Showing posts with label विं दा करंदीकर. Show all posts
Showing posts with label विं दा करंदीकर. Show all posts

Friday, April 28, 2017

जगण्या मध्ये ब्रह्मानंद

जगण्या मध्ये ब्रह्मानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून मी हृदयाला मुक्त केले 
जिथे जिथे धमनी आहे तिथे माझे रक्त गेले 
दिक्कालाच्या जबड्या मधील 
लवलवणारी जीभ मी 
आसक्ती च्या गर्भामधील 
धगधगणारे बीज मी 
माझ्या हातात महा यंत्र 
माझ्या मुखात महा मंत्र 
सगळे मिळून सगळ्या साठी 
मरण्यातही मौज आहे 
सगळे मिळून सगळ्या साठी 
जगण्या मध्ये ब्रह्मानंद 

विं दा करंदीकर

Sunday, April 2, 2017

आयुष्याला द्यावे उत्तर

आयुष्याला द्यावे उत्तर
असे जगावे दुनियेमध्ये,आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना…
संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सार्‍या, निरोप शेवटचा देताना…
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
कवी : विं दा करंदीकर