Sunday, July 5, 2026

लग्न व्यवस्था

लग्न आंधळं नसावं

आज लग्न जुळवताना बहुसंख्य लोकांची नजर सर्वप्रथम कशावर जाते?

घर किती पॉश आहे... 
दारात किती गाड्या उभ्या आहेत... 
बँक बॅलन्स किती आहे... 
वडिलांचा व्यवसाय किती मोठा आहे... 
लग्नात किती थाटमाट होणार आहे...

दुर्दैवाने अनेकांची मानसिकता अजूनही या तामझाम आणि श्रीमंतीला भाळते.

फार कमी लोक विचारतात...
हे वैभव प्रामाणिक मार्गाने उभं राहिलं आहे का? 
या घरात माणुसकी, संस्कार आणि विश्वास आहे का? 
मुलगा किंवा मुलगी रागावर नियंत्रण ठेवतात का? 
व्यसनं आहेत का? 
स्वभाव समंजस आहे का? 
मतभेद झाले तर संवाद साधतील की नातंच संपवतील?

कारण बाहेरून चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. 
संगमरवरी भिंती असल्या म्हणून घर सुखी असतंच असं नाही आणि साध्या घरातही आयुष्यभर पुरेल इतकी माणुसकी दडलेली असू शकते.

आज ज्या घटना समाजाला हादरवतात, त्या आपल्याला एकच धडा देतात—

लग्न करताना बँक बॅलन्स नव्हे, मनाचा बॅलन्स तपासा.
गाडीची किंमत नव्हे, माणसाची किंमत ओळखा.
बंगल्याचा आकार नव्हे, विचारांची उंची पाहा.

कारण संसार पैशाने उभा राहू शकतो... 
पण तो टिकतो फक्त स्वभाव, चारित्र्य, विश्वास आणि परस्पर आदरामुळे.

- अशोक मानकर


बरोबर पण आज काल भौतिक गोष्टीचा जास्त विचार केला जातो काहींना वाटत असावे त्यात सुख .. पण स्वभाव मन जुळली नसतील तर संसार टिकणे कठिणच !

0 comments: