Showing posts with label ई साहित्य. Show all posts
Showing posts with label ई साहित्य. Show all posts

Sunday, July 5, 2020

ई साहित्य पुस्तक

आज आषाढाचा पहिला दिवस. 
आजचा दिवस महाकवी कालिदासांना समर्पित. संस्कृत महाकाव्यांच्या त्या असीम वैभवाचा रसास्वाद घ्यायचा दिवस.
तसाच हा ई साहित्य चा. २००८ च्या आषाढाच्या पहिल्या दिवशी ई साहित्य चे पहिले पुस्तक, छापील पुस्तक, ’ऑडवाटेच्या कविता’ बरोब्बर बारा वर्षांपुर्वी प्रकाशित झाले.
कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यमंदिरात झालेला तो सोहळा, ती गर्दी, त्या गळाभेटी, ती भाषणं, ते कवितावाचन आणि पुस्तकप्रकाशनाचा तो क्षण आपल्यापैकी प्रत्येकाला आठवत असेलच. ती सुरुवातच एवढी जबरदस्त होती की तो दमखम एक शतकभर तरी नक्कीच पुरेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गर्दीमुळे “आपल्या” सर्व लोकांनी उभे राहून आलेल्या पाहुण्यांना बसायला जागा करून दिली आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला. कारण हे “आपले” लोकही काही जवळपासचे रहाणारे नव्हते. नाशिक, पुणे, बोरिवली पनवेल अशा लांब्लांबच्या ठिकाणाहून आलेले. आणि तीन तास उभे राहिलेले हे माननीय कविगण होते. आजही त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.
कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन सॅमने केलेलं. पूर्ण स्वतःच्या खिशातून. अतिशय बारिकसारिक डिटेल्सची काळजी घेऊन त्याने हा कार्यक्रम पडद्याडून संयोजित केला. कुठेही कसलाही गडबड गोंधळ नव्हता.  प्रविण दवणे सरांना आणायची आणि परत न्यायची जबाबदारी स्वतःची गाडी घेऊन किरण मल्लावने पार पाडली होती. पुस्तकाचे संपादन प्रभा आणि मुक्ताने अत्यंत कुशलतेने केलं होतं. मुखपृष्ठावर अमृताने एक उडणारी कापसाची म्हातारी ठेवली होती. ती आपोआप हवेवर उडत उडत कुठवर आली ते आपण पहात आहोतच. प्रत्येकाकडे काही ना काही रोल होता आणि प्रत्येकाने तो समर्पणाने आणि समर्थपणे निभावला. सगळेच अननुभवी आणि अव्यावहारिक. त्यामुळे नवथर उत्साहाचा वावर जाणवत होता. सुदैवाने आजही तो उत्साह आणि प्रेम जाणवण्याइतपत उसळत आहे. 
कार्यक्रम तीन तास चालला. मला मिळालेले फ़ोटो व व्हिडिओ सोबत जोडले आहेतच. अजून कोणाकडे असतील तर द्या. भूपेशने आधीच दिलेले आहेत.  
ई साहित्य या शब्दाला जाहिर व्यासपीठ मिळाल्याला आज बारा वर्षे पूर्ण होत आहेत. एक तप. त्यासाठी कोणी कोणाचे आभार मानायचे आणि कोणी कोणाचे कौतुक करायचे हा प्रश्नच आहे. तर ते सगळे तूर्तास बाजूला ठेवून पुढचा मार्ग चालूया.
तू चालत रहा। तू चालत रहा।
चरैवति। चरैवति॥
#नाम
२२.६.२०२०
#esahity


Thursday, April 7, 2016

ई साहीत्य चरित्र विभाग




धगधगते यज्ञकुंड : विनायक दामोदर सावरकर
लेखक : श्रीकांत वा .नेर्लेकर
------------------
Free download #eBook copy @ 
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dhagdhagte_yadnyakund_single_page.pdf






सूर्यपुत्र लोकमान्य ~ डॉ. स्मिता दामले
------------------

Free download #eBook copy @ 
------------------



२६/११ चे अमर हुतात्मे ~ संजय वाघ

------------------
Free download #eBook copy @ 

------------------

ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com

Friday, July 11, 2014

ई साहित्य कथाकथन

ई साहित्य कथाकथन 

--------------------------------

स्टेशन डायरी सौंदर्या
January 26, 2014 
--------------------------------
रेवण जाधव यांच्या वेगवान शैलीतून उतरलेल्या दोन जबरदस्त कथा.
पोलीस स्टेशनवरच्या सत्य घटनेवर आधारित : स्टेशन डायरी.
सौंदर्य हाच शाप बनलेल्या एका युवतीची चटका लावणारी कथा : सौंदऱ्या
You cant afford to miss these stories.
--------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @

--------------------------------


--------------------------------
रक्षा ~ डॉ स्मिता दामले  
June 5, 2014
--------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/raksha_smita.pdf
---------------
अगदी पहिल्याच ‘ क्षणभंगुर’ या कथेपासून मनाची पकड घेणारी अशी स्मिता दामले यांची शैली जाणवत रहाते. विशेष म्हणजे ही शैली कथेला अनुकूल असे रागरंग धारण करते. पहिल्या कथेतील अत्यंत सधन आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत अशा नानासाहेबांनी आपल्या संपत्तीचा केलेला विनिमय मनाच्या श्रीमंतीबरोबरच वैराग्याचा साक्षात्कार घडवणारा आहे. नानासाहेबांच्या घरातील ऐश्वर्याचं , आयुष्यातील अद्भुत घटनांचं , विचारांचं वर्णन पकड घेणाऱ्या प्रतिमांच्या वापरातून लेखिका करते.
‘घर सर्व दागिने उतरवून ठेवलेल्या श्रीमंत सुंदरीसारखं साधं दिसत होतं ‘’.. एकाच वाक्यात केवढातरी आशय लखाखून जातो. कथेचा शेवट एखाद्या रंगलेल्या मैफिलीसारखा मनात रेंगाळत रहातो..

----------------------


बळी 
July 11, 2014
विद्यापीठ नामांतराच्या पार्श्वभूमीवरील, मराठवाड्यातील ग्रामीण बोलीतली कथा.
एक काळजाला चटका देणारा अनुभव...
लेखक : मच्छिंद्रनाथ माळी
--------------------------------
Free download ‪#‎eBook‬ copy @
--------------------------------
ई साहित्य
www.esahity.com
esahity@gmail.com

Monday, January 28, 2013

ई साहित्य कथा विभाग


ई साहित्य कथा विभाग 


शो-पीस (कथा संग्रह) ~ अरुण वि देशपांडे 
October 29, 2012
------------------------------
अनंतराव एक लोकप्रिय हेडक्लार्क म्हणून विख्यात होते. याचे रमाबाईंना भारी कौतुक होते ... त्यापेक्षा काकणभर जास्त अभिमान होता.
नवर्याच्या आवडींना जपणे, लक्षात ठेवून त्या पुरवणे, - असा प्रेमळ स्वभाव असणार्या रमाबाईंनी इथल्या नव्या नव्या वातावरणात पलटी का मारली असेल? अनंतरावांना काही कळेनासे झाले.
Download 
 ईबुक  @ http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/e_book_showpiece.pdf



------------------------------

विषामृत (कथा संग्रह) ~ आनंदिनी
July 28, 2013 



या सर्व कथा यातील पात्रे काल्पनिक आहेत. पण त्यातील नाती जसे सासू सून , नवरा बायको , आई बाळ , त्यातल्या पक्क्या गाठी , त्यातले प्रेम काल्पनिक कसे असू शकते.. 



------------------------------


------------------------------

वाचकांच्या प्रतिक्रिया :


मराठी कथा फारच छान आहे, कथा एकदम दर्जेदार आहे
---संजय गोखले
------------------------------

पुस्तक वाचायला साधारण विस मिनिटे लागली .प्रयत्न चांगला आहे अजून कथेत सकसपणा आणता आला असता .पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा 
---आनंद खेर
------------------------------




“आभास हा” : लेखक मंदार कात्रे. 
October 1, 2013
------------------------------
हे मंदार कात्रे अर्ध्याहून अधिक काळ परदेशात असतात. आणि परदेशी नोकरीच्या आकर्षणात मराठी मुलांची कशी कशी फ़सवणूक होते त्याचे सत्य अनुभव म्हणजे हा कथासंग्रह” आभास हा”. 

------------------------------
Ebook download @ http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/abhas_haa.pdf

--------------------------------------------------
वाचकांच्या प्रतिक्रिया :

नमस्कार
आपला कथासंग्रह आभास हा नुकताच वाचला ,मला मनापासून यातल्या कथा पात्रे
संवाद आणि प्रसंग आवडले . आभास हा कथेतील चंदू किंवा चकवा कथेतील आशिष
म्हणा किंवा वेंकट अय्यर या व्यक्ती समाजात आजूबाजूला दिसत असतात जाणवून
येतात . पण भूलभुलैया मधील विश्वकर्मा ,सलील देशमुख डॉन कथेचा नायक
,अवलिया चंदू या खरोखरच फार भयानक भीषण वाटाव्या अशा प्रसंगातून गेलेल्या
दिसतात . नातेवाईक मित्र मंडळी परदेशात स्थायिक असतात नोकरी करत असतात पण
अस काही घडत असेल याची वरवरदेखील कधी कल्पना येत नाही ,पेपरमधून अधून
मधून अशा गोष्टी वाचायला मिळतातच "नार्वे सरकारने लहान बाळ ताब्यात घेणे
,ऑस्ट्रेलिया चीन मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना त्रास" पण हे सगळ वाचले
जाते आणि सुटून जाते . आपल्या या साऱ्या कथांमधून हे प्रसंग प्रत्यक्ष
अनुभवणारी व्यक्ती कोणत्या विचारसरणीतून कोणत्या मानसिक स्थितीतून जाते
आहे हे खरच समजून येते . वाचताना प्रत्येक कथेशी एक भावनिक नाळ जोडली
जाते . शेवटी जात पात धर्म लिंग भाषा रेहन सेहन वेश देश या साऱ्या सीमा
ओलांडून पुढे गेले तरी आयुष्य नावाची गोष्ट समोर येत राहते आणि त्याला
न्याय "चांगुलपणा आणि माणुसकी " नावाचीच गोष्ट देत राहते ,आपल्या कथा
वाचताना मला पुन्हा पुन्हा हेच जाणवले .
आपले मनापासून अभिनंदन आणि सदिच्छा

----कविता मोकाशी ,मिरज
---------------------------------------






अंतरीच्या गूढगर्भी
December 12, 2013


लेखक ~ संकल्प आभाळे. 
कथासंग्रह
________________________________________
वाचकांच्या प्रतिक्रिया :

संकल्पच्या कथांबद्दल प्रसिद्ध कवी संदिप खरे म्हणतात, “ संकल्पच्या कथा या जगण्याला संवेदनशील हातांनी स्पर्श करणार्या कथा आहेत. आयुष्यातल्या बारिकसारिक घडामोडींचा, नातेसंबंधांचा आणि अनुभवांचा त्या वेध घेऊ पहातात. ... आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी आणि जिवंत मनाने संकल्प पहातो...”
________________________________________
Ebook download @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/sankalpa_abhale_11_dec_cute.pdf
________________________________________


#esahity

ध ध ध ध धमाल विनोदी #कथासंग्रह
January 28, 2014
भव्य दिव्य अवाढव्य : विजय काचरे
____________________________
Ebook download http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/bda_bhavy_divy_awadhavya.pdf
_____________________________

ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
Subscribe More Ebook @ esahity@gmail.com
ई साहित्य प्रतिष्ठानची सर्व ई पुस्तके विनामूल्य असतात.

Sunday, December 30, 2012

काव्यसंग्रह विभाग




८:०५ :: ७:१६ ~ सचिन काकडे
-----------
सचिन काकडे याचे हे ८:०५ :: ७:१६ अशा विचित्र नांवाचे पुस्तक म्हणजे अशा लखलखीत कवित्वाचा पुरावा. मुंबईत रोज चाळीस लाख लोक लोकलचा प्रवास करतात. पण सचिनला कॉलेज आणि नोकरीची कसरत करत असताना, जी लोकल दिसली ती लाखातील एखाद्यालाच दिसते, जाणवते, सतावते आणि आश्वस्तही करते. ही लोकल कधी त्याला आईसारखी मायाळू भासते तर कधी तिचा राक्षसी थंडपणा त्याला हादरवून टाकतो. लोखंडाच्या अनेक पत्र्यांच्या पलिकडे चिरडत जाणारा जीव सचिनच्या काळजाला हात घालतो. गार हिरवळ त्याचे डोळे शेकते. सूक्ष्म निरीक्षण आणि धारदार जाणीवांनी सचिनची कविता अतिशय टोकदार झाली आहे. हे टोक जाणवायला कातडी मात्र जिवंत असायला हवी. नाहीतर आजकाल बघू नये ते बघून बघून डोळे, मन आणि आत्मासुद्धा निर्जीवच अस्ल्यासारखे असतात. त्यांना संजीवनी देण्याचे काम सचिनच्या या कविता करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
------------
Free download #eBook copy @ 








बालभारती आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @ 
------------------
ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com



बालभारती आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @ 
------------------



बालभारती २ 
-----------
आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @ 




चार क्षण ~ संतोष नार्वेकर 
-----------
कविता संग्रह
------------
Free download #eBook copy @ 
------------------




क्युबिकल्स~ आनंद माने
-----------
कविता संग्रह
------------
Free download #eBook copy @ 






लालनाक्या ~ प्राजक्त देशमुख
------------
Free download #eBook copy @ 


------------------




डरकाळी ~ गणेश पावले
------------
संग्रहातून :
वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ असून चालत नाही 
त्यासाठी अंगात शिवाचा अंश असावा लागतो ...
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ वळवून चालत नाही 
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम न्हाय 
त्यासाठी रक्ताचा अभिषेक करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून चालण न्हवे 
त्यासाठी शत्रू सोडाच त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं लागतं..
आग्राहून सुटका.. आणि शास्तेखनाची फजिती.. अहो राजा होण्यासाठी 
अफजाल्यासारख्या पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व यायला
माझ्या राजांसारख रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे भोसले असावं लागतं...
------------
Free download #eBook copy @ 
------------------



ग्रेव्हयार्ड लिटरेचर ~ प्राजक्त देशमुख
------------
Free download #eBook copy @ 
------------------





कृष्णा ~ स्वप्ना कोल्हे 
------------
Free download #eBook copy @ 

------------------




अहं ब्रहास्मि
-----------------

Free download #eBook copy @ 
------------

ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com



------------------