Showing posts with label हास्यकविता. Show all posts
Showing posts with label हास्यकविता. Show all posts

Friday, September 9, 2011

माझा Facebook Status

फेसबुक ह्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमचा Status म्हणजेच तुमच्या मनात जे काही चालू आहे त्याविषयी थोडक्यात लिहू शकता.पण ह्या status ला ४२० शब्दंमर्यादा आहे.त्यामुळे त्यात मावेल इतकंच तुम्ही लिहू शकता.पण,कवीमनाला हे शब्दंमर्यादेचं बंधन कसं पटेल ?
त्यावरच ही कविता..

** माझा Facebook Status **

Facebook Status ने विचारले....What's on your Mind ?
तुझ्या मनात काय आहे ?

माझ्या मनात ?
मनात ?
खुप खुप सारं आहे

आकाशावर लिहलं तरी मावणार नाही इतकं
अन एका अश्रूतनं देखील ओघळेल इतकं आहे..

गोळा केले कवितेत..
चंद्र सूर्य
तारे वारे
तुझे खट्याळ स्पर्श सारे

Keyboard बडव बडव बडवले
दया आली
अन माझे विमान खाली उतरले
Status सेव्ह करायला घेतलं तर
ते म्हणे..

Status Too Long
शब्दंमर्यादा ४२०
कसा मावेल ?
माझा रुसवा
तुझा फुगवा
झाडांचा बहर
आठवांचा कहर
नवीन मुख्यमंत्री
आश्वासनांची जुनी जंत्री
मी झेललेली संकटं
तुझी सिगरेटची थोटकं
सरकारी धोरण
दारावरचं तोरण
तुझा व्हिस्कीचा घोट
माझ्या भावनांचा कडेलोट
तुझ्या so called मैत्रिणी
माझ्या जीवाचं होणारं पाणी पाणी
फक्तं ४२० शब्दांत ?

वाईट वाटलं..
मनात आलं
शब्दांना Facebook ने असं का वाळीत टाकलं ?
Facebook च्या नावाने मी कडाकड बोटं मोडली

प्रयत्न केला
पण,भावनांची काटछाट करणं मला पटलं नाही
म्हणून जरी कधी माझा Status Blank असतो
लक्षात घ्या,कवीला शब्दांचा कधीच दुष्काळ नसतो

खुप उचंबळून आले तरच
मी Facebook शी जुळवून घेते
Status मध्ये कविता जरी नाही
शायरी किंवा चारोळी तरी लिहते
तसे,मनात माझ्या खुप काही असते
माझे Status तरंगते हिमनग असते
-अनामिक

Wednesday, August 10, 2011

हास्यकविता

हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
... ......गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
.
.
***कार्ट प्रेमात पड़लय*

Sunday, May 1, 2011

दारु काय गोष्ट आहे ...मला अजुन कळली नाही

दारु काय गोष्ट आहे ...मला अजुन कळली नाही

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
... मला काहीच चढली नाही
सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्यापेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा कार्यक्रम पीणार्याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दारु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते
दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

Friday, May 7, 2010

कार्ट प्रेमात पड़लय

 कार्ट प्रेमात पड़लय

हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
कार्ट प्रेमात पड़लय