमनं प्रश्न विचारला. त्या काळी भारतानं फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये यावर चर्चा चालू होती. तर पुरुषोत्तमनं तात्यासाहेबांना विचारलं की फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये ?
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं,
‘ स्वीकारू नये, पण राबवावं. ’
यावर पुरुषोत्तम म्हणाला, मला आपलं उत्तर कळलं नाही.
त्यावर तात्यासाहेब म्हणाले, ‘ आपल्याला कळेल असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा. ’
त्यावर पुरुषोत्तमांनी तात्काळ प्रश्न विचारला
‘ पुण्याला सध्या अंजिरांचा काय भाव आहे ?’

----------
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ‘ बॉक्स मिळेल का ?’ म्हणून विचारलं.
‘ हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ’ दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ‘ अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.

---------
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. 'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

---------------------
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी (साडी ऎवजी)पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"

Saturday, May 28, 2011

पु.लं. चे काही किस्से !!!


एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!

पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?

पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" घरात हशा पिकला होता !

डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.

"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."

स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे".

Thursday, May 26, 2011

मराठी हास्यकट्टा-1

मराठी हास्यकट्टा


एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!

********************
चंगू : अभ्यासाच्या प्रवासात आपण फक्त चालत राहायचं असतं.. चालत राहायचं असतं..

मंगू : असं का रे?

चंगू : कारण ' वाट ' तर लागलेलीच असते...

********************
एक मुलगी चेहऱ्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवर उभी असते.
तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,
"ए, आती क्या खंडाला?"
... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"

********************
मराठी भाषा फारच अवघड आहे ................

गाड़ी बिघडली असेल तर म्हणतात गाड़ी " बंद " आहे .

आणि
...
पोरगी बिघडली असेल तर म्हणतात पोरगी " चालू " आहे .

********************
शिक्षक : अशी कल्पना करा की, तुम्ही कोट्यधीश आहात आणि तुमचे आत्मचरित्र लिहा.

शिक्षक : गंपू, तू का लिहित नाहीस?

गंपू : सेक्रेटरीची वाट बघतोय!!
********************
पिंट्या : ओ बाबा... ओ बाबा...ओ बाबा

बाबा : काय रे पिंट्या?

पिंट्या : एका गंभीर विषयावर बोलायचंय.

बाबा : शाळेत काही झालं का?

पिंट्या (गंभीरपणे): नाही, त्याचं काय आहे ना... तुमच्या बायकोशी यापुढे एडजस्ट करणं जरा कठीण आहे आता...
त्यामुळे मला माझी स्वत:ची बायको आणून द्याल तर बरं होईल म्हणतो...
********************
संता : वहिनींचं नाव काय रे?
बंता : गुगल कौर

संता : का रे?

बंता : अरे कारण तिला एक प्रश्न विचारला की ती किमान दहा उत्तरं देते.

********************
गंपू : डॉक्टरसाहेब, तुमची नर्सच्या हाताला गुण आहे.

तिचा हात लागताच मी खडखडीत बरा झालो.

डॉक्टर : माहिती आहे मला... थप्पडीचा आवाज बाहेर ऐकू आला...

Tuesday, May 24, 2011

आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी !!!!

 आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी !!!!

१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.

Monday, May 23, 2011

मराठी अस्मिता जोपासणारे शिकागोचे अधिवेशन

मराठी अस्मिता जोपासणारे शिकागोचे अधिवेशन
-
जुलै २१ ते २४ २०११ दरम्यान शिकागो येथे भरणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १५ वे द्वैवार्षिक अधिवेशन, आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये वास्तव्य करणाऱ्या समस्त मराठी जनांचे हे संमेलन, म्हणजे भारताबाहेरचे सर्वात मोठे मराठी अधिवेशन असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

सुमारे पन्नास वर्षांपासून अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागलेली मराठी कुटुंबे, गेल्या दशकात फार मोठ्या संख्येने अमेरिकेत आली. गावोगावी असलेल्या मराठी मंडळांमध्ये उत्साहाचे एक नवीन वातावरण निर्माण झाले. पूर्वीपासून इथे राहणाऱ्यांना या नव्या पिढीची अनेक कारणांसाठी अपूर्वाई वाटली. काही बाबतीत ही मंडळी मॉडर्न असली, तरी मराठी भाषा आणि संस्कृती त्यांना तितकीच प्रिय आहे हे पाहून जुनी पिढी हरखली. अधिवेशनाचा विडा उचलण्याचा विचार करताना असाच काहीसा अनुभव आम्हा शिकागोकरांना आला. मुळात बृहन्महाराष्ट्र मंडळ हे शिकागोमध्येच उगम पावलेले आहे आणि मंडळाचे पहिले अधिवेशनही इथेच संपन्न झाले होते. १९८१ मध्ये स्थापन झालेल्या मंडळाच्या तिसाव्या वर्धापनदिनी, हे अधिवेशन पुन्हा एकदा शिकागोला भरणार हे निश्चितच औचित्यपूर्ण आहे.

अमेरिकेत अशा प्रकारचे अधिवेशन भरविणे ही सोपी गोष्ट नाही ह्याची जाणीव असूनही केवळ उत्स्फूर्तपणे पुढे आलेल्या स्वयंसेवकांच्या जोरावर आम्ही हे अधिवेशन भरवण्यास प्रवृत्त झालो. मी गेली बरीच वर्षे शिकागोचा रहिवासी आहे. महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो कार्यकारिणीमध्ये स्वयंसेवक, अध्यक्ष, विश्वस्त असा सर्वांगीण अनुभव आणि मुख्य म्हणजे इथल्या वास्तव्यात मिळालेले जिवाभावाचे मित्र एवढ्याच शिदोरीवर खरेतर ह्या कार्याला हात घातला. पण अधिवेशन शिकागोला होणार, अशी अधिकृत घोषणा झाली आणि अनेक तरुण मंडळी अतिशय उत्साहाने आणि उमेदीने अधिवेशनाच्या विविध समित्यांवर कार्यरत झाली.

जवळजवळ पन्नास मैलांच्या परिघात वसलेला शिकागो मधला समस्त मराठी समुदाय एकत्रितपणे आणि एकदिलाने आपल्याला जमेल ती जबाबदारी घेण्यास सिद्ध झाला. माझ्या दृष्टीने अधिवेशनातली ही सर्वात जमेची बाजू. तरुणांच्या उत्साहाला अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आणि एकमेकांना जवळून ओळखणारी अनेक मंडळी हा मेळ जमणे अतिशय आवश्यक आहे, ही जाणीव झाली. अर्थात इथले मराठी बांधव सारेच हुशार, उच्च शिक्षित काही बाबतीत सर्वज्ञ! त्या सर्वांना एखाद्या निर्णयाप्रत आणताना कोणाचा उपमर्द किंवा मानभंग होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वच समिती प्रमुखांनी लक्षात ठेवले. त्यामुळे एकंदरीत लाभलेले सगळ्यांचे उत्तम सहकार्य आणि वाढता उत्साह लाभला. आमची सर्वांची एकजूट आम्हाला आमच्या ध्येयाप्रत नेणार हे निःसंशय.

आपापले उद्योग आणि व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात म्हणजे बहुतांशी वीकेंडलाच काम करणे शक्य असल्याने, गेली दोन वर्षे हा उपक्रम सुरु आहे.अधिवेशनाला जगभरातून येणाऱ्या मराठी बांधवांसाठी हा एक आनंद सोहळा असेल अशी आमची अपेक्षा आणि तयारी आहे. डॉ. अनिल काकोडकर, श्री. रत्नाकर मतकरी, शोभा डे, मीना प्रभू, श्रेयस तळपदे इत्यादी मान्यवर व्यक्ती अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. "मराठी बाणा" हा मराठी कला आणि संस्कृतीचा मानबिंदू ठरलेला सुमारे ८० कलाकारांचा रंगमंचावरील अभूतपूर्व आविष्कार शिकागोच्या अधिवेशनात साकार होणार, ही तर श्रींची इच्छा! शिवाय गिरीश जोशी लिखित नवे कोरे नाटक "लव्ह बर्डस" आणि अमेरिकेतल्या कलावंतांचे अनेक मनोरंजक कार्यक्रम होणार आहेत. शिवाय व्याख्याने, चर्चासत्रे, लेखक मेळावा, उद्योजक परिषद, विक्रेत्यांचे प्रदर्शन आणि विक्री केंद्रे, यांचा अंतर्भाव असलेले असे हे भव्य अधिवेशन असेल. मिशिगन महासरोवराच्या किनारी असलेले McCormick Place Convention Center हे अधिवेशनाचे स्थळ आहे. वेबसाईट : bmm2011chicago.org

- नितीन जोशी, प्रमुख संयोजक,
niteen.joshi@bmm2011chicago.com

Sunday, May 22, 2011

आयुष्य कधी असंही जगावं लागतं..

आयुष्य

आयुष्य
कधी असंही जगावं लागतं,
खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,

कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबावं लागतं,
इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवावं लागतं,

तीव्र इच्छा असून देखील नाही म्हणावं लागतं,
...खूप प्रेम असुन देखील नाही असं दाखवावं लागत,

असं इतरांना हसवता हसवता कधी खूप रडावं लागतं,
कधी असही जगावं लागतं !!!!
-अनामिक

Saturday, May 21, 2011

दूरावा म्हणजे प्रेम...

दूरावा म्हणजे प्रेम...

प्रेम

दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...

दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण..

दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात.

दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...

दूराव्यात प्रेमाचं घर असतं,अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...
दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा..

-अनामिक

Friday, May 20, 2011

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..

मैत्री

जिथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते
आनंद दाखवण्यासाठी
हसायची गरज नसते

दु:ख दाखवण्यासाठी
...आसवांची गरज नसते
न बोलता ज्याच्यामध्ये सगळेच
कळते ती म्हणजे मैत्री!!!!!!!!!!!!!!!!!!!   
-अनामिक

Thursday, May 19, 2011

प्रेमाचा खरा अर्थ

प्रेमाचा खरा अर्थ

दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता
-अनामिक

मराठी हास्यकट्टा 23

आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..
आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..
मला जावू द्याना घरी
आता वाजले कि बारा . :D :D

*******************
बंटी : दादा मी खुप अभ्यास केला पण मला फक्त ८०% च मिळाले.
दादा : ८०% काय कमी झाले, त्यात २ मुल ४० % -४० % टक्के घेऊन खुशाल पास झाली असती !!!

*******************
मराठी भाषा फारच अवघड आहे.

गाड़ी बिघडली असेल तर म्हणतात गाड़ी " बंद " आहे .

आणि
...
पोरगी बिघडली असेल तर म्हणतात पोरगी " चालू " आहे .

*******************

गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’

*******************
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"

*******************
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!
*******************
पुलंच्या लहानपणाचा एक प्रसंग.

पुलं तेव्हा चौदा पंधरा वर्षांचे होते. लोकमान्य सेवा संघात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर होणा-या प्रश्नोत्तरात शाळकरी पुरुषोत्तमनं प्रश्न विचारला. त्या काळी भारतानं फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये यावर चर्चा चालू होती. तर पुरुषोत्तमनं तात्यासाहेबांना विचारलं की फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये ?
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं,...
‘ स्वीकारू नये, पण राबवावं. ’
यावर पुरुषोत्तम म्हणाला, मला आपलं उत्तर कळलं नाही.
त्यावर तात्यासाहेब म्हणाले, ‘ आपल्याला कळेल असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा. ’
त्यावर पुरुषोत्तमांनी तात्काळ प्रश्न विचारला
‘ पुण्याला सध्या अंजिरांचा काय भाव आहे ?’
*******************

हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘ सफरचंद ‘ म्हणावं. ‘
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘ हवाई सुंदरी ‘ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ‘ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘ वाढपी ‘ म्हणतो, तर वैमानिकाला ‘ उडपी ‘ का म्हणू नये ?’
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ‘ पिताश्री ‘ किंवा ‘ राष्ट्रपिता ‘ म्हणतात

*******************
गंपू आणि झंपू स्टेशनला येतात, तेवढ्यात ट्रेन सुटते.
दोघेही ट्रेनच्या मागे पळू लागतात.
शेवटी गंपू कसाबसा गाडीत चढतो.
गाडीतले लोक गंपूला म्हणतात, 'शाब्बास! शेवटी तू ट्रेन पकडलीसच.'
त्यावर गंपू उत्तरतो, 'शाब्बास काय? ट्रेन झंपूला पकडायची होती, मी तर सोडायला आलो होतो!'

*******************
पिंट्या : ओ बाबा... ओ बाबा...ओ बाबा

बाबा : काय रे पिंट्या?

पिंट्या : एका गंभीर विषयावर बोलायचंय.
...
बाबा : शाळेत काही झालं का?

पिंट्या (गंभीरपणे): नाही, त्याचं काय आहे ना... तुमच्या बायकोशी यापुढे एडजस्ट करणं जरा कठीण आहे आता...
त्यामुळे मला माझी स्वत:ची बायको आणून द्याल तर बरं होईल म्हणतो...

*******************
बसमध्ये सुरेश सारखा त्या मुलीशी बोलण्याचा व काही ओळख निघते का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता.

“तुम्हाला कुठं तरी पाहिलयं, पण नक्की आठवत नाही…..आपले वडील काय करतात ?

“ते डॉक्टर आहेत”,
...
वैतागून मुलगी म्हणाली.

“तरीच………..”,

सुरेशचा धीर वाढला, “…..आता मला आठवल,

मी एकदा आजारीपडलो, तेव्हा त्यांनी औषध दिलं होतं”.

“शक्य आहे”,

ती मुलगी म्हणाली,”

ते जनावरांचे डॉक्टर आहेत”

*******************


Sunday, May 15, 2011

काही सुविचार

 काही सुविचार :

काही मुल, मुलींना ' आयटम ' म्हणून बोलतात जे मुलींना बिलकुल आवडत नाही,
पण रागावण्याच कारणच नाही कारण त्यातला छुपा गर्भित अर्थ असा होतो...

आयटम म्हणजे माल
माल म्हणजे पैसा
आणि पैसा म्हणजे लक्ष्मी,
आणि मुलीला तर घराची लक्ष्मी म्हणतात....

मग रागवायचा प्रश्न येतोच कुठे ?
" रिश्ता वही सोच नयी "..

आयुष्य म्हणजे नक्की काय असत ..

आयुष्य  म्हणजे   काय  असत ... 
 -- विद्या 

आयुष्याला एक गूढ  रहस्य  म्हणु  का  न  सुटणार  कोड म्हणु ..
आयुष्य जन्म  मृत्यू  मधील जणू  एक  प्रवास  असतो ..
आयुष्य  खूप  सुंदर  आहे  ते  हसत  हसत जगावे  कि  रडत रडत ते  आपणच  ठरवायचं  असत ...
आयुष्याच्या  प्रत्येक  क्षणाच  सोन  करायचा  असत .


भगवद्‌गीता..

न जायते म्रियते वा कदाचिन्- नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे॥
-आत्मा चा जन्म होत नाही आणि मृत्यू ही  होत नहीं !! शरीर नष्ट झालं  तरी आत्मा अमर असतो !!

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२
-ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे शरीराचा त्याग करुन आत्मा नवीन देह धारण करतो. 
   
   देवाच दर्शन  न  घडता  देखील  त्याच्यावर  आपली  श्रद्धा  असते ..त्याच   अस्तित्व   म्हणजे    जीवन  आहे .
हवा  दिसत  नसली  तरी  त्याची  जाणीव  होते  ना..मग  ज्या  व्यक्ती  बरोबर  आयुष्याचे  चार  क्षण  व्यतीत  केलेले असतात  त्याच  मृत्यु   नंतरच अस्तित्व  आपण का  नाकारतो ...जन्म मृत्यू   हा  आयुष्याचा  लपंडाव  आहे ...त्याला  मोक्ष  शिवाय  अंत  नाही . 

          ह्या  धावपळीच्या  जीवनात  माणूस  आयुष्य  जगायचं  विसरून  गेला  आहे ..फक्त  पैश्या  च्या  मागे  असतो ...भले  तो  चांगल्या  अथवा  वाईट  मार्ग  ने  मिळो. मृत्यू  हे  आयुष्यातलं कटू  सत्य  आहे ..शेवटी जगात  कोणाचीच  सोबत  कोणाला  पुरत  नसते ...गोड शब्दात बोलायचं झालं तर  गुण्या  गोविंदाने  राहा  आणि  ह्या  सृष्टीच नंदनवन  कराव !!

सौजन्य :  http://janak-thus-speaks.blogspot.com/2009/03/chapter-2-verse-20-of-72.html
                 http://www.bhagavad-gita.org/Gita/verse-02-22.html
                 http://www.bhagavad-gita.org/Gita/verse-02-20.html
                 http://www.misalpav.com/node/17344

तस बघायला गेला तर मृत्यु सारखी सुंदर गोष्ट नाही पण ... जन्माला आलोय म्हणजे कधी तरी येणारच आहे ... पण शेवट मात्र समाधानी व्हावा... झुरून नाही जगण्यामुळे ..1-7-2013

Wednesday, May 11, 2011

पुण्याच्या मुलींचे नखरे

मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज….

2 किवा 3 वेळा सारखा Miss Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे…..आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार……..
ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!
चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते……(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस
Movie!!!!!नाही बाबा…घरी काय सांगु……
पहिले तु ईथुन चल….ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे…..कोणि बघितल तर…….
मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस…..?????)
चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)

Sunday, May 8, 2011

मराठी हास्यकट्टा 24

रुग्ण : डॉक्टर,वाहन चालविण्याची परीक्षा असते, त्यावेळेस मला कापरं भरतं.
डॉक्टर : काही काळजी करू नका! तुम्ही या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण व्हाल!
रुग्ण : अहो,पण मी विद्यार्थी नाही, परीक्षक आहे !

*****************
५ वीच्या वर्गात नवीनच प्रवेश घेतलेल्या बाळूला वर्गात शिक्षकांनी विचारलं तुझं नाव काय?
बाळू.....वडिलांचे नाव?....प्रशांत .
वडील काय काम करतात ?
बाळू प्रांजळपणे म्हणाला, 'आई जी काही कामे त्यांना सांगते ती सर्व कामे ते मुकाटपणे करतात.'
*****************

गुरुजी -सांग बाळू शेजारी म्हणजे कोण?

बाळू- डावीकडचे बाजुवाले म्हणजे सारखे उसन्या वस्तू मागायला येणाऱ्या बाई .

आणि उजवीकडचे बाजूवाले म्हणजे काम नसताना घरात डोकावणाऱ्या बाई ...

*****************
गुरुजी : इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ काय?
.
.
.
.
बंडू : याचा अर्थ रस्ता चुकीच्या ठिकाणी बनवला गेलाय.

*****************
चारोळ्या

सौदर्य :
मेकअपच्या ढगाआड

... तिचा चेहरा लपला होता

सौंदर्याचा अटाहास तिने

पैशामुळे जपला होता !!
*****************
संपतराव आपल्या
पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज अजूनं माझ्या पॅंटच्या खिशातले काही
पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
.
पत्नी : कमाल आहे तुमच्या
... अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून
तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?...
.
संपतराव : तू नक्कीच खिशात हात
घातलेला नाहीस, कारण त्यात ... अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
*****************
वकील : चोरी करताना स्वताच्या बायको मुलांचा विचार तुझ्या मनात नाही आला?

चोर : विचार आला होता साहेब, पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचाच समान मिळत होत..

*****************
वॉर्डबॉय : सर, काल सगळे कैदी रामायण करत होते.
डॉक्टर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
वॉर्डबॉय : नाही सर
डॉक्टर : नाही ? काय झाले.
वॉर्डबॉय : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

*****************

एक मुलगा देवाला विचारतो, 'तिला गुलाबाचं फूल का आवडतं?? ते तर एका दिवसात मरून जातं. मग तिला मी का आवडत नाही? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो....' देव उत्तर देता, 'लई भारी रे.... एक नंबर डायलॉग!!'

*****************
गंपू : ही एसटी नॉ नस्टॉप आहे ना?
कंडक्टर : हो... का?
.

.
गंपू : माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय... मला भीती वाटतेय चुकून परत येईल की काय!!!

आयुष्य म्हणजे एक अथांग प्रवास

आयुष्य --एक अथांग प्रवास
 
 
आयुष्य म्हणजे जन्मापासून सुरू होणारा एक अथांग प्रवास आहे. मृत्यूच्या किनार्‍याला लागल्यावरच आपण कूठून काय कसा प्रवास केला त्याचा माणसाला थांग लागतो. या अनोळखी जगात जन्म घेऊन आपण आपली होडी पाण्यात सोडली की मग अनपेक्षित वादळं येणारच. मन हेलकावून टाकणार्‍या लाटा येणारच. अपेक्षाभंगाच्या वीजा कडाडणारच आणि दु:खाचा सरी पाऊस बनून कोसळणारंच. वादळाविना आयुष्याचा सारा प्रवास झाला तर मग जन्माला आल्यावर आपण आपली होडी समुद्रात नाही तर डबक्यात सोडली होती असं समजायला काहीच हरकत नाही. कारण वादळं नेहमी समुद्रात येतात. डबक्यात नाही. आयुष्यात वादळं आल्यावर ते कधी निघून जाईल त्याची घाबरून वाट पहात बसणारे हमखास वादळात वाहून जातात. या जगात पावसाच्या तालावर ज्यांना नाचता येतं त्यांना कोणतं वादळ कधी वाहून नेऊ शकत नाही. आयुष्य ही वादळाला घाबरत जगण्याची गोष्ट नाही आहे. तर पावसाच्या बेभान, बेधुंद सरींवर तोल न ढळू देता कसं नृत्य करावं हे शिकण्याची गोष्ट आहे.

Friday, May 6, 2011

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे.

अर्थ अक्षय तृतीयेचा!



आज अक्षय तृतीया. संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. या मुहूर्ताचे भारतीय संस्कृतीमधील महत्त्व आणि पारमाथिर्क अर्थ उलगडणारा हा विशेष लेख..

'जशी उसात हो साखर। तसा देहात हो ईश्वर' अशी एक गीतपंक्ती आहे. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' असं संतश्रेष्ठ चोखामहाराज म्हणतात. तसंच अध्यात्माचं आहे. ते आपल्या सगळ्या आयुष्याला व्यापून आहे. साऱ्याच व्यवहारात, सणवारात, रूढी-परंपरांमध्ये ते मिसळून गेलं आहे. 'अध्यात्मविद्या विधानां' असं भगवंत स्वत: भगवद्गीतेत विभूतियोग सांगताना म्हणतात. 'जसे दुधामध्ये लोणी। तसे देही चक्रपाणि.' तो सर्वगत असला तर गुप्त आहे. विरजण, मंथन या प्रक्रिया जशा लोण्यासाठी आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे सारासारविवेक हाच अध्यात्माप्रत नेतो.

पूर्ण संवत्सरांत साडेतीन मुहूर्त मानले जातात. त्यातूनही अध्यात्माची प्रक्रिया लपलेली दिसेल. नवरात्रात नवविधा भक्तीचं जागरण घडतं. मग दश इंदियांना जिंकून येतो तो दशहरा. हे चित्तवृत्तींचं सीमोल्लंघन. विषयवासनांवर विजय मिळवणारी ही विजयादशमी. 'अंतरीचा ज्ञानदिवा' चेतवणारा हा पहिला शुभमुहूर्त. मग कातिर्क शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा. या शुभदिनी 'अंतर्बाह्य जग आणि मन' सारेच उजळून निघते. दिव्यांच्या आवली म्हणजे पंक्तीच पंक्ती प्रकाशमान होतात. मेरूदंडाचं प्रतीक असणारी गुढी आणि चैत्रांतल्या लखलखीत सूर्याचा प्रकाश आणि तेज प्राशन करणारे गुढीवरचे रजताचे चकचकीत पात्र. ज्ञानग्रहणाचा संकेत देणारा गुढीपाडवा हा तिसरा मंगमलय मुहूर्त. अक्षयतृतीया हा शेवटचा मुहूर्त. पण हा अर्धा असला तरी पूर्णत्व देणारा बिंदू आहे.

आपल्या संस्कृतीत असे शुभमुहूर्त साडेतीन. नादब्रह्माचे मंत्राक्षररूप म्हणजे प्रणव. त्या ओंकाराच्या मात्रा साडेतीन (अ, ऊ, म आणि चंदबिंदू). मूलाधार चक्रात वेटोळे घालून बसलेल्या त्या कुंडलिनी शक्तीचे वेढेही साडेतीन. मानवी कुडीचे मापही ज्याच्या त्याच्या हाताने साडेतीन आणि आदिशक्तीची प्रसिद्ध पीठेही साडेतीनच.

'ऋतूंना कुसुमाकर' हा वसंत ऋतू. नव्या नवतीचा ऋतू. नव्या निर्मितीचा, सृजनाचा ऋतू. चित्रविचित्र अशा सृष्टी सौंदर्याने नटलेला चैत्र. 'शिव-गौरी-दोलोत्सव या चैत्रात केला जातो. त्याच्या सांगतेचा दिवस म्हणजे अक्षयतृतीया. 'वेदानां सामवेदोस्मि' असं भगवंत श्रीकृष्ण गीतेत सांगतात. ईशतत्त्वाची गायनाच्या आधाराने आळवणी हे सामवेदाचे स्वरूप. ऋग्वेद, यजुवेर्द, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये तो तृ़तीय आहे, अक्षय आहे. त्रिवेणी संगमातल्या गंगा, यमुना, सरस्वती. त्यातली सरस्वती ही गुप्त आहे, गुह्य आहे. ईश्वरही खोल आहे, गूढ आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्गही आपल्या आत आहे. तशीच सरस्वती ही गुप्तगंगा. ती तृतीय आहे.. अक्षय आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे मुख्य तीन देव. महेश ही अंतिम सत्ता आहे. शिव हा विश्वाचा आदिगुरू आहे. शिव ज्ञानरूप आहे. त्याचा तिसरा नेत्र मायेचे निरसन करतो. त्रिदेवांत शिव तृतीय आहे. तसेच तो अक्षय आहे. आपल्या संगीतात सप्तस्वरांमध्ये गंधार तिसरा आहे. नाभिकमल हे त्याचे उगमस्थान आहे. गळ्यात हुकमी 'गंधार' असणे ही नादब्रह्माची कृपा आहे. गंधारावर विजय म्हणजे 'गंधर्व'. 'गंधार' तृतीय आहे, अक्षय आहे. 'ग'कार हे तिसरे व्यंजन. विद्यादेवता गजाननाचे हे स्वरूप. १४ विद्या, ६४ कलांच्या ज्ञानाचे स्वरूप. 'ग' कार हे तिसरे व्यंजन विद्यादेवता गजाननाचे हे स्वरूप. 'गं' हे गणरायाचे आदिबीज. त्याचे स्थान तृतीय आहे, अक्षय आहे. रज, तम, सत्त्व हे त्रिगुण. त्यातला शुद्ध सत्त्वगुण हा परमार्थपोषक. 'तुका म्हणे येथे सत्त्वाचे सार्मथ्य। करावा परमार्थ अहनिर्शी' तो हा सत्त्वगुण. तो तृतीय आहे, तसाच अक्षय आहे. इडा, पिंगळा. सुषुम्ना या तीन नाड्या. सुषुम्ना नाडी हा कुडीतला आधारवड आहे. सहस्त्रार चक्राच्या 'अमृततळ्या'पर्यंत पोहोचविणारी ही वाट आहे. सुषुम्ना नाडी तृ़तीय आहे, अक्षय आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रांतली 'म' बाराची मात्रा तिसरी. प्रणवरूप गणेशाचे 'मकार महामंडळ' हे मस्तकस्थान आहे. आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र हे कुंडलिनी जागृतीचे महत्त्वाचे अंतिम टप्पे हे 'म'कारांत त्यामुळे येतात. 'म'कार उच्चारताना होणारे दोन्ही ओठांचे एकत्र येणे हे अद्वैताचे सूचक आहे. ओंकाराची 'म' मात्रा तृतीय आहे. अक्षय आहे. 'दया, क्षमा, शांति। तेथे देवाची वस्ती' असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. सहा विकारांचा अपशम आणि अहंकाराचा समूळ उच्छेद यांची परिणती 'शांती'त होते. शांती ही अत्यंत दुर्लभ आहे. ती विरक्तांच्या गळ्यांत माळ घालते. देवाच्या निवासस्थानांत 'शनि' तृतीय आहे, अक्षय आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही आदिशक्तीची तीन प्रमुख रूपे. नीरक्षीरविवेक करणाऱ्या 'सोहं, अहं स: 'या हंसावर (परमहंस स्थितीवर) आरुढ असणारी, सार देणारी सारदा, सरस्वती, तृतीय आहे, अक्षय आहे.

'अक्षय-तृतीय' ची ही यादीही अक्षय आहे. परमार्थाच्या अत्युच्य अवस्थेला 'तुरीय' किंवा 'तुर्या' असे नाव आहे. जिवा-शिवाचे पूर्ण ऐक्य झाल्यावर ती दिव्य अनुभूती कथन करायला कुणीच उरत नाही. ज्ञान, ज्ञाता, झेय ही त्रिपुटीच विलयाला जाते. मग असा विचार येतो की अक्षयतृतीयाचे मूळ रूप 'अक्षय-तुरीया' वर नसेल! परमार्थाच्या साधकांसाठी 'अक्षय-तुरीया' साधावी, याशिवाय दुसरे आशीर्वचन कोणते?

Wednesday, May 4, 2011

मराठी हास्यकट्टा 25


शिक्षक : काय रे, तू पेपर कोरा का सोडलास?
विद्यार्थी : पण टापटिपीचे पाच मार्क तर मिळतील ना?

***************
शिक्षक : काय रे गंपू, तुझी आणि झंपूची उत्तरं अगदी एकसारखी कशी काय?
गंपू : काय करणार सर? प्रश्नपत्रिका पण सारखीच होती!!

***************
बंडू.. बबडी..

बबडी : हॅल्लो
बंडू : बबडे
बबडी : बंडू..
... बंडू : प्रिये कशी आहेस गं.
बबडी : प्राणनाथा तुझ्या विरहात तरंगतेय रे. तुला येते का रे माझी आठवण.
बंडू : अगं राणी मी तुझ्यासाठी चंद्र तोडेने, तुझ्या केसात चांदणं माळेन, उंच शिखर चढेन, समुद्र पोहत जाईन, तापलेल्या निखाऱ्यांवर चपलांशिवाय चालत जाईन..
बबडी : अय्या बंडू पुरे पुरे पुरे... त्यापेक्षा
आत्ता मला भेट की रे.
बंडू : अगं आत्ता कसा येऊ... बाहेर पाऊस पडतोय. भिजलो तर सर्दी होईला ना.

*******************
बायको : काय करत आहात ?
.
.
.
नवरा : माश्या मारत आहे
... ....
.
.
बायको : किती मारल्या ?
.
.
.
नवरा : २ पुरुष आणि ३ स्त्री
.
.
.
बायको : कसं कळलं ते ?
.
.
.
नवरा : २ दारूच्या बाटलीवर बसल्या होत्या आणि ३ फोनवर
*******************
गंपूचा मुलगा : बाबा...आपल्या सोसायटीत स्विमिंग पूल बांधायचा. माझे मित्र तुमच्याकडे मदत मागायला येणार आहेत.
.
.
.
.
.
गंपू : ठीक आहे ...त्यांना दोन बालद्या भरुन पाणी देऊन टाक.
*******************
गंपूचा मुलगा : बाबा...आपल्या सोसायटीत स्विमिंग पूल बांधायचा. माझे मित्र तुमच्याकडे मदत मागायला येणार आहेत.
.
.
.
.
.
गंपू : ठीक आहे ...त्यांना दोन बालद्या भरुन पाणी देऊन टाक.
*******************
बाई: मुलगा आणि मुलगी यात किती फरक आहे?
मुलगा: जास्त नाही फक्त एका कान्याचे...
बाई: कसे काय?
मुलगा: मनचेकरांच्या मुलाचे नाव हर्षद तर सामंतांच्या मुलीचे नाव हर्षदा आहे.
May 7 at 1:03am
*******************
एका धर्मगुरूने प्रवचन संपल्यावर श्रोत्यांना प्रश्न विचारला- तुमच्यापैकी कोणाकोणाला थेट स्वर्गात जायला आवडेल? एक व्यक्ती सोडून सर्वांनी हात वरती केले. गुरूंनी त्याला विचारले, तुला स्वर्गात का नाही जायचं? तो म्हणाला, अहो, ज्यांनी ज्यांनी हात वर केला, त्याच लोकांनी येथे नरक निर्माण केला आहे आणि हे सर्व थेट स्वर्गात गेल्यावर येथे आपोआपच सुख आणि स्वर्ग उरेल!!
April 24 at 10:19pm
*******************
गोटया : आई, परी आकाशात उडू शकते?
आई : हो
गोटया : मग आपली रखमा (कामवाली)
... का नाही उडत?
आई : ती परी नाही आहे.
... गोटया : पण बाबा
तर तीला तू नसताना परी म्हणतात.
आई : काय????? मग
आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल..
May 1 at 8:06pm
*******************
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार ��

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?
पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ..."पुरे झाकी तुमची आश्वासनं."
... शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको...."थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ..."ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ..."केसाने गळा काप्लात कीहो माझा."
डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ..."मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको..."कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ..."नुसत्या पुड्या सोडु नका."

Sunday, May 1, 2011

दारु काय गोष्ट आहे ...मला अजुन कळली नाही

दारु काय गोष्ट आहे ...मला अजुन कळली नाही

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
... मला काहीच चढली नाही
सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा कार्यक्रम पीणार्याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दारु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते
दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

मी मराठी तर्फ़े महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!
माय मराठी पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही |
असतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपातील सारे पण स्वराज, महाराष्ट्र कधी ही संपणार नाही ||


जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा॥।
महाराष्ट्र ही पराक्रमी व शुर लोकांची, संतांची भुमी आहे...
आणि आम्हाला महाराष्ट्रच्या भुमीत जन्मल्याचा सार्थ अभिमान आहे..



महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानास मानाचा मुजरा.
१ मे महाराष्ट्र दिन आणि हुतात्मा दिन चिरायू होवो .


 

महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले , महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले.... 
उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा
जयजयकार तयाचा आसमंती गर्जावा
सांडीले रुधीर जयानी महाराष्ट्रासाठी
जन्म तयाचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा...
जय  हिंद !!  जयमहाराष्ट्र !!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....



महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले .. मराठा तितुका मेळवावा ..महाराष्ट्र धर्म वाढवावा.बेळगाव , भालकी निपाणी हे भाग अजून महाराष्ट्रात सामील होणे अजून बाकी आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून अपूर्ण आहे.