अखेरी इथुनीच आरंभ होतो
पुन्हा त्याच चक्रात गुंतून जातो
नको वाटतो कोंडमारा जीवाचा
तरी परतुनी जीव गर्भात येतो
अजन्म्या त्या एकदा भेत्न्यासी
न जाने कितीदा मी जन्मास येतो
उरे तोच तो एक प्रश्नार्थ कोहम
पुन्हा मी स्वतःचा खुला शोध घेतो
अखेरी इथूनीच आरंभ होतो
~ रेश्मा कारखानीस
मी शून्य काव्यसंग्रह
0 comments:
Post a Comment