Wednesday, August 27, 2014

आता मी


#मराठी

आता मी
======
आता मी -
मन कठोर करायचं ठरवलंय...
आता मी -
तुला विसरायचं ठरवलंय …

मी बोलायचं,तू टाळायचं
हे नेहमीचं-
आता मी -
गप्प गप्प रहायचं ठरवलंय …

तुझा तोरा,तुझा गर्व
याची नको चिंता
आता मी -
स्वत: गर्वात राहायचं ठरवलंय

बदलणे हा तुझा स्थायीभाव आहे ,
असू दे!
आता मी -
स्वत:लाच बदलायचं ठरवलंय…

आता मी
मन कठोर करायचं ठरवलंय...
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
©प्रकाश पाटील,वसई.
https://www.facebook.com/PrakashVasai

Related Posts:

  • जमला जन समुदाय अपार वैराग्याचा मेळा(गमन)जमला जन समुदाय अपार, मूक, उदास, गंभीरंकोणी उधळती अबीर बुक्का, कोणां मुखी रामंराग, लोभ, नाती, गोती, काम, क्रोध न उरला काहीसर्व संग… Read More
  • नजरेतुनी शोध #काव्यतरंग #Marathi #मराठीनजरेतुनी शोधप्रीत अंतरमनाचीनकोस घेऊ साथमला देण्या विरहाची.....-राम पळसकार....https://www.facebook.com/ram.palask… Read More
  • ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ? #काव्यतरंग #Marathi● प्रयोजन ●ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ?कोण करतंय वाहतूक ग्रंथामधून कधीची?बजेटमधून रस्त्यात अर्थ नसलेल्या वस्त्यांत … Read More
  • अंबराला अंग थोड़े मागतो --- अंबराला अंग थोड़े मागतोआसवांना पंख थोड़े मागतोहॊत आहे जखम आता कोरडीमोग-याला डंख थोड़े मागतोव्यर्थ देतो सागराला आहुतीईन्द्रधनुष्या, रंग थोड़े मागत… Read More
  • अचानक जाग येते मनाला काही होते अचानक जाग येते मनाला काही होतेलाजेला घेऊन ओठी मनाला घाई होतेक्षण जिव्हाळ्याचे बांधून घेते पैंजणातंमग हळूच धावत येते मन अंगणातंनिजलेले गाव तरीही धुक… Read More

0 comments: