Monday, February 8, 2010

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण


कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही


मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं


मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक


मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात


मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली


मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे !!!!!

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!


आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा


कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ


पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!


आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील


ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे


असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!


म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!




आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
प्रेमाची उब देणारी ती झुळुक मीच असेल.............

मैत्री! 



मैत्री! एक गोंडस नाव,

एका नात्याचं.
रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात
हे मैत्री किती तऱ्हांनी बागडत असतं
आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून
धरून ठेवावं
कळतच नाही तेव्हा.
समुद्रकाठच्या वाळूसारखी
सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून
नावेत बसतो आपण;
लाटांवर स्वार होण्यासाठी,
एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक,
आहे आहे म्हणेपर्यंत
रस्ता चुकतो आपला.
कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून
चालत राहायचं,
एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला
सुरक्षित जपून ठेवायचं
काम चोख बजावतं
आपलं मन.
आणि जसा जसा
आयुष्याचा किनारा
जवळ येऊ लागतो,
तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा








आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
प्रेमाची उब देणारी ती झुळुक मीच असेल.............







मैत्री म्हणजे विश्वास......


मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान


मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव


मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश


मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श


मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन


मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट


मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा


मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण


मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण


मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग


मराठी कविता

कमळपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
निसटत्या क्षणाला कधी जवळ करायच नसत
आपल आयुष्यही असच असत
बरच काही हरवल असल तरी,खुप काही उरलेल असतं!

क्षणांवर जगतो आपण,
कारण क्षण आयुष्य घडवतात,
आठवणीत रमतो आपण,
कारण क्षण आठवणी बनवतात......


क्षण... काही आनंदाचे,
तर काही खूप दुख:चे,
क्षण.... हास्य-विनोदाचे,
तर काही फक्त रडण्याचे.......


क्षण असतात मैत्रीचे,
क्षण असतात प्रेमाचे,
क्षण असतात मायचे,
अन् आपण जोपासलेल्या नात्यांचेही.......


क्षणात येते दाटून भीती,
क्षणात सारे बळही येते,
येती कधी क्षण सोबतीचे,
तर कधी येती एकाकी क्षण.......


समाधान मिळते क्षणात एका,
वादळही उतते पुढल्या क्षणी,
वाटे हक्क मात्र ज्या क्षणावर,
तेव्हा काळ उभा ठाकतो समोर........

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.


अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...


कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....


जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..


रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....


असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...


तरीही,
या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

मैत्री


दोन मनांची अशी असावी मैत्री
सुखात अन दु:खात टिकावी मैत्री...


दोघांपाशी काही उरले नाही;
दोघांमध्ये तरी उरावी मैत्री...


भेटगाठ घडते अथवा ना घडते
न भेटताही मनी जपावी मैत्री...


चढ-उतार असतातच नात्यांमध्ये
कठिण प्रसंगांतच दृढ व्हावी मैत्री...


'उपकारां'ची भाषा मैत्रीमध्ये?
द्यायचेच तर फक्त स्मरावी मैत्री...


जगायचे या जगात कोणासाठी?
जगायचे तर फक्त 'जगावी' मैत्री...



मैत्री


एक सांगू का... मैत्री कधी ठरवून होत नाही.
आपण आपल्या वाटेवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात
एकमेकात येऊन रस्ते मिसळत असतात


आपल्या नकळ्त कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळ्ते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालू लागतो
नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो, सोबत करतो


एकमेकांची दु:खे वाटून घेतो
आनंदाचे क्षण साजरे करतो
मैत्री अशी होते
काय जादू असते मैत्रीत!


मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ


मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास


कधी कधी वाटतं समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं त्यात खेळ्त असावं


शिंपलेच शिंपले...विविध रंगाचे, आकारांचे, प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा


अलगद उघडावा अन त्यात मोती सापडावा
खर्रा खुर्रा, तुझ्यासारखा खरं सांगू का!


मोतीसुदधा लाभावा लागतो
तुझ्यासारखा..........

का कोणी...
का कोणी आपल्याला इतके आवडावे,
त्याच्यासाठीच वाटावे जगावे वा मरावे?...
मला वाटते आपण नेहेमी स्वत: साठीच जगावे,
कशाला आठवणीत कुणाच्या उगीचच झुरावे?...
वाटते तसे आपल्याला कधीच जगता येत नाही,
आठवण तिची आल्यावाचुन दिवस एकही जात नाही...
हा मूर्खपणाच माझा की मी खूपच प्रेम करतो,
इच्छा नसूनही आठवनींवर रात्री सा-या जागुन काढतो...
प्रेम मनात मावेना म्हणून डोळ्यात माझ्या पाणी आलं,
तिने मात्र पटकन मला "an imotional fool" म्हटलं...
जगतो आहे मी, जगेन आयुष्य सारं,
कारण माहितीये मला माझं प्रेम आहे अगदी खरं...


कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी


जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं,
तरी कुठेतरी थांबायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं.

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं,
स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं,
हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला,
तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं,
पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं




ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही........


Thursday, January 28, 2010



नाती

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........


काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........


नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........


पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...

Wednesday, January 27, 2010



नाती


जेव्हा एखादं नातं तुटतं
व्यक्ती जेवढी दुरावते
आठवनी तेवढ्याच जवळ येतात.
विसरायचा प्रत्येक प्रयत्न
मनाला दंश करुन जातात.


आपुलकीची जखम
खोल मनात तशीच राहते.
सगळे कही जुने जुने,
पण वेदना नवीन देत जाते.


चुक कोणाची होती
अर्थ याला राहातच नाही,
आठवनींचे ढग दाटुन आले तरी
डोळ्यातले अश्रु गालावर ओघळतच नाही.


त्या व्यक्तीचे “बोलणे” विसरु
पण, हा रोजचा “अबोला” मात्र सलतं.
ओठ हसत असले तरी
दुखतं किती ते मनालाच कळतं.


जेव्हा एखादं नातं तुटतं
दुखतं किती ते फ़क्त मनालाच कळतं

Friday, January 8, 2010

पाऊस आलाय….भिजून घ्या

पाऊस
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

Monday, January 4, 2010

पाऊस


काल हुतलय पावसाक
माफ कर बाबा.
आज भिजाक जमाचा नाय
मॆत्रीच्या पावसात भीजान
झालय वलोचींब
न्हावक घालता बघ माका
शुभेच्छांचो प्रत्येक थेंब
मीत्रांची इतकी गर्दी झाली
की भीजान भीजान माका सर्दी झाली
मगे पावस रिमझीम हसलो
ढगांका घेवन क्शीतीजार जावन बसलो
जाता जाता हुंता कसो " काळजी नको झीला, खुप भीजान घे
आनी मगे भीजान झाला की परत मॆत्रीचीच ऊब घे.

Saturday, January 2, 2010

मैत्री

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.


काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.


काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.


मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात



Friday, January 1, 2010



कुणीतरी असाव .........


कुणीतरी असाव .........
कुणीतरी असाव,
आपल वाटणार,
कुणीतरी असाव,
आठवण काढणार !


कुणीतरी असाव,
स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव,
आसव टीपणार !


कुणीतरी असाव,
गाली हसणार !
कुणीतरी असाव,
लाजवणार !


कुणीतरी असाव,
मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव,
चांदण्यांचा वर्षाव करणार !


खरच कुणीतरी असाव,
क्षितिजापार घेवून जाणार