Tuesday, December 31, 2013

कादंबरी

कादंबरी 




धांडोळा ~ विक्रम भागवत
-----------------------------------------
एक जबरदस्त कथानक आहे.
आशू काळसेकर. एका अग्रगण्य वृत्तसमूहासाठी फ़्री लान्स काम करणारी एक जर्नलिस्ट. तिच्यावर एक खास जबाबदारी सोपवली जाते. एका सस्पेंडेड पोलिस अधिकार्याची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यावर स्टोरी करण्यासाठी ती बाहेर पडते. प्रेमानंद हिर्लेकर हा तो ए टि एस चा अधिकारी, encounter specialist म्हणून प्रसिद्ध, एका सामान्य नागरिकाच्या encounter साठी suspend झालेला. ती कामाला सुरूवात करते. या कामात ती एका कल्पनातीत भयंकर वादळात सापडते. व्यक्तीगत भावनांच्या आणि सामाजिक राजकीय हितसंबंधांच्या... कथानक एखाद्या वावटळीसारखं वाचकाला वेगवेगळ्या जगांत नेतं. त्यात भेटतात एकसे एक जबरदस्त व्यक्ती ...एका अतिरेक्याचा बाप अब्दुल मसूद... एका संस्कृत महापंडिताचा मुलगा शरद गोखले... आणि अशा व्यक्तीरेखांतून वेगवान वळणं घेत कथानक थेट दिल्लीच्या साऊथ ब्लॉकपाशी जाऊन धडकतं. सत्तेची केंद्रं हादरतात. या वादळाच्या वावटळीत हकनाक सापडतो वृत्तपत्रांचा संपादक पसरिचा. आणि त्या आशू काळसेकरचा प्रवास अखेर रमाई झोपडपट्टीपर्यंत जाऊन पोहोचतो. रमाई झोपडपट्टी ते साऊथ ब्लॉकची भव्य ऑफ़िसेस. एक विस्तृत कॅनव्हास. गडद त्रिमितीय व्यक्तीरेखा. वास्तवाची जळजळीत जाणिव करून देणारी कादंबरी. धांडोळा. लेखक विक्रम भागवत.
श्री. विक्रम भागवत हे नांव तसं वाचकांच्या परिचयाचं आहे. ’अफ़लातून’ ’एक शून्य रडते आहे’, ’ घनदाट’, ’शोध’ ’एक लफ़डं विसरता न येणारं’ , आदी गाजलेल्या नाटकांचे नाटककार, आणि ’एक शून्य शून्य ’,”चाळ नांवाची वाचाळ वस्ती ’ अशा गाजलेल्या सिरियल्सचे ते सुप्रसिद्ध लेखक आहेत. वेगवान कथानक आणि मनाची घट्ट पकड घेणार्या व्यक्तीरेखा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं. त्यांची “धांडॊळा” ही पहिलीच कादंबरी. फ़क्त ई स्वरूपातच उपलब्ध आहे. तीही विनामूल्य. फ़क्त ई साहित्य प्रतिष्ठानच्या वाचकांसाठी. सुसाट गतीमान घटनाक्रम आणि श्वास रोखून धरायला लावणारे कथानक या मुळे ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर संपवल्याशिवाय सुटत नाही. आणि वाचून संपल्यावरदेखिल संवेदनशील मनाला ही कादंबरी बरेच दिवस अस्वस्थ करून सोडते. आजवर ज्या ज्या वाचकांनी ती वाचली त्यांना या कादंबरीने मंत्रमुग्ध करून सोडलं आहे. काही समीक्षकांनी या कादंबरीचं वर्णन “ मराठी साहित्यातील एक विशेष टप्पा” असं केलं आहे. ज्या ज्या वाचकांनी ही कादंबरी वाचली त्यांनी ती एकाच बैठकीत संपवली. एका भन्नाट अनुभावाला सामोरे गेले.
-----------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
-----------------------------



गालातल्या गालात... ~ विनित वैद्य
------------------------
संग्रहातून ...
आता मी वृंदा नाव धारण करून हातावर तुरी देणारी किंवा देणारा इसम कोण असेल याची शोध मोहिम सुरु केली. पहिल्यांदा एक चार दोन दिवसांनी त्या नंबर वर फोन करून रिंग वाजायची पण उचलणे नसायचे. मग कदाचित माझा नंबर पाहून उचलत नसेल म्हणून दुसऱ्या नंबरवरून प्रयत्न चालू ठेवला. अचानक एके दिवशी फोन उचलला. समोरचा आवाज मुलीचाच होता. पण मी ओळख लपवून बोलू लागलो. तेव्हा समोरून म्हणावे अशी प्रतिक्रिया आली नाही. तोडके मोडके हिंदी शब्द कानावर पडले. खरेतर मीच उल्लू बनलो होतो. काही दिवसांनी तो नंबरच बंद लागला. काहीच सुचेना
इथेच पूर्णविराम नको होता. मी प्रत्येक मैत्रिणीकडे आणि तायालोकांवर संशयाने पाहत होतो.
-------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
------------


नवरा : एक खोज' ~ प्रियंका जोशी
------------------------


'नवरा : एक खोज' हे पुस्तक आगळे-वेगळे असून आजच्या 'उमेदवार' तरुण-तरुणींना नक्कीच मार्गदर्शक ठरावे. लेखिका नुसतीच सुशिक्षित नसून कर्तबगार देखील आहे -हे प्रत्येक प्रसंग कथनावरून ध्यानी आले. घरचे (म्हणजे माहेरचे) वातावरण मोकळे व विचारवंतांचे असल्यामुळे 'शोध' करण्यामधील 'बोध' उपयुक्त ठरला तरी 'पसंती' शंभर टक्के लेखिकेने ठरवलेली असल्याचे ध्यानी आले अणि घडलेले 'शुभमंगल' नक्कीच आनंददायी झाले असल्यामुळेच हे पुस्तक लिहिणे घडले असे मी समजतो. आयुष्यात बरेच वेळा जन्माचा साठी निवडण्यासाठी खडतर वाट चालावी लागते परंतु क्वचित प्रसंगी 'जादूची कांडी' फिरावी त्याप्रमाणे एखादी व्यक्ती क्षणार्धात हृदयात जाऊन बसते -तसेच कांहीसे घडले असावे व ते जर उभयपक्षी झाले तर दुधात साखर. लेखिकेने तर त्याची बासुंदी केलेली आहे -हे विशेष आहे. अभिनंदन!

असे असून देखील लेखनात (अगदी शीर्षकापासून) अनावश्यक इंग्रजी शब्द वापरलेले पाहून खेद झाला. लेखिका शब्दसंपन्न आहे हे जागोजागी दिसूनही 'हे असे कां?' हा प्रश्न किमान प्रकाशकांनी तरी विचारायला हवा होता.
रोजच्या व्यवहारात सामोरी आलेली एखादी व्यक्ती मुखदुर्बळ निघाली की 'खेळ खलास' असे माझ्या बाबतीत सतत घडते -त्यामुळे लेखिकेची काय परिस्थिती घडली असावी ते मी जाणून आहे. हुशारी व व्यवहारज्ञान यांचे 'लग्न' स्वतःच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी घडायला हवे व तसे सहसा दृष्टीस पडत नाही, हे एक सत्य असून पुस्तकातील बहुतेक प्रसंग तेच तर दर्शवतात. बोध घेण्यासाठी देखील 'विचारवंत' आवश्यक असत्तात, हे 'उमेदवार' मंडळींनी लक्षात घ्यावे -हे मी काढलेले तात्पर्य!
बालमोहन, अमेरिका
-------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
------------



पैशाचा पाऊस : सुषमा जाधव
-----------------------------

एक जळजळीत वास्तव. आधीच नाडल्या गेलेल्या गरीब स्त्रियांच्या असहायतेचा फ़ायदा घेऊन भाबड्या अंधश्रद्धांच्या जाळ्यात त्यांना फ़सवून पैसे आणि इतर बरेच काही मिळवणार्या नराधमांची कथा. मध्यमवर्गीय समाजाच्या अगदी शेजारीच चाललेला हा अघोरी धंदा. मध्यंतरी या विषयावर वर्तमानपत्रांतून बातम्याही आल्या. एका निर्जन ठिकाणी काही बळी सापडले. त्यावरून काही काळ गदारोळही माजला. पण या नराधमांचे हात इतके बळकट आहेत की काही थातूर मातूर शिक्षा होऊन त्यातले काही सुटले. काही पकडले गेलेच नाहीत. आणि त्या सर्व प्रकाराची समूळ चौकशी कधीच झाली नाही.
या कादंबरीच्या लेखिका सुषमा जाधव या आताच्या तरूण फ़ळीतील कार्यकर्त्या आणि कवयित्री. त्यांची ही पहिलीच कादंबरी. त्यांची सशक्त भाषा आणि वास्तवाला आमने सामने भिडताना हातचे काही राखून न ठेवता सामना करणारी त्यांची लेखणी. त्यांच्या कादंबरी मागचे त्यांचे कवीमन. या सर्व गोष्टी कादंबरी वाचताना जाणवतीलच. ही कादंबरी कच्च्या दिलाच्या माणसांना वाचताना झेपेल कि नाही याची शंका आहे. पण वास्तवाच्या विस्तवाशी दोन हात करण्याची धमक असणार्या वाचकांनी ही कादंबरी वाचायलाच हवी. आपल्या शायनिंग समाजाच्या गुळगुळीत कार्पेटखाली कसली भयानक कीड लपली आहे याची जाणीव समाजाला व्हायलाच हवी. त्यासाठी अशा सशक्त सामाजिक लेखकांची गरज आहे. आणि असे लेखक पुढे यायला हवेत, तर त्यासाठी वाचकांच्या प्रतिसादाची गरज आहे.
--------------------------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
------------








मन तळ्यात मळ्यात : अदिती कापडी
-----------------------------

संग्रहातून .....

दादाने पाणीपुरीचे पैसे दिले आणि आम्ही निघालो.. एव्हाना एक तास उलटला होता. प्रसन्न स्टोअर्सच्या शेजारून टर्न घेतला.. आणि आम्ही नेहमीच्या रस्त्याला लागलो. मी माझ्याच गुंगीत असताना दादा एकदम म्हणाला-
''शारदा.. तो बघ.. तो राकेशच आहे ना''
मी ते दृश्य बघून चाट पडले.. मला शॉक बसला.. तो राकेशच होता..
'' हो दादा..त्- तो.. तो राकेशच.. आहे..''
-----------------------------

Free download #eBook copy @
-----------------------------


सासू ~ प्रियंका जोशी
----------

"पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि तिथे खूप पाट्या असतात"...एवढी आणि एवढीच माहिती असलेल्या दोन मुलींनी एकदा पुण्याला कॉलेजमध्ये प्रवेश केला. आणि त्याचबरोबर पेईंग गेस्ट म्हणून एका पुणेरी घरामध्येही प्रवेश केला. तेव्हा त्यांना या माहेरच्या घरा


तला सा-सु-रवास काय असतो तेही बघायला मिळालं.
त्यांच्या पुणेरी "पाहुणचारा"ची कथा लवकरच येत आहे...
सा. सू. ---
लेखिका प्रियंका जोशी....

( ही कथा पूर्णतः काल्पनिक असून त्यातील स्थळे, व्यक्ती, घटना,कुत्रा यांचे कोणाही जीवित अथवा मृत व्यक्तींशी (किंवा स्थळ, घटना कुत्रा यांच्याशी) साधर्म्य आढळून आल्यास तो निव्वळ आणि निव्वळ ( आणि निव्वळच) योगायोग समजावा अशी लेखिकेची विनंती आहे. तसेच यातील विनोद मनाला लावून घेऊन स्वतःला सुधारण्याच्या फ़ंदात कोणी पडू नये —

---------------
Free download #eBook copy @

------------





खोड ~ किरण कुलकर्णी
--------

भयकथा

-----------------------------
Free download #eBook copy @
------------
ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com




0 comments: