Friday, September 30, 2011

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा ?

आठवण
   

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....

नशिबाने एकदा पुन्हा कुठे भेटू...
आठवणींना एकदा एकत्र मिळून वेचू...

पण तेव्हा सारं काही बदललेलं असेल...
कुणीतरी बोलावतय म्हणून भेट लवकर सुटेल...

लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत...
आठवणींचा हाच झरा त्या दिशेने वाहणार नाही...

आज सोबत आहोत मनासारखे जगून घेऊ ...
जीवनभर पुरतील  अश्या आठवणी साठवून घेऊ ....!!!!

-अनामिक

Tuesday, September 27, 2011

Monday, September 26, 2011

मराठी साठी एकदा नक्की वाचा !!

मराठी साठी एकदा नक्की वाचा !!

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी
उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं.

आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे
एक - एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं ;

"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??.. मुठभर
मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे ?"
त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,
"यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय
फ़रक पडला ? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला."

मी एकट्याने, मराठी माणसाकडुन खरेदी केल्याने
किती मराठी शेतकर्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मॊल्स मधुन खरेदी न केल्याने किती
मराठी व्यापार्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल
घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार?
मी एकट्याने, डान्स बार मधे पैसे न ऊडविल्याने,
किती मराठी माणसे श्रीमंत होणार?
मी एकट्याने, मराठी माणसा कडुन फ़्लॆट / जमीन
विकत घेतल्याने किती मराठीबिल्डर / कॊन्ट्रॆक्टरांची भरभराट होइल?
मी एकट्याने, विज वाचवल्याने
किती अंधारलेल्या घरांमधे प्रकाश पडेल?
मी एकट्याने, पाणी बचत केल्याने,
किती तहानलेल्या जिवांना पाणी मिळेल?
मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडुन, किराणा खरेदी केल्याने,
किती मराठी दुकानदार [जिवघेण्या] स्पर्धेत टिकुन रहातील?
मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॊटेल मधुन खरेदीकेल्याने,
किती मराठी हॊटेल मालकांना याचा फ़ायदा होणार?
मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती
मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे?
कृपया, वर लिहिलेली गोष्ट, कथा, परत एकदा वाचावी.........
बाहेरच्यांना, दरमहा किमान रु. दोनशे अब्ज = २००,०००,०००,०००/-
दररोज किमान रु. सहा अब्ज, सहासष्ट कोटी, सहासष्ट लाख, सहासष्ट हजार, सहाशे,
सहासष्ट = ६,६६६,६६६,६६६.६६/-
त्यांना अहोरात्र , दर ताशी, रु. सत्तविस कोटी, सत्त्याहत्तर लाख, सत्त्याहत्तर
हजार, सातशे, सत्त्याहत्तर = २७७,७७७,७७७.७७/-
इतके माप आपणच पदरात टाकतो.
आपला पोशिंदा कसा जगेल ..? त्याच्या पदरात आपले किती पडतात..??
आपला पोशिंदा कसा जगेल? त्याच्या पदरात आपले किती पडतात?? -उत्पादन किंवा सेवा
कोणालाही विकावे , खरेदी, फ़क्त आणि फ़क्त मराठी शेतकर्याकडूनच /
व्यापार्याकडूनच करावी. -महाराष्ट्रात बाहेरचे कोट्याधिश आणि अब्जाधिश आहेत
याची लाज वाटू द्यावी. कितीही अड़चणी / प्रलोभने असली तरी मराठी माणसालाच मोठे
करावे
-सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे परन्तु तेथे अधिष्ठाण देवाचे पाहिजे.
!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!

|| मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा |

Wednesday, September 21, 2011

मराठी हास्यकट्टा 12

पुण्यातल्या एका कॉलेजचा पहिला दिवस.
मुलगा : हॅल्लो... तुझं नाव काय गं?
मुलगी : सगळेजण मला ताई म्हणतात.
मुलगा : अरे वा... मला पण
सगळे भावोजी म्हणून हाक मारतात.
October 3
*************

चम्या : हमारे पिताजी इतने लंबे है कि खडे खडे चलता पंखा रोख देते है .
.
.
.

बंडू : हमारे वडील भी लम्बेच आहे पण ऐसा आगाउपणा नही करते.

*****************
म्हणी पूर्ण करा ..

प्रश्न:- बोले तैसा चाले......
उत्तर:- त्याची ओढावी पाऊले.

... प्रश्न :- लौकर निजे लौकर उठे त्यास.......
उत्तर:- टी. व्ही. प्रोग्राम पाहणे जमत नसे.

प्रश्न :- जो स्वयेची कष्टता गेला......
उत्तर - तो कष्ट करूनच मेला.

********
एक अविवाहित पुरुष फेसबुक वर स्टेटस अपडेट करतो. "बायको पाहिजे"
२ मुली लायिक करतात.
अणि..५५० पुरुष कमेन्ट करतात....
...
...
...
...
...
...

''माझी घेउन जा''
:D :D
October 2 at 12:15pm

***********
डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय.
कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.
पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.

***********
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

***********
पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

***********
मुलांना मुलींबद्दल समजायला अवघड असणारी गोष्ट कोणती?
" आयला...हसून पाहत होती..की पाहून हसत होती...?? " :O :O
September 20 at 7:51pm

Friday, September 16, 2011

मराठी हास्यकट्टा 13

रात्री झोपताना बाबी मालवणकर आपल्या बायलेक इचारता " गो माका एक सांग झटकन मराण आलेला बरा कि वाईज हळू हळू इलेला बरा",
त्यावर मालवणकारिण म्हणाली " काय वो असा इचार्लात वाईट....पण सांगतय..... झटकन इलेला चांगला , उगाच दुसऱ्यान का त्रास किद्याक !"......
बाबी मालवणकर " मग असा कर दुसरो पाय पन माझ्या छातीर ठेव "

**********************
गणेशोत्सव संपला आणि बाप्पा कैलास पर्वतावर पोचले
पार्वती मातेने विचारलं- काय कशी झाली पृथ्वी सहल?
गणपती: "मुझपे एक एहसान करना, कि मुझपे कुछ भी एहसान मत करना!"
पार्वती: अरे हे काय बोलतो आहेस?
गणपती: आया रे आया बॊडीगार्ड
... रिद्धी सिद्धी: अरे काय हे????
गणपती: १२ महिने मे १२ तरीकेसे... ढिंका चिका ढिंका चिका रे ए ए ए....
शंकर: अरे देवा, हल्ली मुलांना कुठे पाठवायची सोयच नाही राहिली ....

September 16 at 10:27pm
**********************
पेट्रोल ७१ रुपये झाल्यावर एकदा गंपू पेट्रोलपंपावर जातो...
पंप ऑपरेटर -कितीचं टाकू साहेब ?
गंपू - अरे १० रुपयाचं शिंपड गाडीवर, बाहेर नेऊन जाळायचीच तर आहे !!!

**********************
बबन्या : मॅनेजर साहेब, आता तरी माझा पगार वाढवा. माझं लग्न झालंय आता.

मॅनेजर : हे बघा...कंपनीबाहेर होणा-या दुर्घटनांना मॅनेजमेण्ट जबाबदार नाही.
**********************
या websites ना मराठीत काय म्हणाल ?

facebook.com - थोबाड वही
twitter.com - चिवचिवाट
youtube.com - तू नळी
...orkut.com - किव्वा कुटा
yahoo - या (बरं का) हो
hotmail.com - गरम पोसट
linkedin.com - जोडलेले राहा
rediff.com - लाल जर
amazone.com - अम्माचे क्षेत्र
tumblr.com - तम्बरेल (लोटा)
delicious.com - चविष्ट
blogspot.com - कथा (कुटायचे) ठीकाण
myspace.com - माझी जागा
deviantART.com - देवी मुंगी (ची) कला
rapidshare.com - फटाफट वाटा
megavideo.com - दीर्घ चित्रफीत
playlist.com - यादी वाजवा...........

**********************
गंपू : मी जर नारळाच्या झाडावर शेंड्यापर्यंत चढलो, तर इंजिनीअरिंग कॉलेजमधल्या मुली दिसू शकतील..........
झंपू : ... आणि तिथे पोहोचल्यावर हात सोडलास तर मेडिकल कॉलेजमधल्या मुलीही दिसू शकतील!!

**********************

Wednesday, September 14, 2011

मराठी मुलगा

तो...तो खरा मराठी मुलगा असतो

Goggle मध्ये नाही छान दिसला
तरी जो फेट्यावर छान दिसतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो.
... ...
"Hi Dude","whats up" न बोलता,
जो "मित्रा" अशी हाक मारतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो.

त्याने टवाळेगिरी कितीही करो पण जो मंदिरात नक्की हात जोडतो,
"आई-बहिणी" वरून कुणी गेला तर जो समोरच्याची हाडं तोडतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो.

इंग्रजी भले तो.....हळू आवाजात बोलतो,
पण "शिवाजी महाराज कि जय" हे कणखरपणे जोरजोरात बोलतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो.

मुलगी जरी जीन्समधली आवडली,
तरी आई वडिलांसमोर जो तिला साडीमध्ये नेतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो.

.........पण आता किती राहिले आहेत असे जरा शंकाच आहे .. :)

Sunday, September 11, 2011

मालवणी हास्यकट्टा 14

मेरे हात में,
तेरा हात हो
तेरे हात मैं बाजू वालेका हात हो

फिर ....??????
... ...फिर क्या..?????/

सब मिलकर खेलेगे
माझ्या आई चे पत्र हरवलं
ते मला सापडलं................

**********************

एक पुणेकर मुलगा मुलीला प्रपोज करायला गेला. तिच्या घरचा दरवाजा ठोठावून तो म्हणाला, 'अगं...पहिल्या नजरेतच प्रेमात पडण्यावर तुझा विश्वास आहे का? कामी पुन्हा येऊ?'

*********************
आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो.

आपली चूक आहे की नाही , याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!! .... :)
September 11 at 2:00pm

*********************
FBचा कहर !
मुलगी-तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
मुलगा - हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?
मुलगी- मला नाही वाटत असं.
मुलगा- अगं पण !असे का बोलतेस ?कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?
... मुलगी- तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा -अर्थातच !
मुलगी - नक्की ?
मुलगा -अगं हो !
मुलगी- मग काल रात्री मी फ़ेसबुकवर जे स्टेटस टाकलेले त्याला 'लाईक' का नाही केलेस :D
September 11 at 1:51pm
*********************
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.

एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
...
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

... का?

...

अंगात मस्ती , दुसरं काय ?
September 11 at 2:00pm
*********************
मुंबईकर मुलगी:- मी किनई पंचवीस वर्षाची होईपर्यंत लग्नच करणार नाही...
पुणेकर मुलगी:- अन् मी लग्न होईपर्यंत पंचवीस वर्षाचीच राहणार आहे..:D :D

*********************
एका माणसाने LUNCH करायला मासा पकडला आणि घरी आला बघतो तर काय ? ? . . .
gas नाही . . .
पीठ नाही . . .

पाणी नाही . . .

वीज नाही . . . तेल नाही . . . .

.
माणसाने वैतागून मासा परत पाण्यात सोडला. . .

.
.
मासा आनंदाने जोरात ओरडला . . .
.
कॉंग्रेस सरकार चा विजय असो..:-D :-D......
*********************
पंतप्रधान कार्यालय में फोन की घंटी बजती है, एक
सरदार फोन उठाता है ...

सामनेसे आवाज आती है -
'नमस्ते मै अण्णा हजारे बोल रहा हूं , आप ?'

सिंगसाहब बोल पडते हैं ...
'एक मिनट रुकिये, पूछके आता हूं
August 23
*********************
स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल.
गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
.
व्यवस्थापक-पैसे पडतील.
.
गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी...

उखाणे

उखाणे:
१. "समोरच्या कोनाड्यात ठेवलेत गहू
लग्न नाही झाले तर नाव कोणाचे घेऊ?'
२. कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन
...चे नाव पाहा घेतले, की नाही पटकन
३. आकाशाच्या निलिम्यावर इंद्रधनुष्याचा पट्टा
    ...चे नाव घेते पुरे करा बाई थट्टा
 ४. वर्षा ऋतूत आकाशात लकाकतात विजा
     ...च्यासह केली श्री सत्यनारायणाची पूजा
५. लतिकांनी भरले हिरव्या पानांचे चुडे
     ...चे नाव घेते मंगळागौरीपुढे
६ आशीवार्दाची फुले वेचते वाकून
   ...चे नाव घेते तुमचा मान राखून
७ .चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा
     ... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा
८. समुद्राला आली भरती, नदीला आला पूर
    ...करता माहेर केले मी दूर
९. अरबी समुद्रात उसळल्या लाटा
    ...च्या सुख-दुःखात माझाही वाटा
१० . संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
       साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!
११ . दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
      ....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
१२. रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
     .....चा पायगुण शकुनी खरा !!!!!
१३ . संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
     .....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!
१४ . सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
      .....मिळाली आहे मला अनुरूप
१५ . नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
     .....झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
१६ . दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
       सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
१७ .वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
       सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!
१८ . दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
       माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती !!!!!
१९ . जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
       सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा !!!!!
२०. देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
    सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
२१ . बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
     सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!
२२ . आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
     सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!
२३. दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
      सुखी आहे संसारात सौ..... च्या संग !!!!!
२४ . गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
       सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!
२५. सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
       सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!
२६ . अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
        सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!
२७ . चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
        सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
२८ . चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
       सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!
२९ . इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
        सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
३० . हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
       सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!

नवरदेवाचे उखाणे:
३१ . ...भोवती आहे सतत मैत्रिणींचा घोळका
     पैठणी का शालू दिलाय ते सर्वांनी ओळखा
३२ . नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
      ... आहे माझी खरंच पट्टराणी
३३ . मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
      ....ला देतो गुलाबजामचा घास
३४. कॉम्प्युटर-मोबाईलचा उपयोग झाला छान
     ... आता प्रत्यक्ष गप्पा मार, ऐकतो देऊन कान

Friday, September 9, 2011

माझा Facebook Status

फेसबुक ह्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमचा Status म्हणजेच तुमच्या मनात जे काही चालू आहे त्याविषयी थोडक्यात लिहू शकता.पण ह्या status ला ४२० शब्दंमर्यादा आहे.त्यामुळे त्यात मावेल इतकंच तुम्ही लिहू शकता.पण,कवीमनाला हे शब्दंमर्यादेचं बंधन कसं पटेल ?
त्यावरच ही कविता..

** माझा Facebook Status **

Facebook Status ने विचारले....What's on your Mind ?
तुझ्या मनात काय आहे ?

माझ्या मनात ?
मनात ?
खुप खुप सारं आहे

आकाशावर लिहलं तरी मावणार नाही इतकं
अन एका अश्रूतनं देखील ओघळेल इतकं आहे..

गोळा केले कवितेत..
चंद्र सूर्य
तारे वारे
तुझे खट्याळ स्पर्श सारे

Keyboard बडव बडव बडवले
दया आली
अन माझे विमान खाली उतरले
Status सेव्ह करायला घेतलं तर
ते म्हणे..

Status Too Long
शब्दंमर्यादा ४२०
कसा मावेल ?
माझा रुसवा
तुझा फुगवा
झाडांचा बहर
आठवांचा कहर
नवीन मुख्यमंत्री
आश्वासनांची जुनी जंत्री
मी झेललेली संकटं
तुझी सिगरेटची थोटकं
सरकारी धोरण
दारावरचं तोरण
तुझा व्हिस्कीचा घोट
माझ्या भावनांचा कडेलोट
तुझ्या so called मैत्रिणी
माझ्या जीवाचं होणारं पाणी पाणी
फक्तं ४२० शब्दांत ?

वाईट वाटलं..
मनात आलं
शब्दांना Facebook ने असं का वाळीत टाकलं ?
Facebook च्या नावाने मी कडाकड बोटं मोडली

प्रयत्न केला
पण,भावनांची काटछाट करणं मला पटलं नाही
म्हणून जरी कधी माझा Status Blank असतो
लक्षात घ्या,कवीला शब्दांचा कधीच दुष्काळ नसतो

खुप उचंबळून आले तरच
मी Facebook शी जुळवून घेते
Status मध्ये कविता जरी नाही
शायरी किंवा चारोळी तरी लिहते
तसे,मनात माझ्या खुप काही असते
माझे Status तरंगते हिमनग असते
-अनामिक

Wednesday, September 7, 2011

मराठी हास्यकट्टा 14

स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल.
गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
व्यवस्थापक-पैसे पडतील.
गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी...

*******************
गंपू : क्या बात है, आज तुझ्या मोबाइलवर सगळे प्रेम, इश्क, मुहब्बतवाले एसएमएस येताहेत....?
झंपू : (लाजत) आज मी बायकोचा मोबाइल घेऊन आलोय ना!!
September 12 at 3:25pm

*******************

गंपूचा मित्र : काय रे, आजकाल तू गाण्याचा रियाज करणं बंद का केलायस?
गंपू : गळ्यामुळे.
गंपूचा मित्र : का?
गंपू : नाही...तसं नाही. माझ्या शेजाऱ्याने मला धमकी दिलीय की पुन्हा गायला लागलास तर तुझा गळाच दाबेन.
September 12 at 3:29pm
*******************
गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा एक मुलीला धक्का लागला.
कुशाभाऊं : sorry

मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?

... कुशाभाऊं घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले.
एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला. तो पण sorry म्हणाला.
मुलगी (लाजत) : इट्स ओक.

कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?
August 6 at 3:45pm
*******************
आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी..
*******************
देव :बाळा काय पाहिजे तुला????माग!!

मुलगा: एक सुंदर बायको ........

देव :जर तु मुस्लिम असशील तर तुला कतरीना,हिन्दु असशील तर करीना
... ...आणि ख्रिश्चन असशील तर जेनेलिया देईल...बोल तुझं नाव काय??

मुलगा:(विचार करुन)अब्दुल विनोद फ़र्नांडिस.....

देव :याला डॊली बिंद्रा द्या रे...हा दिड शहाणा आहे फ़ार..

*******************
बबन्या: तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय???
सुभ्या: हा!

बबन्या: BD ????
सुभ्या: त्ये बी!
...
बबन्या: तंबाखू???
सुभ्या: व्हय, त्ये बी!!

बबन्या: मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं...??
.

.
सुभ्या: लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली !!!

*******************
पाकिस्तानी मिडियाने बेकिंग न्यूज दिली कि त्यांनी चंद्रावर पाठवलेल्या अंतराळ यानामुळे नवीन बरयाच गोष्टी समोर आल्या आहेत.. चंद्रावर पाणी तर आहेच पण शार्क, देवमासे देखील आहेत....

दुसरया दिवशी नासाने जाहीर केल कि पाकिस्तानने अंतराळात पाठवलेल यान अरबी समुद्रात सापडलं आहे.
*******************
बण्या- ती तुझी पेटी शेवटी उघडली का रे?
नाण्या- हो उघडली ना ! पण त्यासाठी मला एक शक्‍कल लढवावी लागली.
बण्या- काय रे ! असं काय डोक चालवलंस?
नाण्या- मी माझ्या पत्‍नीला एवढंच म्हटल की, या पेटीत माझ्या प्रेयसीची
प्रेमपत्रं आहेत. हे एकताच तिने काही मिनिटांतच पेटी उघडून दिली.

*******************

प्रेमिका : बाबा आले वाटते, तू लवकर पळ
प्रियकर : पण ते तर दरवाजातच उभे असतील ना?
प्रेमिका : मग तू खिडकीतून उडी मार.
प्रियकर : बाप रे, आपण तेराव्या मजल्यावर आहोत.
प्रेमिका : काय विचित्र माणूस आहेस तू. एवढा शिकला सवरलेला असूनही तेराला अशुभ मानतोस.

Monday, September 5, 2011

मराठी हास्यकट्टा 15

जर एखादी मुलगी घरात पण
मेकअप करून फिरत आहेल,
तर त्यात अशार्याची काही
गोष्ट नाही .....
समजून जावा कि,
तिचा फोन 3G आहे .

***************
चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .
मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )
चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )
मम्मी : काय झाले?
चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो..............................
मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )

*******************
एक गर्भारशी (प्रेगनंट) बाई पुरुष डॉक्टर कडे जाते.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
बाई (लाजून) : इश्य...!!!, आठवा.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू? तुम्हीच आठवा !
September 5 at 1:05pm
*******************
बाप - तू शेजारच्या काकूंना काय बोललास कि त्या रागावून गेल्या
झंप्या - आपण जेवताना बोलतो.या जेवायला,तसा मी झोपलो होतो,तेव्हा बोललो " या झोपायला."
*******************

बिस्किट वाले का लव लैटर
प्यारी "marry " आज "good day " है,तुमने मेरे दिल को "crack-jack " कर दिया है. अब मेरी स्थिति "50-50" रह गयी है. कृपया मेरे साथ "hide and seek " का खेल न खेलो.
तुम्हारा ----"tiger

*******************
स्थळ : भारत पाक बॉर्डर .. युद्ध जोरात चालू आहे..
गंप्या इकडून ओरडतो .. "इस्माईल आहे का " .. तीकडून एकजण... "कोण आहे".
गंप्या ढिश्याव करून त्याला गोळी घालतो
थोड्या वेळाने.. तीकडून आवाज येतो.. "गंप्या आहे का" ..इकडून काहीच रिप्लाय नाही..
थोडयावेळाने ..गंप्या ओरडतो "गंप्याला कुणी हाक मारली रे भावा..?"
..तीकडून एकजन उभा राहतो.. "मी'..
गंप्या त्याला ढिश्याव करून त्याला गोळी घालतो.

*******************
एकदा इंजिनियारिंगच्या प्रोफेसर्सना एका विमानात बसवण्यात आल
.
.
विमानात बसवल्यानंतर त्यांना सांगण्यात आल कि हे विमान त्यांच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले आहे
.
... .
हे ऐकताच सर्व प्रोफेसर खाली उतरले पण प्रिंसिपल मात्र विमानातच बसून राहिले
.
.
सर्वांनी प्रिन्सिपलाना विचारले "तुम्हाला भीती नाही वाटत" ??
.
.
.
प्रिंसिपल : मला खात्री आहे कि हे विमान सुरूच नाही होणार
********************
लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला, ''तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!''
नवरी उत्तरली, ''वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार ना!!!!!
June 11 at 8:31pm
********************
बायकोच्या चिडचिड्या स्वभावामुळे वैतागलेला गंपू एका साधू महाराजांकडे पोहोचला.
गंपू : साधू बाबा...माझी बायको सतत माझ्यावर आरडाओरडा करत असते. या कटकटीला मी फार कंटाळलो आहे. काहीतरी उपाय सुचवा.
साधू : बेटा, यावरचा उपाय जर मला माहित असता तर मी कशाला संन्यास घेतला असता?
झंप्याला आवरा :-P

********************

भूगोलाचा तास चालू असतो..
शिक्षक : भारतात कोणकोणती राज्ये आहेत ?
झंप्या : पंजाब.....महाराष्ट्र....गोवा .. . .
... ...शिक्षक : हम्म......
झंप्या : गुजरात, उत्तर प्रदेश..आणि...आणि.....कर्नाटक...
शिक्षक..:अजून....... . . .
झंप्या : अजून काही नाही... बस मजेत ... !!!
August 29 at 2:04pm
********************
बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
चिकटराव : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
चिकटराव : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.
********************