Tuesday, September 30, 2014

Sunday, September 28, 2014

आठवले शब्द मरणाच्या दारी

आत्मन
आठवले शब्द मरणाच्या दारी
आता उराउरी भेटताती.
जगावे मरावे अजाणता कोणी
त्वां - मी कोण योनी आकळावी.
कुणाचे कशाला जपावे आत्मन
नादावले मन भार वाही.
अर्थ अस्थी अस्थी स्मशान समष्टी
शब्द शब्द कष्टी राखेतून.
~ शरद...
Fb @ https://www.facebook.com/sharad.deoray

Saturday, September 27, 2014

तारका झोपायचा संकेत काही देत नाही

तारका झोपायचा संकेत काही देत नाही, 
पेरलेले चांदणे माझे हृदय की शेत नाही,

वाहला नाही कधी आवेग माझ्या भावनांचा,
कारणाने सागराच्या याच मी अटकेत नाही,

हाल केले फार ताव्याने जळाल्या भाकरी,
घास या पोटातले ते आजही निवलेत नाही,

तू तशी आहे कुठे? मी शोधतो आहे तुला पण,
ठार वारा हिंडणारा मी कुणी अनिकेत नाही,

ज्ञान, नामा नी तुकोबा जाहली पोरे तुझी रे,
विठ्ठ्ला मी आज माझ्या मायच्या काखेत नाही,

भावना असतात काही वेगळ्या माझ्या तुझ्याही,
ह्या मिटायाला कुणी मी सागराची रेत नाही,

प्राण जडला ह्या गुलाबावर कसा माझा सखे गं?
मोगर्याचा गंध माझ्या दूरवर बागेत नाही,

- किशोर रायबोले
http://www.kishraibole.blogspot.in/
Wednesday, June 18, 2014

Friday, September 26, 2014

वेदने तुज स्मरावे किती


वेदने तुज स्मरावे किती ! 
पापण्यांनी भिजावे किती! 

दाब वेड्या तुझे हुंदके...
सांत्वनांनी रडावे किती?

श्वान सारे तुझ्या भोवती
आंधळ्या तू दळावे किती !

रोज डोळे तुझे बोलती...
मी मुक्याने रहावे किती !

दुःखितांना विचारा जरा -
वेदनेशी लढावे किती !

सुंदरी तू किती देखणी !
बारकावे टिपावे किती !

PRAKA$H M@R€
https://www.facebook.com/prakash.more.9465

Thursday, September 25, 2014

अंबराला अंग थोड़े मागतो




--- अंबराला अंग थोड़े मागतो
आसवांना पंख थोड़े मागतो

हॊत आहे जखम आता कोरडी
मोग-याला डंख थोड़े मागतो

व्यर्थ देतो सागराला आहुती
ईन्द्रधनुष्या, रंग थोड़े मागतो

धावती ईच्छा पुढे, उन्हात मी
कल्पवृक्षा, मंत्र थोड़े मागतो

वादळांची पार घुसखोरी सदा
कुंपनाला बंध थोड़े मागतो

भाबड्यास दिला महंतांनी दगा
पांडुरंगा, संत थोड़े मागतो

कापुराला कोंडले देवालयी
माय गझले, गंध थोड़े मागतो

*** चंद्रशेखर भुयार ***
@https://www.facebook.com/chandrashekhar.bhuyar

Tuesday, September 23, 2014

अचानक जाग येते मनाला काही होते




अचानक जाग येते मनाला काही होते
लाजेला घेऊन ओठी मनाला घाई होते

क्षण जिव्हाळ्याचे बांधून घेते पैंजणातं
मग हळूच धावत येते मन अंगणातं

निजलेले गाव तरीही धुके जरासे जागे
चाहुल मिळे वाटेला जीवाला ओढ लागे

पसरून देता देता हाकेला वाटेवरती
घाट उतरता थोडा नजर यमुनेवरती

यमुनेच्या त्या काठाला नसे तसे कोणीही
माझ्याच इतके कासावीस असे पाणीही

त्यात साद नुसती येते दूर तरी कुठुन
ओंजळीत घेते सारे तेव्हा प्राण भरून

पण पसरत नाही हात कुणी समोर
पिसारा फुलवत नाही आधारचा मोर

मग पदर नुसता डोळ्यांना समजून घेतो
तो आहे येथे तरीही ना समोर कधीही येतो

परतून घरी जाताना उरते मागे काही
जे उरले असेल तेही माझे म्हणवत नाही

- विजय बेंद्रे (एक वादळी पाऊस)
https://www.facebook.com/vijay.bendre.52

Monday, September 22, 2014

नात्यांचा अर्थ




नात्यांचा अर्थ किती जणांना समजतो ?
श्वासांचा स्पर्श किती जणांना उमजतो ?
जीवनाचे हे गहीरे सत्य जाणले ज्यांनी
प्रेमाचा सागर लिलया पार केला त्यांनी

- विनोद
https://www.facebook.com/vinod.bhatte

Sunday, September 21, 2014

नजरेतुनी शोध

#काव्यतरंग #Marathi #मराठी

नजरेतुनी शोध
प्रीत अंतरमनाची
नकोस घेऊ साथ
मला देण्या विरहाची.....

-राम पळसकार....
https://www.facebook.com/ram.palaskar.9

Sunday, September 14, 2014

ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ?


#काव्यतरंग #Marathi
● प्रयोजन ●
ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ?
कोण करतंय वाहतूक ग्रंथामधून कधीची?
बजेटमधून रस्त्यात अर्थ नसलेल्या वस्त्यांत ?
हे दु:खी लोक अन् ह्या जाहिराती
हे चौकाचौकातील मड आयलंड्स
हे एक्सचेंज मेळावे अन् ढुंगण घोळावे
ही तृष्णा,हा सिकंदर,हा हिटलर , हा बुद्ध
तृष्णा नाहीशी झाली तर काय होतं
सोन्याचा आणि पाण्याचा भाव डाऊन होतो?
काय असतं आयुष्य ?
एक पंचांग ,एक कँलेंडर ,एक तारीख
मग मृत्यू काय एक्झिटचं गेट असतं कोलँप्सिबल
अन् सुरक्षितता
सुका काथ ,सातारी हरी-पत्ती
वर बंदुकीची एक गोळी
काय असतं अंतिम...
विचार ,तत्त्व की कपडेलत्ते
संध्याकाळ झाली की...
आपले हात आपल्या बटनांकडे जातातच !
कुणी अक्षर सुधारण्यासाठी
कविता लिहीत नसतो.
●कवी -अरुण काळे
(संदर्भ : नंतर आलेले लोक पृष्ठ १ /लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई .)
सौजन्य : Ramesh Mane

Friday, September 12, 2014

जमला जन समुदाय अपार

वैराग्याचा मेळा(गमन)

जमला जन समुदाय अपार, मूक, उदास, गंभीरं
कोणी उधळती अबीर बुक्का, कोणां मुखी रामं

राग, लोभ, नाती, गोती, काम, क्रोध न उरला काही
सर्व संग परित्याग करुनी, निजला जणूकि संन्यासी

आयुष्य भर जो दिसला, तो देह समोरी निजला
सोडून गेला जो देहाला, तोच कधी ना दिसला

अज्ञाताच्या या प्रवासाला, आत्मा नंगाच गेला
तिरडीवती केवळ पसरला, देह रुपी हा अंगरखा

जमविला गोतावळा जरी, सारे प्रवासी घडीभरचे
अज्ञाताच्या या वाटेवर, अखेर एकटेच निघायचे

असतील अनेक जरी, सखे, सोयरे मित्र, सोबती
संपणार रे साथ तयांची, स्मशान प्रवेश द्वारी

सारे प्रवासी घडीभरचे, पाव्हणेच रे या जगी
काढले तिकीट परतीचे, जन्मा आलो ज्या क्षणी

ना रद्द व्हायचे तिकीट, ना गाडी कधी चुकायची
परतीच्या प्रवासाची ती, वेळ कधी न टळायची

उगवतील चंद्र तारे, चालेलच जग रहाटी
राहतील अंधुक आठवणी, भिंतीवर फोटो जोवरी

मृत्यूचीच असे ओढ जीवा, तोच शाश्वत मित्र त्याचा
भेटता देती आलिंगन दोघे, जीव तत्काळ सोडी काया

चिंतेनी किती जाळला देह, न जळला आयुष्य भरी
होता मुक्त चिंतेतून, तो देह जळला चितेवरी

राखले शरीर जन्मभरी हे, राख करण्याच स्मशानी
राख पसरता मनावरी ती, राखण्याची जिरली उर्मी

धडाडून पेटली चिता, वैराग्य धूर उडाला
कोण म्हणे ही अंत्ययात्रा, जमला वैराग्याचा मेळा

केदार....
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)
https://www.facebook.com/kedar.mehendale.3

Wednesday, September 10, 2014

माझ्या जात्याला जात्याला


माझ्या जात्याला जात्याला हळूच बाई फ़िरवा
ओल्या हळदीचे हळदीचे शिक्के घरात गिरवा....

दारी करावल्या करावल्या बसल्या जेवायाला
थोड्या शेवाया शेवाया लावा गं ताटाला
नवीन नवरीला नवरीला बेसन पोळी वाढा
माझ्या लेकीची लेकीची नजर कोणी काढा
एका हातानं हातानं साखर पोळी भरवा ...माझ्या जात्याला

मोठ्या थाटानं थाटानं वाढवले लेकीला
माथा अंबेच्या अंबेच्या मंदिरी टेकीला
आली हौशीनं हौशीनं मोठी विहिणबाई
कुंकू चमकीचा चमकीचा मळवट लावा बाई
भरल्या ओटीत ओटीत देते शालू हिरवा....माझ्या जात्याला

गजरा लाविला लाविला केसावरती बाई
साडी नेसून नेसून सजली ही गौराई
गोर्‍या गालाला गालाला हळद लावा वहिनी
आल्या हळदीला हळदीला घरुन माझ्या बहिणी
मांडव आंब्याचा आंब्याचा गल्लुगल्ली मिरवा...माझ्या जात्याला

-- संतोष वाटपाडे (नाशिक)
FB Page : काव्यसंतोष
Blog : http://santoshwatpade.blogspot.in/
You Tube Channel :https://www.youtube.com/user/khaini009

Monday, September 8, 2014

जिजाऊच्या पोटी | शिवबा जन्माला


#मराठी

"शिवबा "

जिजाऊच्या पोटी | शिवबा जन्माला
सारा आंनदला | गोतावळा...

जिजाऊने दिले | लढाईचे धडे
धावे पुढे पुढे | तलवार...

आई भावानीने| आशीर्वाद दिला
बळ लढण्याला | येत गेले...

म-हाठी मातीचा | लावोनिया टिळा
एकेक मावळा | उभा केला...

देख रे माणसा | शिवबाची रीत
पाहे पर स्रीत |माऊलीला ...

नेहमी जपला | कल्याणाचा ध्यास
शेवटचा श्वास| जिंकण्याचा...

ध्वज खांध्यावर | घेऊन लढला
भगवा गाडला | मुलुखात...

माथ्यावर सारे | उन्हाळ झेलले
म्हणुनच किल्ले | हे दिसले...

धन्य धन्य झाली |जिजाऊ माउली
देऊन सावली | महाराष्ट्राला...
- रमेश माने
https://www.facebook.com/ramesh.mane.7739814

Sunday, September 7, 2014

उधाणलेल्या फ़ेसाळ लाटा



उधाणलेल्या फ़ेसाळ लाटा
उसळत राहतात आतल्या आत..
अनादि अनंताची जीवघेणी ओढ त्यांच्या ठायी
पार करायचाय शरीराचा अडसर
ओलांडून जायचंय डोळ्यांतलं आकाश...

पण
आवेगाला येतो उमजून
अडसराचा भक्कमपणा..
अथांग मर्यादा..
मग फुटत राहतो आतल्या आत
वास्तवाच्या रुक्ष खडकांवर...
उडत राहतात शुभ्र ठिकर्‍या
चौफेर!!

अंगभर फ़ुलारून उरतो
असाध्याचा कोवळा शहारा..

सगळं असोशीने थोपवून ओहोटीची वाट पहात राहणं किती अवघड असतं, माहितीये?

बागेश्री
Bageshree Deshmukh
https://www.facebook.com/bageshree.deshmukh

Saturday, September 6, 2014

विचार



पाश्चिमात्य देशातील भांडवलशाही ग्लोबालायझाशनच्या नावर सगळीकडे पसरली आहे. पाश्चात्य देशात तुम्ही म्हणतात तसेच होते बडे उद्योजकच ठरवतात कोण नेतृत्व करणार ते. पहिले पाऊल म्हणजे लोकांमध्ये जागरुकता आणणे आज अमेरिकेत दुधामधे जे हार्मोन्स टाकले जायचे ते लोकाच्या जागरूकतेने टाकणे बंद झाले. भारत मुख्य करून शस्त्रे व विमानांची खरेदी पाश्चात्य देशाकडून करतो त्यामुळे शास्त्रास्तानसाठी भारतावर सहज
दबाव आणल्या जातो त्याबरोबरच भाष्टचारी नेते व त्यांची स्वार्थी नितीमत्तेला आपयाला बळी पडावे लागते युरोप माधे GMO फूड चालत नाही अमेरिकेत पण त्याला मागील काही वर्षापासून विरोध सुरु आहे त्यांना लेबलवर GMO आहे हे लिहा ह्यासाठी कायदा अणायाच प्रयत्न सुरु आहे हेच कारण आहे मन्सेनटो सारख्या कंपनी भारतासारख्या देशांमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आहे. आपण आपल्या येथे जास्तीत जास्त उत्पादन सुरु करणे हा त्यावर इलाज आहे त्यासाठी रशिया व इजारायीलची मदत घेऊ शकतो. भारतात हुशार लोकांची कमी नाही पण नीट आखणी करून ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे.
धन्यवाद
****शब्द शृंगार
https://www.facebook.com/profile.php?id=100008046221528

नभाखालती अथांग


#मराठी

नभाखालती अथांग
वेड्या वळणाच्या वाटा
दर्याखोर्या पहाडांशी 
काळ्या अंधाराच्या लाटा

वाट चालायची दूर
कुठे दिसेना सावली
मला टाकून एकटी
कुठे हरवून गेली

होता सकाळ पाठीशी
मध्यान्हीला पावलात
आता दिवस ढळता
कुठे विरली नभात

शोधशोधले किती मी
चोहिकडे आसपास
उगा चाहुलीचे तिच्या
खोटे खोटेच आभास

खोल मनाच्या तळात
हाक अवचित आली
आणि माझीच सावली
मला तिंथे गवसली

वर्षा
https://www.facebook.com/varsha.kulkarni.1840

Friday, September 5, 2014

धरेने ओढुनी घ्यावी धुक्याची रेशमी चादर


#मराठी

धरेने ओढुनी घ्यावी धुक्याची रेशमी चादर
तसे माझे तुझे नाते तसा माझा तुझा वावर...!

कुणाच्या सावलीला मी कधी बोलावले नाही
उन्हाचा पाहिजे तेथे करूनी घेतला वापर...!

तसा पाऊसही येतो ... तसे तर ऊनही येते
तरी काहीतरी होते...नभाला ओल आल्यावर...!

इथे माणूस जोडाया असा मी तोडगा केला
जगाची भोगुनी दु:खे...सुखाने जाहलो सादर...!

लफंग्याची कलाकारी...दुतोंड्याची अदाकारी
मलाही भेटला होता अशा गोषातला झोलर...!

निघाली रात्र माहेरी ... असे ना ऐकले केंव्हा
दिसाला गाठताना मी कधी ना पाहिले सासर...!

नवा आदेशही आला...नवी आश्वासने आली
जुन्या देशात अवतरला नव्याने एक सौदागर...!

खरे सांगा ... प्रतिष्ठेने कुणी का राहतो येथे
मनापासून कोणी का कुणाचा राखतो आदर...?

कधीचे संपले आहे ... जगायासारखे काही
मला तू सांगशी मृत्यू तुला आता म्हणे घाबर...?
-----प्रशांत
https://www.facebook.com/prashant.vaidya.503 

Thursday, September 4, 2014

गुणगुणावे तुला…की लिहावे तुला


#मराठी

गुणगुणावे तुला…की लिहावे तुला
भेट घ्यावी तुझी…की छळावे तुला…?

दूर आहे तरी…मी तुझ्या अंतरी
अन तरी सारखे मी सुचावे तुला…?

बोलता बोलता रात्र अंधाराते…
स्वप्न होऊन मी दूर न्यावे तुला…!

पानजाळीतुनी चंद्र डोकावतो
चांदणे सांगते बारकावे तुला…!

गंधली ही फुले पारिजाता तुझी
मी दवाच्यापरी जागवावे तुला…!

सांग केलास का तू असा कायदा
दोन श्वासांमधे आठवावे तुला…!
- - - - -प्रशांत
Prashant Vaidya
https://www.facebook.com/prashant.vaidya.503

हृदयाचे बंद द्वार


#मराठी

भेट
हृदयाचे बंद द्वार
अचानक सताड उघडले

पूर नाही महापूर नाही
महाप्रलय होता तो

कितीक वर्षांपासून सांभाळलेले
नाती गोती ,मान स्वाभिमान

सगळे सगळे वाहून गेले
राहिला बस

एक मोठ्ठा खडक 'विवेकानंद रॉक'सारखा हुबेहूब

ज्यावर कितीक काळापासून तुझ्या प्रतीक्षेत उभी 'मी'
अगदी आदिमाया पार्वतीसारखी

आणि

क्षितिजावर पाय रोउन उभा तू
जणू महादेवाचा ईश्वरी अंश शिव

आणि मग

अचानक गडगडायला लागले मळभ दाटून आले

आणि

आपल्यामध्ये वाढत चाललेल्या त्या प्रलयंकारी लाटा.....वाढत

वाढतच गेल्या !

..........स्वाती मेहेंदळे
https://www.facebook.com/swati.mehendale

Wednesday, September 3, 2014

कुणी कुणाचे ना उरले ।

#मराठी


कुणी कुणाचे ना उरले । स्वार्थात सारे गुंतले ।
आधार सरता सगळे । गुरूकडे मन धावले ।।

आम्ही आमच्या आरत्या । ओवाळी बघा रोजला ।
दया चापटी थोबाडात । डोळे उघडा आजला ।।

काम " हेच असे काम । मनास न दुजे काम ।
यास करा निष्काम " । मनात यावा हो राम ।।

स्वामी समर्था इकडे । द्या लक्ष सगळीकडे ।
गुंता सोडवावा तुम्ही । घ्यावे आता पलीकडे ।।

---------------------------------------------------------------------------------------------------------
कविता - हे स्वामी समर्था …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
https://www.facebook.com/profile.php?id=100001994310283

Tuesday, September 2, 2014

तितकं वेडेपण झेपलं असतं तर….


#मराठी

तितकं वेडेपण झेपलं असतं तर….

पायाखालची वाट माझ्याच बापाची होती
शून्याच्या वळणावर सूचना लाखाची होती
हळव्या हळव्या कपाळावर आठी होती खडूस
मीच म्हणालो जीवनाला प्रेमात नको पडूस

पण तितकं वेडेपण झेपलं असतं तर….
वादळाच्या हृदयामध्ये बांधलं असतं घर …

भावनांच्या गालांनी खाल्ली होती थप्पड
कारण नशा चढण्याआधी केली होती धडपड
एक वणवा विझला तेव्हा एक प्रश्न मिटलाही
राखे मध्ये असतं "भलं" हा विश्वास पटलाही

पण तितकं वेडेपण झेपलं असतं तर….
मरणालाही म्हणालो असतो …. हात माझा घट्ट धर

झेपलं असतं तर….

- विजय बेंद्रे (एक वादळी पाऊस)
https://www.facebook.com/vijay.bendre.52

Monday, September 1, 2014

देव असलाच तर असावा


#मराठी

देव

देव----,
असलाच तर असावा
उगवत्या सूर्याच्या सोनवर्खी बिंबात
पडणा-या पावसाच्या पारदर्शी थेंबात
मेढीला फुटलेल्या हिरव्यालूस कोंबात

देव----,
दिसलाच तर दिसावा
आडवाटेला ऐचानात फुललेल्या एकांड्या फुलात
आपल्याच अंगठ्यातून दूध चोखणा-या मुलात
आजीच्या गोधडीत सुरकौतल्या उबदार गालात

देव----,
भेटला तर भेटावा
वेठबिगार मजूराच्या निढळाच्या घामात
हंबरणा-या गायीच्या करूणाकर प्रेमात
अन्यायाविरूद्ध पेटणा-या रक्ता-रोमरोमात

साहेबराव ठाणगे
https://www.facebook.com/profile.php?id=100008367404839