Showing posts with label विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका. Show all posts
Showing posts with label विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका. Show all posts

Saturday, December 10, 2011

विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका

प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.

... प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?

उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.



प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.

प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी
प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर – अमिताभ बच्चन.
प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.
तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -

…….. काय झालं ?

…….. बाळ रडत होतं.

…….. एक कानशिलात दे त्याच्या.

…….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.