Saturday, May 28, 2022
post 12
Great to see बदलता बॉलीवुड
मुग़ल नहीं #Prithviraj चौहान अब नायक है
सिर्फ गांधी ही नहीं राष्ट्र नायक #VeerSavarkar अब फिल्मों के भी महानायक है
असली भारत की फिल्में अब बननी शुरू हुई है
शुभकामनाएं
#SwatantraVeerSavarkar
#139yearsofsavarkar
Fb @ Kapil Mishra
post 11
माँ भारती की सेवा में अपना सम्पूर्ण जीवन समर्पित करने वाले अभिजात राष्ट्रभक्त एवं महान स्वतंत्रता सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी की जयंती पर उन्हें कोटिशः नमन।
मातृभूमि के लिए 'वीर सावरकर' जी का त्याग और बलिदान करोड़ों भारतीयों के लिए प्रेरणास्रोत है।
Fb Dr. Sambit Patra
post 9
#बखरसावरकरांची #पुस्तक
तयार केलेले सगळे ग्रुप्स बऱ्यापैकी भरले असल्यानं पुढच्या तीन ग्रुप्स च्या लिंक्स देत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित बखर सावरकरांची या पुस्तकातील लेखन सावरकर जयंती म्हणजेच 28 मे 2022 पासून प्रत्येक दिवशी एक कथा याप्रमाणे प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे.
आपणास किंवा अन्य सावरकर प्रेमी मंडळींना बखर सावरकर मधील लेखन हवे असल्यास त्यांनी खलील व्हाट्सएप ग्रुप मधील एक ग्रुप जॉईन करावा. लिंक वरून ग्रुप जॉईन करता येईल. प्रत्येक दिवशी संध्याकाळी आपणास त्या ग्रुपवर एक मेसेज येत जाईल. ५ ग्रुप्स बऱ्यापैकी भरले आहेत,म्हणून पुढच्या ३ ग्रुप्स च्या लिंक्स देतो.
(वीर सावरकरांचे सोप्या भाषेत लिहिलेलं संपूर्ण चरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे यासाठी हा प्रयत्न आहे.)
अधिकाधिक लोकांना या अभियानात सामील करून घ्यावे, ही विनंती.
~आदित्य रुईकर
लिंक्स
६. https://chat.whatsapp.com/C7Nx5723Z9oIbxi5DWHruw
७. https://chat.whatsapp.com/DZhPyy4MjhK9r7MS9ES936
८. https://chat.whatsapp.com/D26G9isqMEW2e8V52yu3Vg
3.
https://chat.whatsapp.com/B86xwWpNxJiLi6G4B4xSIX
Thursday, May 26, 2022
post 7
हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोहही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे सोडणार नाही.
*
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
"आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
....मनसोक्त जगा..
*
डीडी क्लास : आपल्या आयुष्याची वही तीन पानांची असते. पहिल्या पानावर "जन्म" लिहिलेला असतो तर तिसऱ्या पानावर "मृत्यू"
मधलं पान कोरे असते
ते म्हणजे आपले जीवन असते !
त्या कोऱ्या पानावर आपण आपल्या कर्माने काय लिहितो
त्याचेच रिटर्न आपल्याला मिळतात !
त्या कोऱ्या पानातील किमान चतकोर भाग जरी
इतरांच्या आनंदासाठी राखीव ठेवलात
तरी तुमचं पूर्ण पान समृद्धीने भरून जाईल !
स्वानुभवाने सांगतोय
बँक बॅलन्स पेक्षा फ्रेंड बॅलन्स महत्वाचा ठरतो !
तो ज्याचा जास्त
तो जगेल मस्त !
ⓒधनंजय देशपांडे (dd)
Sunday, May 15, 2022
Saturday, May 14, 2022
post 4
जी .ए. कुलकर्णी - कथासंग्रह पिंगलावेळ- कथा ‘ऑर्फियस’
-आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका
समीक्षक - श्रीनिवास हवालदार
जी .ए. कुलकर्णी यांची ‘ऑर्फियस कथा एका ग्रीक पुराणकथेवर आधारित आहे. मूळ पुराणकथेत ‘ऑर्फियस’ हा तंतुवाद्य [सारंगी] वाजवणारा महान वादक आपल्या संगीताच्या सामर्थ्याने मनुष्य ,पशुपक्षी,वृक्ष व दगडधोंडे यांनादेखील प्रभावित करतो ते इतके की ते त्याचे संगीत ऐकण्यासाठी त्याच्या मागे धावत असतात. ऑर्फियस कथेचे बरेच ग्रीक Versions आहेत परंतु खालील कथानकाबद्दल सामान्यतः एकमत आहे. जी.ए. नी या पुराणकथेस जीवन आणि मृत्यु यांचा परिवेश पांघरून आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका घडवून एक नवीनच संदेश दिला आहे.
ऑर्फियस आणि त्याची प्रेमिका युरिडिसी यांच्या लग्नाच्या दिवशीच युरिडिसीवर एक अन्य प्रेमी तिच्यावर होणाऱ्या बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रतिरोध करण्यासाठी जंगलात पळून जाताना युरिडिसी साप चाउन मरते आणि तिच्या मृत्यूमुळे व्हिवळ झालेला ऑर्फियस तिला जिवंत परत आणण्यासाठी आपल्या संगीताच्या सामर्थ्यावर अनेक बाधा दूर करून मृत्युलोकाच्या डोहात प्रवेश करण्यात सफल होतो. तेथील दारावरच्या महाकाय, भीषण तीन मुखे असलेल्या श्वानास आपल्या अमोघ वादनाने गुंगवुन मृत्युलोकात मृत्यू देवते पर्यंत पोहोचतो. मृत्यू देवता Hades ही त्याच्या संगीतामुळे मुग्ध होते आणि ऑर्फियस मृत्युदेवतेकडून युरिडिसीला पृथ्वीवर पोचे पर्यंत तिच्याकडे मागे वळून न पहायच्या अटीवर परत न्यायची परवानगी मिळवतो पण ऑर्फियस मृत्युदेवतेच्या युरिडीस मृत्युलोकात परतण्याच्या आश्वासना बद्दल साशंक असतो आणि युरिडीस खरोखरीच आपल्यामागे येत आहे का नाही हे बघण्यासाठी मागे बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते. पृथ्वीवर पोहोचण्याच्या काही क्षणापूर्वीच ऑर्फियस मागे वळून बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते. ही घटना केंद्रस्थानी ठेऊन नंतर जी. ए. ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी देतात परंतु त्या अगोदर मूळ पौराणिक कथेचा शेवट समजणे आवश्यक आहे.
ऑर्फियस पुनः त्याच्या संगीताच्या माध्यमाने मृत्युलोकात जाण्याचा प्रयत्न करतो परंतु असफल होऊन पृथ्वीवर येतो. तो पृथ्वीतील दुसऱ्या कोणाही स्त्रीशी प्रेम करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.यावर Thrace येथील काही जंगली स्त्रिया मत्सर भावनेने त्याला धरून त्याच्या शरीराचे दोन फाक करून एका पहाडा खाली पुरून देतात पण त्याचे डोके सतत गाणाऱ्या अवस्थेत समुद्रात फेकून देतात. ग्रीक तत्ववेत्ता Plato ह्याने ऑर्फियसला 'भेकड' म्हणून संबोधिले आहे आणि त्याला त्याच्या भेकडपणाची कठोर शिक्षाही मिळाली असेही त्याचे मत आहे.”In fact, Plato's representation of Orpheus is that of a coward, as instead of choosing to die in order to be with the one he loved, he instead mocked the gods by trying to go to Hades to bring her back alive. Since his love was not "true"—he did not want to die for love—he was actually punished by the gods, first by giving him only the apparition of his former wife in the underworld, and then by being killed by women.”
आता जी. ए. ने ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी कशी दिली या बद्दल विचार करू.पृथ्वीवर पोहोचेपर्यंत मागे न पाहण्याची अट स्वीकारहूनही त्याने विपरीत आचरण का केले हा जी.ए.च्या कथेतील मुख्य मुद्दा आहे.याचे कारण मृत्यूलोकापासून पृथ्वीपर्यंत च्या मार्गात या दोघांच्या वार्तालापात सापडते. दोघांना एकमेकाशी बोलण्याची मुभा मृत्युदेवतेने दिली होती हे उल्लेखनीय आहे.
ऑर्फियस आणि युरिडिसी या दोघांचा वार्तालाप वाचला तर कळेल की ऑर्फियसला तिच्या मृत्यूपूर्वीच्या सर्व सुखद आठवणी त्याच्या मनात बिंबलेल्या आहेत आणि पृथ्वीवर पोहोचल्यावर पुन्हा दोघांचे जीवन पूर्वीप्रमाणेच आनंदी असेल असे त्याला वाटते. यावर युरिडिसीचा प्रतिसाद फारच निराशाजनक असतो. ती आर्त स्वरात म्हणते की उत्कट आनंदाचे आपण गोळा करीत असलेले क्षण म्हणजे अखेर मृत्यूच्याच गळ्यात घालायच्या हातातील मणी आहेत, हे मला आता उमजत आहे. ती म्हणते की आपण अनेक वृद्ध, जर्जर माणसं पाहतो पण त्यांची दयनीय अवस्था म्हणजे आपलीच भविष्यातील प्रतिबिंब आहेत हे आपणास फार उशिरा जाणवते. आपले अनेक क्षण सुखाचे असतात परंतु ते सतत हातातून निसटत असतात याची जाणीव आपणास होत नाही. सगळ्यांचं मृत्यू अटळ आहे याची जाणीव सर्वांना असते परंतु माहित असणं निराळं आणि आपण तो स्वतः भोगण निराळं. ऑर्फियस तिच्या शब्दाने चमकतो.तिच्या बोलण्याने ऑर्फियस समजतो की मृत्यूचा भीषण अनुभव घेतलेली युरिडिसी आणि मृत्यूपूर्वीची युरिडिसी ह्या दोन वेगळ्या व्यक्ती झाल्या आहेत. मृत्युचा अनुभव घेतलेली ही युरिडिसी त्या्ची लाडकी युरिडिसी असुनही मृत्युच्या भीषण अनुभवाने पूर्वीची युरिडिसी राहिलेली नाही. यानंतर पृथ्वीवर जिवंतपणात ही मृत्युचा तो भीषण अनुभव तिचा पाठलाग करणार आहे आणि त्यामुळे तिला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे. तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही. तो युरिडिसीला पृथ्वीवर परत मृत्युलोकात पाठविण्याचा निर्णय घेऊन मुद्दाम मागे वळून तिच्याकडे पाहतो आणि युरिडिसी आर्त किंकाळी देऊन नाहीशी होते.
युरिडिसी लुप्त झाल्यावर ऑर्फियस तेथे विचारमग्न होऊन उभा राहतो आणि त्याने घेतलेला निर्णय योग्य होता की काही दुसरा निर्णय शक्य होता या व्दिधा मनस्थितीत पुन्हा मृत्युदेवतेस भेटण्यास जाऊन प्रायश्चित स्वीकारण्याची तयारी दाखवतो. मृत्यु देवता त्याची कानउघाडणी करून परत जाण्याचा आदेश देतो. मृत्युचा अनुभव घेतलेल्या युरिडिसीला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही हा तर्क ऑर्फियसने मृत्यदेवतेस पटवून दिल्या नंतर मृत्युदेवता त्याला पुनः त्याला युरिडिसी सहा महिने त्याच्याबरोबर सहा महिने पृथ्वीवर आणि सहा महिने मृत्युलोकात एकटी राहण्याचा पर्याय देते आणि या पर्यायाने त्याचे जीवन शक्यतोवर सुखकारक होऊ शकते याची कल्पना देते. मृत्युदेवता त्यास समजावते की क्षणभंगुरतेने माणसाचे मन विषण्ण होण्याचे कारण नाही. आपला प्रवास अगदी तात्पुरता आहे आणि या वाटेने पुन्हा येण्याची संधी मिळणार नाही हे समजूनच सुखाचा उपभोग घ्यायला हवा.
ऑर्फियसला देवते ने दिलेला पर्याय पटतो परंतु युरिडिसी आपल्या पूर्व मतावर ठाम असते वारंवार मृत्यू आणि जीवन यांचा जीवघेणा खेळ खेळण्यास नकार देऊन ती ऑर्फियसला परत जाण्यास सांगते.
जी.ए. ने शेवटी ऑर्फियस आणि युरिडिसी दोघांबद्दल म्हटले आहे " ती दोघंही शहाणी आहेत , कारण त्या दोघांनीही आपल्या मर्यादा ओळखल्या आहेत. यालाच कदाचित ज्ञान देखील म्हणता येईल”
"
Thursday, May 12, 2022
Friday, April 29, 2022
post 2
गुलजार यांची मुलाखत..
सुमारे ४५ वर्षांपूर्वी डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांची घेतलेली ही मुलाखत, मित्र ज्ञानेश्वर आगाशे, विजय हरी वाडेकर यांच्या 'राजस' या मासिकात प्रकाशित झाली होती. आजही त्यातील मजकूर, गुलजार यांचे लिखाण, विचारधारा व व्यक्तिमत्त्व जाणण्यासाठी सहाय्यक ठरेल.
ह्या मुलाखतीत डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांना विचारलेले प्रश्न आणि गुलजार यांनी मांडलेली स्पष्टीकरणे ह्यातील दूरदृष्टीला सलाम केला पाहिजे..
--------------------------------------------------
गुलजार यांची मुलाखत : भाग १
--------------------------------------------------
सोना,
काही श्वास तुझ्या पूर्वी जगलो
काही श्वास तुझ्यासवे जगत आहे
असं होत नाही का गं सोना,
की साऱ्या जीवनात
एक श्वास मिळतो जगण्यासाठी
अन् कधीकधी एका श्वासात
कोणी सारे जीवन जगतो
ह्या कवितांमधे मी
आपले श्वास एकत्र केले आहेत
सोना,
जे तुझ्या झोळीत टाकीत आहे
काही श्वास जे मी जगून घेतले
काही श्वास जे मी जगू शकलो नाही
आणखी काही अर्धेअपूर्ण श्वास,
ज्यात तू
आपले श्वास जोडून देशील तर शप्पथ
एका श्वासात सारे जीवन जगून घेईन
--------------------------------------------------
होय ही कविता आहे; पण ही अर्पणपत्रिका आहे. ही आहे गुलजारची कविता. होय हा आहे कवितेतील सुगंधाला देहरूप देणारा गुलजार. चित्रपटातील संवाद, दिग्दर्शन ह्यापलीकडेही एक गुलजार उभा आहे. तो आहे कवी गुलजार.
जीवनातील कडू-गोड अनुभव, प्रत्येक क्षणाच्या पडद्यात दडलेल्या जाणिवांचा शोध घेत अनंत श्वासांच्या प्रवासाला निघालेला हा यात्रिक स्वतःच्या कवितांबद्दल, उर्द साहित्याबद्दल काय म्हणतो, हे जाणून घेण्यासाठी मी ही त्याची घेतलेली मुलाखत. अनिवार मोह होत असतानाही मी त्याला त्याच्या वैयक्तिक व चित्रपट जीवनाबद्दल काहीही विचारले नाही; पण त्याबद्दल खंत नाही; पण तरीही वाटतं खूपच विचारायचं राहूनच गेलंय.
हा संवाद गुलजारच्या साहित्यजीवनावर खूप प्रकाश पाडेल, यात शंका नाही. ‘राजस’चा वाचकवर्ग ह्या मुलाखतीचे सहृदयतेने स्वागत करेल अशी आशा नाही तर मला पूर्ण खात्री आहे.
--------------------------------------------------
त्या वेळी 'राजस'च्या वाचकांनी ह्या मुलाखतीचे स्वागत केले होतेच.. आज फेसबुकवरील वाचक मंडळीही ह्या मुलाखतीचे तितक्याच आत्मियतेने स्वागत करतील...
--------------------------------------------------
राम : आपण कविता लिहिण्यास केव्हा व कुठे सुरुवात केली?
गुलजार : हे फॅसिनेशन जे असत ते शाळेच्या वेळी लागलं. “विंटल कॉलस् ए पोएट” असं म्हणतात. शायरीचा शौक त्या कच्या वयातच लागला. शहर दिल्ली.. शाळेचे दिवस अन् भाषा उर्दू.. कारण शिक्षणाचे माध्यम उर्दूच होते, त्यामुळे प्रारंभ तेथूनच झाला. (माईक पाहिजे?)
राम : नको, मी नंतर प्रश्न लिहून घेईन.
राम : तुम्ही कधी मुशायऱ्यात भाग घेतला आहे काय? कारण माझ्या तरी पाहण्यात आले नाही.
गुलजार : दिल्लीत शाळा व कॉलेजमधे असताना मुशायऱ्यात भाग घेतला. नंतर मुंबईला आलो व येथेही कॉलेज जॉईन केले. इथेही पी. डब्लू. ए. मीन्स प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन हीयर यु नो. त्यावेळी बन्नेखाँ सज्जाद जहीर आदिबरोबर मुशायर्यात हजेरी लावीत असे; पण हे मुशायर्यात जाणे हळूहळू कुठंतरी सुटत गेलं.. अन् मग असं सुटलं की बस्स..
राम : पण मजरूह, साहिर आदि अजूनही भाग घेतात.
गुलजार : होय, ते घेतात भाग.. पण, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडीबहूत पुढे पुढे मला भीतीच बसली. आता माईकच्या समोर जाण्याचं धैर्यही राहिलं नाही, असं म्हणाल तर हरकत नाही.
राम : मी तुम्हाला काय म्हणू? गीतकार की कवी? कारण आजचे समीक्षक तरी हे दोन भेद पद्य साहित्यात मानतात. त्यामुळेच मराठीत माडगुळकर आणि हिंदीत नीरजला कवी म्हणावयास ते तयार नाहीत.
गुलजार : हे मी गीत लिहिण्यास फार उशिरा सुरुवात केली. तुम्ही तर माझे 'जानम' आणि 'एक बंद चांद' हे कवितासंग्रह वाचलेच आहेत. त्यात तुम्हाला दिसलंच असेल की मी मूलतः कविताच लिहितो. गीत लिहिण्याची मला संधी चित्रपटात आली तरीही मी प्रथमतः ती स्वीकारली नाही; आणि आताही लिहितो तेही अगदी ठराविकच. करीअर म्हणून त्याचा स्वीकार केला नाही.
राम : तुमच्या कवितेबाबत आमच्या उर्दूस्नेही व समीक्षक मित्रांचा आरोप आहे की, ती ती मीराजी एवढी नाही; पण अख्तर उल इमान एवढी अस्पष्ट भाषा आहे. ह्याविषयी तुम्हांला काय सांगायचं आहे?
गुलजार : होय, इमेजेसच्यामुळे; भाषेमुळे नाही; कारण इमेजेस थोड्या कठीण आहेत. त्या सर्वपरिचित नाहीत. माझ्या कविता वाचल्यानंतर जर तसे वाटत असेल तर ते मी कबूल करतो. जर तो गुन्हा आहे तर मला तो मान्य आहे, पण आता जेव्हा मी माझ्या जुन्या कविता वाचतो तेव्हा मला जाणवतं की पूर्वी मी जी उभाषा वापरत होता ती फार मिलष्ट होती व इमेजेस सोप्या होत्या. आता हळहळ भाषा सोपी होऊ लागली व व्यस्त प्रमाणात इमेजेस मात्र कठीण होत चालल्या आहेत परिवर्तन मी स्वत: अनुभवतो.
--------------------------------------------------
क्रमशः
Wednesday, April 27, 2022
post 1
आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट
पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.
***
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील! जगण्याची एक संधी मिळावी म्हणून या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... त्यांना ती संधी मिळालीच नाही!
कोविडमुळे पाच लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?
जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!
तीनशे पासष्ट दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते, बेड मिळाला ऑक्सिजन पुरत नव्हता, ऑक्सिजन मिळायचा तर औषधं नव्हते... आणि कुठेतरी हे सगळं मिळायचं तर व्हेंटिलेटर नसायचं. स्वतःच्या गळ्याभोवती बोटं गच्च पकडून, घोगऱ्या आवाजात... "डॉक्टर वाचवा... जीव घाबरलाय" म्हणत तरणीताठी पोरं जीव सोडताना बघितली आहेत...
खरंतर त्यांचं कर्तव्य होतं, व्यवहारिक भाषेत त्यांना त्याचे पैसे मिळायचे पण तरीही त्यापलीकडे जाऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं, रुग्णांचं हागणं मुतणं साफ केलं, सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकयातना देणाऱ्या किट घालून अठरा-वीस तास काम केलं, आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. ते सर्व काही आजचा दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं...माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती!
शंभर वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या. साफसफाई आली, बंद नाल्या आल्या, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आला, वरून 'सॉरी' बोलणं आलं... आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली,झेंडे आणि अजेंडे? शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते... इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलोय! आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं... एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचविण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता एवढं सरळ सोपं होतं... एकाच वर्षात सगळं संपलंय!
आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक... यांची पोटं भरलेली आहेत, यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्यापोटी त्यांचे खेळ सुरू आहेत! नोकऱ्या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या पण उद्या जर ही किंवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तयारी काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
कसल्या राजकारण आणि धर्मकारणाच्या टिमक्या वाजवता... श्वास पुरत नव्हता म्हणून पायाच्या टाचा घासून गोळामोळा झालेल्या पाचशेहून अधिक बेडशीट अजून नजरेसमोर आहेत...! आपण त्यांच्यापैकी एक नव्हतो, आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.
डॉ. प्रकाश कोयाडे
Tuesday, April 12, 2022
Sunday, April 10, 2022
Saturday, April 2, 2022
आरंभ है
आरम्भ है प्रचण्ड बोले मस्तकों के झुण्ड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बाण पे उतार दो !!!
मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले
वही तो एक सर्वशक्तिमान है,
विश्व की पुकार है ये भागवत का सार है की
युद्ध ही तो वीर का प्रमाण है !!!
कौरवो की भीड़ हो या पाण्डवो का नीड़ हो
जो लड़ सका है वही तो महान है !!!
जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं
क्या ज़िन्दगी है ठोकरों पर मार दो,
मौत अन्त हैं नहीं तो मौत से भी क्यों डरे
ये जाके आसमान में दहाड़ दो !
आरम्भ है प्रचण्ड बोले मस्तकों के झुण्ड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बाण पे उतार दो !!!
वो दया का भाव या की शौर्य का चुनाव
या की हार का वो घाव तुम ये सोच लो,
या की पूरे भाल पर जला रहे विजय का लाल,
लाल ये गुलाल तुम ये सोच लो,
रंग केसरी हो या मृदंग केसरी हो
या की केसरी हो लाल तुम ये सोच लो !!
जिस कवि की कल्पना में ज़िन्दगी हो
प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो,
भीगती नसों में आज फूलती रगों में
आज आग की लपट तुम बखार दो !!!
पीयूष मिश्रा

