Showing posts with label गुढीपाडवा. Show all posts
Showing posts with label गुढीपाडवा. Show all posts

Wednesday, March 25, 2020

गुढीपाडवा

#गुढीपाडवा
हा मराठमोळा सण ..
वसंत ऋतुचे आगमन, 
चैत्र शुद्ध प्रतिपदा,
नवीन वर्षाची सुरुवात !

महाराष्ट्रातील प्रतिष्ठान (पैठण) येथील मराठी राजाने ‘शकांना’ भारताबाहेर (आताच्या रशियापर्यंत) पळवून लावले, दिग्विजय मिळवला.
त्याचे प्रतिक म्हणून ‘शक’ ही भारतीय कालगणना सुरु झाली.
ही १९४१ वर्षे जुनी,
मराठी महाराष्ट्राची थोरवी..

विजयाची, उल्हसाची, आनंदाची गुढी उभारायची आहे.

काही आपलेच, अतिशिक्षित
‘गुडगुडी’ ओढून धूर काढत आहेत.
उत्तर भारतीयांच्या प्रभावाखाली,
*कृपया, सणाच्या नावांचा तरी अपभ्रंश करु नका.*

‘गुडी’ नाही ‘गुढीपाडवा’
सुरक्षेची व साक्षरतेची  ‘गुढी’ उभारुया !

सर्व मराठी बांधवाना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

- प्रदीप सामंत
- कार्याध्यक्ष
#मराठीएकीकरणसमिती

#काळजीघ्या #घरातचरहा #सुरक्षितरहा
#मीचमाझारक्षक


Monday, April 4, 2011

गुढीपाडवा

गुढीपाडवा 


गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.

* ब्रह्माने विश्व निर्मिती या दिवशी केली.
* विजयी श्रीराम अयोध्येला परत आले.
प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

* शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

* शालिवाहन राजाच्या नावाने नविन कालगणना शालिवाहन शक चालू केले.

गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते.

सौजन्य: