#मराठी
"माझी मर्हाठमोळी भाषा"
माझ्या मर्हाठी मातीला
गंध भक्तीच्या फुलांचा |
ज्ञ|ना-तुकाने लावला
वेलू ओव्या-अभंगाचा ||
माझ्या मर्हाठी झेंड्याची
ढाल जिजाई खंबीर |
शिवबाच्या बाण्याम्होरं
तुके वैर्याचा खंजीर ||
माझ्या मर्हाठीची गोडी
नसा नसात भिनते |
साता समुद्रा पल्याड
वारू मर्हाठी दौडते||
मानी मर्हाठी ज्योतीला
छेडू नका कंदी कंदी |
शे-शे मशालींची आग
एका एका वाती मंदी ||
मर्हाठमोळी ही भाषा
सार्या विश्वात नांदते |
तरी लहू मर्हाठीचे
तीन रंगात रंगते ||
लहू मर्हाठीचे
तीन रंगात रंगते ||
-रेणुका खटावकर (रेपाळ)...
१२/९/२००८
(juni kavita navyane)
https://www.facebook.com/ renu.khatavkar
"माझी मर्हाठमोळी भाषा"
माझ्या मर्हाठी मातीला
गंध भक्तीच्या फुलांचा |
ज्ञ|ना-तुकाने लावला
वेलू ओव्या-अभंगाचा ||
माझ्या मर्हाठी झेंड्याची
ढाल जिजाई खंबीर |
शिवबाच्या बाण्याम्होरं
तुके वैर्याचा खंजीर ||
माझ्या मर्हाठीची गोडी
नसा नसात भिनते |
साता समुद्रा पल्याड
वारू मर्हाठी दौडते||
मानी मर्हाठी ज्योतीला
छेडू नका कंदी कंदी |
शे-शे मशालींची आग
एका एका वाती मंदी ||
मर्हाठमोळी ही भाषा
सार्या विश्वात नांदते |
तरी लहू मर्हाठीचे
तीन रंगात रंगते ||
लहू मर्हाठीचे
तीन रंगात रंगते ||
-रेणुका खटावकर (रेपाळ)...
१२/९/२००८
(juni kavita navyane)
https://www.facebook.com/
0 comments:
Post a Comment