Saturday, May 16, 2026

डॉ आनंद नाडकर्णी


मागच्या वर्षी The Lost Supper या डॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेल्या नाटकाच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. वाचनाच्या, तालमींच्या, म्यूझिक रेकॉर्डिंगच्या निमित्ताने अनेक प्रदीर्घ भेटी आणि फोन कॉल्स झाले. त्या आधी ‘डॉ.आनंद नाडकर्णी’ या नावाभोवती  असलेल्या प्रभावळीशी परिचित होतो आणि खूप आदरयुक्त उत्सुकता सुद्धा होती त्यांना भेटण्या बद्दल. प्रत्यक्ष भेटल्यावर त्या प्रभावळीच्या केंद्रस्थानी असलेलं अफ़लातून व्यक्तिमत्व अनुभवायला मिळालं. सकारात्मक कार्यशीलता, संघटन कौशल्य अशा अनेक गोष्टींचा अर्थ समजला. सहजपणाने हसत बोलत वागणारी एक व्यक्ती समाजात किती खोलवर प्रभाव पाडू शकते हे लक्षात आलं. स्वतःचं नाव सार्थ करणारे डॉ.आनंद नाडकर्णी सतत आठवत राहतील.

0 comments: